“ग्रंथ हेच गुरू” मराठी निबंध marathi nibandh

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

“ग्रंथ हेच गुरू” मराठी निबंध marathi nibandh 

“ग्रंथासारखा गुरू नाही रे जगात, ग्रंथासारखा मित्र नाही भरत मनात ग्रंथासारखा दास कसा मिळेल विकत ग्रंथासारखा रे बसावा वाचत.” हे तुमच्या माझ्या सर्वांच्या मनीचे बोल आहेत. ‘पिंडे पिंडे मतिः भिन्न’ याप्रमाणे प्रत्येकाचा पुस्तके वाचण्याचा हेतू मात्र वेगवेगळा असतो. काही माणसे ज्ञान मिळविण्यासाठी पुस्तके वाचतात, तर काही माणसे वेळ घालवण्यासाठी. “माझा मराठीचा बोलु कौतुके परि अमृतातेही पैजा जिंके!” अशी मराठीची थोरवी संत ज्ञानेश्वरांनी गायली व ‘भावार्थदीपिका’ तथा ‘ज्ञानेश्वरी’ हा असामान्य ग्रंथ मराठी भाषेला मिळाला आहे. मराठी तिच्या जन्मापासूनच भाग्यवती ठरली आहे. ज्ञानेश्वरांच्याही पूर्वी ‘महानुभव पंथा’ चे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी यांनी ‘महाराष्ट्री असावे’ म्हणजेच मराठी भाषेतच लिहा असा आग्रह धरला होता. मराठी भाषेत वैविध्यपूर्ण ग्रंथांची वर्णी लागलेली दिसते. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या रूपाने मराठीला ज्ञानामृत पाजले. एकनाथांच्या गवळणी व भारुडांनी मराठी भक्तिरसात न्हाऊन निघाली. घटासी आणावा धट । ‘उद्धटासि पाहिजे उद्धट’ रामदासांनी असा रोकठोक व व्यावहारिक सल्ला दिला व ‘दासबोधा’ सारखा ग्रंथ लिहिला. ‘जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले’ असे सर्वांना आपले मानणाऱ्या संत तुकारामांनीही सामान्यांची अंतःकरणे हेलावून सोडली. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपल्या मनात असलेला नितांत आदर व गाढ श्रद्धा हे आपल्याला ऐतिहासिक पुस्तके व शिवछत्रपतींच्या कादंबरीतून कळते. भावार्थदीपिका, कुराण, गुरुग्रंथ साहिबा, रामायण, महाभारत, बायबल हे आजही आपल्याला मार्गदर्शन करतात. ग्रंथसंपदा ही एक लिखित मजकूर आहे, जो आध्यात्मिक किंवा अलौकिक विषयांशी संबंधित आहे. ग्रंथ आपल्या आयुष्याला दिशा देण्याचे काम करतात. ग्रंथ हा असा खजिना आहे, की ज्याचा जितका उपयोग आपण करून घेऊ तितके आपण समृद्ध होत जाऊ. योग्य मार्गाने जाण्यासाठी ग्रंथ महत्त्वाची भूमिका बजावतात. अज्ञानाकडून प्रकाशमय दिव्याकडे घेऊन जाण्यासाठी ग्रंथांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. ग्रंथांच्या माध्यमातून ज्ञानाचे अफाट असे भांडार एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पाठवले जाते. ग्रंथातून आपल्याला ज्ञानाचा अथांग सागर मिळतो. ‘ग्रंथरूपी गुरू’ मध्ये काही लोकोत्तर गुण आहेत. ते कोणत्याही शिष्यापासून ‘गुरुकिल्ली’ लपवून ठेवत नाहीत. ‘गुरुदक्षिणे’ची अपेक्षा करत नाहीत. जीवनात वाट चुकलेल्यांसाठी ग्रंथ वाटाड्याचे काम करतात. कोणत्याही क्षणी गुरूरूपी ग्रंथ आपल्या हाताशी असले तर जीवनोद्धार होतो. ग्रंथ हेच आदर्श दीपस्तंभअसतात, ज्याच्या प्रकाशात आपल्याला जीवनाची यशस्वी वाटचाल करता येते. ग्रंथ आपल्यावर स्वर्गीय आनंदाची जणू बरसातच करतात, मग स्वर्ग शोधण्याची गरजच काय? मी तर म्हणेन पृथ्वीवर जर कोठे स्वर्ग असेल, तर तो पुस्तकांच्या / ग्रंथांच्या सान्निध्यातच आहे.

मराठी निबंध Marathi Nibandh 

अणु.क्रनिबंधाचे नावpdf download
1ग्रंथ हेच गुरुक्लिक करा 
2मोबाईल शाप की वरदानक्लिक करा
3मराठी असे आमची मायबोलीक्लिक करा 
4अपयशी हीच यशाची पहिली पायरीक्लिक करा 
5नेमबाज मनू भाकरक्लिक करा 
6आपत्ती व्यवस्थापन काळाची गरजक्लिक करा
7covid-19 : एक संकट की संधीक्लिक करा 
8भारताच्या 15 व्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मूक्लिक करा 
9भारताची अवकाशीय उत्तुंग झेपक्लिक करा 
10वर्तमान काळातील स्त्रीक्लिक करा 
11 क्लिक करा
12 क्लिक करा