कोविड-१९ : एक संकट की संधी covid nineteen ek sankat
कोण कुठून आला हा विषाणू जणू स्फोट व्हावा हा परमाणू जगभर फिरला जीवनाचा सुकाणू आता करायचं तरी काय? मार्च २०२० मध्ये एका भयानक विषाणूने संपूर्ण जगभरातील लोकांना आपल्या विळख्यात लपेटून घेतले. विषाणूचा संसर्ग अगदी झपाट्याने सुरू झाला, चीनच्या ‘वुहान’ या प्रांतातून प्रवेश करून तो जगभरात सर्वांच्या समोर ‘आ वासून’ उभा राहिला आणि जगभर किड्यामुंग्यांप्रमाणे मनुष्यांची आयुर्मयादा ठप्प पडायला सुरुवात झाली. ‘आरोग्य हीच खरी संपत्ती’, या उक्तीप्रमाणे आपण आरोग्याच्या चांगल्या सवयींपैकी एक सवय म्हणजे ‘रोगराई टाळा हात स्वच्छ धुवा’, यालाच जगभर जास्त महत्त्व आले. ‘संसर्ग टाळा व कोरोनाला पळवा’ अशा सूचना सांगणारे संदेश जगभर फिरायला सुरुवात झाली. कोविड-१९ हा आपल्या सर्वांच्याच जीवनात आला आणि सोबत तो खूप काही घेऊन आला. अगदी साधे आजारपण केवळ सर्दी, खोकला व ताप या सामान्य आजारामुळे मनुष्याला होणारा त्रास व त्याने घेतलेले रौद्र व भीषण रूपही आपण सर्वांनी अनुभवले.
कोरोना सुरू झाल्यावर आपण स्वच्छतेच्या बाबतीत किती जागरूक होऊन गेलो, घराच्या स्वच्छतेत येणारे आपल्या कुटुंबातील सदस्य असणारे आपल्या जवळचा सखा असलेले, जंतुनाशक आपले मदतनीस बनले. घरात आणलेली प्रत्येक गोष्ट संशयास्पद असल्याप्रमाणे आपण भाजीपाला, दूध व इतर सामानाकडेही आपण संशयी नजरेने पाहायला लागलो व आपण खूपच काळजी घ्यायला लागलो. आला आला कोरोना आला, सर्व व्यवसाय, उद्योग ठप्प करून गेला… कोरोनाच्या बातम्या सर्वदूर पसरायला लागल्या आणि लॉकडाऊनच्या वार्ता सर्वदूर सुरू झाल्या. सारं काही बंद पडल; पण न थांबणारे रस्ते व त्यावरचा शुकशुकाटही या महामारीने आपल्याला दाखवला. दूध, भाजीपाला विक्रेते, किराणामालाचे व्यापारी यांना तर त्यांचा व्यवसाय चालवताना ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी द्विधा मनःस्थिती करणारे ठरले. लॉकडाऊन आलं आणि कधीही, कुणीही स्वप्नातही विचार केला नसेल इतक्या दिवस शाळांना कुलूप लावावे लागले.
आणि सर्व जगभर ‘ऑनलाइन चॅटिंग’ ही संकल्पना मान वर काढून आपला तोरा मिरवू लागली. मग सुरू झाल्या ऑनलाइन शाळा, भीम अॅप, गुगल-पे, फोनपे, ऑनलाइन शॉपिंग आणि इतर बरंच काही. आमने सामने संवादांतून होणाऱ्या चर्चा, बैठका, वादसंवादांतून सुटणारे प्रश्न या परिस्थितीत गुगल मीटिंग, झूम मीटिंग या माध्यमांतून सुटकेचा निःश्वास घेऊ लागले. मनुष्याचा समोरासमोर होणारा संवाद आता ‘गुगल मीट’ मुळे सुरू झाल्याने ‘वर्क फ्रॉम होम’ या नवीन संकल्पनेने घरीच ऑफिशिअल मीटिंग सुरू झाल्या आणि कंपन्यांची कामे सुरू झाली. घरातच ऑफिशिअल कामे करणारी मंडळी घरबसल्या ऑफिससारखी वावरताना दिसू लागली.
अहो इतकंच काय? कुणी स्वप्नातही विचार केला नसेल, की शाळा कधी ऑनलाइन भरतील, पण या काळात तेही पाहायला मिळाले. ऑनलाइन शिक्षण, ऑनलाइन प्रशिक्षण, ऑनलाइन परीक्षा, ऑनलाइन पालकसभा, ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा सर्व ऑनलाइन झळकायला लागले. खरं तर एका दृष्टिकोनातून पाहिलं तर ‘कोरोना’ एक संकट की संधी? असं म्हटलं, तर असं वाटतं की, या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हे एक संकट तर होतेच; कारण त्यामुळे जगभरात खूप मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाली. सर्व जगभर आर्थिक, क्रीडा, शैक्षणिक, व्यापारी, राजकीय या सर्वच क्षेत्रांत खूप मोठ्या प्रमाणावर न भरून निघणारी हानी यामुळे झाली. पण हाच कोरोना आपल्याला डिजिटल व्यवहार, नेट बौंकंग, ऑनलाइन मीटिंग, वर्क फ्रॉम होम या साऱ्या गोष्टी नव्याने शिकवून गेला. ‘सॅनिटायझर’ हा आपल्या सर्वांचाच आयुष्यात आलेला एक व्हायरस बरोबरचा जादुई किमयागार ठरला होता.
जो आपल्या सर्वांचाच अंगरक्षक बनून राहिला. कोरोनामुळे लोकांमध्ये आरोग्यविषयक काळजीसाठी एकमेकांसाठी झटणारे लोकही पाहायला मिळाले. निसर्गाबरोबर म्हणजेच परिसरासोबत कसे वागायचे, याची सूचना या रोगाने मानवाला दिली. मास्क, सॅनिटायझर विविध औषधे यांच्या वापराने मनुष्य कोरोनावर मात करू लागला. शेवटी कुठलीही गोष्ट आपल्या चांगल्या व वाईट गुणांसह जन्माला येत असते. तिला तिच्या गुणदोषांसह स्वीकारून पुढे चालण्यातच खरी मजा आहे. हेच जिवंत वास्तव आहे. प्रत्येक संकटाशी हात मिळवणी करून लढण्यानेच खरा विजय प्राप्त होतो, हे कोरोनाने दाखवून दिले.
मराठी निबंध Marathi Nibandh
| अणु.क्र | निबंधाचे नाव | pdf download |
| 1 | ग्रंथ हेच गुरु | क्लिक करा |
| 2 | मोबाईल शाप की वरदान | क्लिक करा |
| 3 | मराठी असे आमची मायबोली | क्लिक करा |
| 4 | अपयशी हीच यशाची पहिली पायरी | क्लिक करा |
| 5 | नेमबाज मनू भाकर | क्लिक करा |
| 6 | आपत्ती व्यवस्थापन काळाची गरज | क्लिक करा |
| 7 | covid-19 : एक संकट की संधी | क्लिक करा |
| 8 | भारताच्या 15 व्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू | क्लिक करा |
| 9 | भारताची अवकाशीय उत्तुंग झेप | क्लिक करा |
| 10 | वर्तमान काळातील स्त्री | क्लिक करा |
| 11 | क्लिक करा | |
| 12 | क्लिक करा | |









