भारताच्या पंधराव्या राष्ट्रपती “श्रीमती द्रौपदी मुर्मू” president of india
भारताच्या पंधराव्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांचा जन्म २० जून, १९५८ रोजी, ओडिशा येथे झाला. त्या आदिवासी जमातीतील ‘संथाल’ जमातीचे प्रतिनिधित्व करतात, त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात ओडिशातील सिंचन आणि ऊर्जा विभागात झाली. त्यांनी कनिष्ठ सहायक म्हणून नोकरी केली. द्रौपदी मुर्मू यांनी पूर्वी भुवनेश्वर येथील रमादेवी महाविदयालयातून कलाशाखेतून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. १९९७ साली ओडीशातील ‘रायरंगपूरनगर’ पंचायतीच्या निवडणुकीत त्या ‘नगरसेवक’ म्हणून निवडून आल्या आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. ‘मयूरभंज’ या मतदारसंघातून त्या दोनदा आमदार झाल्या. २००० ते २०२४ या कालावधीत त्यांनी ‘राज्यमंत्री’ म्हणून काम पाहिले. २०१५ मध्ये त्यांची झारखंडच्या पहिल्या महिला ‘राज्यपाल’ म्हणून त्यांची नियुक्ती झाली. तर दिनांक २१ जून, २०२२ रोजी त्यांची भारताच्या पंधराव्या ‘राष्ट्रपतीपदी’ निवड झाली. त्या पहिल्याच आदिवासी महिला राष्ट्रपती आहेत. भारतातील सर्वांत मोठ्या अनुसूचित जमातींपैकी एक असणाऱ्या ‘संथाल’ या आदिवासी जमातीतून त्या आहेत. ‘संथाल’ या आदिवासी जामातीतच प्राबल्यपूर्व भारतातील झारखंड, पश्चिम बंगाल, बिहार, ओडिशा आणि आसाम राज्यांमध्ये आहे. जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही देशाच्या राष्ट्रपती होण्याचा बहुमान त्यांनी मिळविला. द्रौपदी मुर्मू यांनी राजकारणाबरोबरच आपले समाजकार्य चालूच ठेवले. त्यांना २००० साली सर्वश्रेष्ठ विधानसभा सदस्यचा ‘नीलकंठ’ पुरस्कार देण्यात आला. त्यांनी आपले जीवन दलित आणि उपेक्षित घटकांना सशक्त करण्यासाठी आणि लोकशाही मूल्ये अधिक दृढ करण्यासाठी समर्पित केले. स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेल्या भारताच्या त्या पहिल्या ‘राष्ट्रपती’ असून आतापर्यंतच्या भारताच्या पहिल्या ‘तरुण राष्ट्रपती’ आहेत.
मराठी निबंध Marathi Nibandh
| अणु.क्र | निबंधाचे नाव | pdf download |
| 1 | ग्रंथ हेच गुरु | क्लिक करा |
| 2 | मोबाईल शाप की वरदान | क्लिक करा |
| 3 | मराठी असे आमची मायबोली | क्लिक करा |
| 4 | अपयशी हीच यशाची पहिली पायरी | क्लिक करा |
| 5 | नेमबाज मनू भाकर | क्लिक करा |
| 6 | आपत्ती व्यवस्थापन काळाची गरज | क्लिक करा |
| 7 | covid-19 : एक संकट की संधी | क्लिक करा |
| 8 | भारताच्या 15 व्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू | क्लिक करा |
| 9 | भारताची अवकाशीय उत्तुंग झेप | क्लिक करा |
| 10 | वर्तमान काळातील स्त्री | क्लिक करा |
| 11 | क्लिक करा | |
| 12 | क्लिक करा | |









