“मराठी असे आमची मायबोली” मराठी निबंध marathi nibandh 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

“मराठी असे आमची मायबोली” मराठी निबंध marathi nibandh 

माणूस जन्माला येतो तोच आपल्या शिरावर मातृभूमी, मातृभाषा आणि मातेचे ऋण घेऊनच! आई आपल्याला जन्म देते, मातृभूमीतच आपण लहानाचे मोठे होतो. त्याचप्रमाणे मातृभाषेचे महत्त्वसुद्धा अनन्यसाधारण आहे. लहान मूल सर्वप्रथम मातृभाषेतच बोलायला शिकते. या भाषेमुळेच आपण आपल्या विचारांची देवणघेवाणही करू शकतो. अशा सर्व भाषांमध्ये मराठी ही सरळ; परंतु रसाळ अशी भाषा आहे. गाऊ मायमराठीची थोरवी संत ज्ञानोबा, संत तुकोबा संत नामदेव, संत गाडगे महाराज जाणू यांच्या कार्याची महती… खरोखर मराठी ही एक श्रेष्ठ भाषा आहे. आपली ‘मायबोली’ मराठी ही अतिशय प्राचीन आहे. मराठ्यांनी आपला झेंडा अटकेपार फडकवला. त्यापूर्वी मराठीच्या सुपुत्रांनी मराठी भाषेचा झेंडा परदेशापर्यंत नेला होता. मराठी भाषेत साहित्यही विपुल आहे. मराठीतील ग्रंथसंपदा वाखाणण्याजोगी आहे. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत जनाबाई, संत नामदेव अशा अनेक संतांनी आपल्या अभंग व ओव्यांच्या अलंकारांनी मायमराठीला सुशोभित केले आहे. आधुनिक काळात वि. स. खांडेकर, पु. ल. देशपांडे, कुसुमाग्रज, ग. दि. माडगुळकर, विंदा करंदीकर इत्यादी साहित्यिकांनी मराठीच्या वैभवात मोलाची भर घातली आहे. आपल्या या मातृभाषे‌द्वारे ज्ञानाचा झरा अविरत आपल्यासाठी व पुढील अनेक पिढ्यांसाठी सतत वाहतो आहे. मराठीचा रसाळपणा काय वर्णावा ! माझा मराठी बोलु कौतुके परि अमृतातेहि पैजासी जिंके! ऐसी अक्षरे रसिके मेळवीन अशा शब्दांत संत ज्ञानेश्वरांनी मराठीचा गौरव केला आहे तो काय उगीच ? एवढेच नव्हे, तर मराठी ही जिवंत भाषा आहे. ती संकुचित वृत्तीची तर नाहीच. म्हणूनच तिने ‘आई’, ‘अण्णा’ असे कानडी शब्दच कानडीभाषेतून सहज आत्मसात केले आहेत. तरीही तिने स्वतःमधील गोडवा कायम जपला आहे. संस्कृत भाषेची कन्या असलेल्या मराठीच्या कोकणी, वन्हाडी, खान्देशी, अहिराणी अशा बोलीभाषा आहेत. मराठी ही ‘केवळ’ अमृतमधुररस नाही, तर ती एक संपन्न व समृद्ध भाषा आहे. पण आज? आज मात्र आपण आपल्या या मातृभाषेचे महत्त्व विसरत चाललो आहोत. आपल्याला मराठीपेक्षा इतर परकीय भाषाच आपल्याला अधिक प्रिय वाटू लागल्या आहेत. आपण मातृभाषेखेरीच इतर भाषा जरूर शिकाव्यात. त्यांचा आदरही जरूर करावा, पण त्यासाठी ज्या भाषेच्या संगतीत आपण लहानाचे मोठे झालो, त्या आपल्या मातृभाषेबदद्ल आपण अभिमान राखायला हवा. याबाबतीत जपानचे उदाहरण घेण्याजोगे आहे. आज या राष्ट्राने कितीही प्रगती केली असली, तरी त्या देशातील लोक त्यांच्या ‘मायबोली’ला विसरले नाहीत. तिचे ते आजही अभिमानाने संवर्धन करतात. मातृभाषेचे आपल्यावर अनंत उपकार असतात, म्हणून आपण आपल्या मातृभाषेला ‘मायबोली मराठी’ ला विसरून चालणार नाही मराठीचे गुणगान करताना एक वन्हाडी बोलीभाषेतील कवी म्हणतो, थेंब मातीने झेलले जसं मिरगाचं पाणी ! महऱ्हाटीच्या शब्दाईले वास चंदनाच्यावानी! अशा या सुंदर, रसाळ, मधुर असलेल्या आपल्या मातृभाषेचा जर आपण योग्य सन्मान केला, तर त्याचाच आपल्याला फायदा आहे, यात शंकाच नाही.

मराठी निबंध Marathi Nibandh 

अणु.क्र निबंधाचे नाव pdf download
1 ग्रंथ हेच गुरु क्लिक करा 
2 मोबाईल शाप की वरदान क्लिक करा
3 मराठी असे आमची मायबोली क्लिक करा 
4 अपयशी हीच यशाची पहिली पायरी क्लिक करा 
5 नेमबाज मनू भाकर क्लिक करा 
6 आपत्ती व्यवस्थापन काळाची गरज क्लिक करा
7 covid-19 : एक संकट की संधी क्लिक करा 
8 भारताच्या 15 व्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू क्लिक करा 
9 भारताची अवकाशीय उत्तुंग झेप क्लिक करा 
10 वर्तमान काळातील स्त्री क्लिक करा 
11   क्लिक करा
12   क्लिक करा