२६ नोव्हेंबर संविधान दिन मराठी निबंध bhartiy sanvidhan din bhashan
न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुता
मूल्यातून या देश महान
देशाचा आहे धर्म आमचा
धर्मग्रंथ अन संविधान
सन्माननीय व्यासपीठ आदरणीय गुरुजन आणि माझ्या सर्व बंधू भगिनींनो, विद्यार्थी मित्रांनो. आज दिनांक 26 नोव्हेंबर संविधान दिन. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संसदेने अधिकृतपणे संविधानाचा स्वीकार केला आणि जगातील सर्वात मोठी लोकशाही जन्माला आली.
मित्रहो पूर्वी भारत देशातील नागरिकांवर, आपणा सर्वांवर राजे महाराजे आणि बादशहा यांनी राज्य केलं. त्यानंतर इंग्रजांनी राज्य केलं. परंतु 26 नोव्हेंबर 1949 या दिवसापासून ही गुलामगिरी कायमची मोडली गेली. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन म्हणतात त्याप्रमाणे लोकांनी लोकांसाठी लोकांच्या मार्फत चालवलेलं राज्य जन्माला आले. लोकशाही जन्माला आली. ज्यात आपल्याला आपला नेता निवडण्याचं स्वातंत्र्य मिळालं. आपल्याला हवा त्या धर्माचं आचरण करण्याचे स्वातंत्र्य मिळालं. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वातंत्र्य नागरिक म्हणून सन्मानाने जगण्याचं स्वातंत्र्य मिळाले.
भारताची राज्यघटना म्हणजे संविधान हे पायाभूत कायदे आहेत. ज्या कायद्यांवरच देश वाटचाल करीत असतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. 26 नोव्हेंबर १९४९ रोजी या राज्यघटनेचा स्वीकार झाला तर 26 जानेवारी 1950 या दिवसापासून राज्यघटना अमलात आली म्हणूनच 26 जानेवारी हा दिवस भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 125 व्या जयंती वर्षापासून म्हणजेच 26 नोव्हेंबर 2015 पासून संपूर्ण भारतात संविधान दिवस साजरा करायला सुरुवात झाली आहे.
मित्रांनो भारताच्या संविधानाप्रमाणे भारत हे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र बनले. भारतीय शासन व्यवस्था असो की डायव्यवस्था सर्वकाही संविधानाच्या चौकटीत राहूनच चालते. म्हणूनच भारतातील प्रत्येक नागरिकाला न्याय पालिकेच्या माध्यमातून नाही मिळवून देण्याचे कार्य देखील संविधानच पार पाडत असते.
140 कोटी लोकसंख्या असलेल्या विविध जातीच्या धर्माच्या वर्णाच्या देशाच्या संस्कृतीच्या लोकांना एका समान धाग्यात बांधून ठेवण्याचे काम हे संविधान करते म्हणून माझे संविधान भारतीय संविधान विश्वात सर्वश्रेष्ठ आहे यावर माझा ठाम विश्वास आहे.
रुतबा हर इन्सान को संविधान से मिला है
तिरंगा इस आसमान को संविधान से मिला है
औरो को जो मिला वह मुकंद्दर से मिला है
हमे तो मुकंद्दर मे भी संविधान ही मिला है
भारतीय संविधान दिनाच्या सर्वांना कोटी कोटी शुभेच्छा









