माझी आई मराठी निबंध marathi essay on my mother 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

माझी आई मराठी निबंध marathi essay on my mother  माझी आई माझ्यासाठी खूप खास आहे. ती मला नेहमी प्रेमाने आणि काळजीपूर्वक वाढवते. आईच्या हातचे खाणे मला खूप आवडते, कारण तिच्या हातात खूप चव आहे. ती नेहमी माझ्या गरजा आणि इच्छांचा विचार करते. आई मला दररोज शाळेसाठी तयार करते आणि अभ्यासात मदत करते. ती मला चांगले वागण्याचे, इतरांचा आदर करण्याचे आणि कष्ट करण्याचे धडे देते. माझ्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर ती शांतपणे देते आणि मला समजावते. तिच्या चेहऱ्यावर नेहमी एक हसू असते, आणि ती कधीही थकत नाही असे मला वाटते. ती दिवसभर काम करते, तरीसुद्धा आमच्याशी खेळते आणि आमच्या आनंदासाठी वेळ काढते. माझ्या आईचा आदर करण्यासाठी मी नेहमी प्रयत्न करतो, कारण ती माझ्या जीवनाचा आधारस्तंभ आहे. आई माझी पहिली शिक्षिका आहे. ती मला नेहमी चांगले आणि वाईट यातील फरक समजावते. तिचे प्रत्येक शब्द माझ्यासाठी मार्गदर्शक असतात. जेव्हा मला एखादी अडचण येते, तेव्हा ती मला धीर देते आणि योग्य मार्ग दाखवते. आईच्या प्रेमात आणि तिच्या मार्गदर्शनात मी नेहमी सुरक्षित आणि आनंदी वाटतो. तिच्या मार्गदर्शनाने मी आयुष्यात यशस्वी होण्याचे स्वप्न पाहतो. आई मला नेहमी मेहनत आणि प्रामाणिकपणाचे महत्त्व शिकवते. ती मला स्वप्न बघायला शिकवते, पण त्यासाठी मेहनत घेण्याची प्रेरणा सुद्धा देते. जेव्हा मी निराश होतो, तेव्हा ती माझा आत्मविश्वास वाढवते आणि मला पुढे जाण्याचे बळ देते. आईचे आशीर्वाद आणि पाठिंबा मला नेहमी प्रेरित करतात.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 

माझी आई मराठी निबंध

आई हा जगातील अतिशय प्रेमळ आणि सुंदर शब्द आहे. आई हा दोन अक्षरी साधा आणि सोपा शब्द असूनही त्याच्यात संपूर्ण जगाला सामावून घेण्यांची ताकद आहे. आई ही देवाचं दुसरं रूप आहे. या जगात तिची जाग कुणीचं घेऊ शकत नाही. माझी आई खूप प्रेमळ आहे तिचे नाव अंजली आहे. ती रोज सकाळी लवकर उठते. घर- अंगण स्वच्छ करते. ती नियमित देवपूजा करते. ती मला शाळेसाठी तयार करते. मला वेळेवर अभ्यास करायला लावते. ती छान स्वयंपाक बनवते. ती घरातील सर्वांची खूप काळजी घेते. माझी आई माझी चांगली मैत्रिण आणि गुरु आहे. ती माझ्या मनातील कोणतीही गोष्ट ओळखते. मी तिच्याशी प्रत्येक गोष्ट शेअर करतो. माझी आई मी चांगले काम केल्यावर मला शाबासकी देते. माझ्याकडून एखादी चूक झाल्यावर मला ती पुन्हा होऊ नये म्हणून खूप समजावून सांगते. माझी आई माझी प्रेरणा आहे. ती माझ्यावर उत्तम संस्कार करते. मी माझ्या जीवनात यशस्वी व्हावे म्हणून मार्गदर्शन करते. मी स्वतःला खूप भाग्यवान मानतो कारण मला अशी आदर्श आई मिळाली आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 

माझी आई

आई माझा बरू, आाई कल्पतरू सौख्याचा सामरु, आई माझी. मांगल्यचे सार, अमृताची धार प्रितीचे माहेर, आई माझी. “आ’ म्हणजे आत्मा आणि ‘ई’ म्हणजे ईसर । यादोद्योगी सुरेख संगम न्हणजे आई होय. ईश्वराला प्रत्येकाची काकनी होणे, साया व प्रेम देणे शक्य नव्हते कृणून ईशराने प्रत्येकासाठी एक आई बनवली आईद्धि अशी शिदोरी आहे कि जी सरतही नाही आणि उरतही नाही. आई म्हणजे साक्षात परमेश्वराची मूर्तीच असते. ते म्हणतात ना. स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी हे शाश्वत सत्य आहे माझी आई खूप प्रेमळ आहे. ती नेहमी हसतमुख असते माझ्या जाईला घर सजवायला आवडते ती घरातील सर्व काम करते. ती चवदार जेवण करते. आईने केलेले जेवण मला खूप आवडते. घरात कोणी आजारी पडले, तर माझी आई खूप काळजी होते. आई माझ्या अभ्यासातही मदत करते. ती माझे लाड करते. पण माझे काही चुकले तर ती राभावते. मी चांगले काम केले कीनिला आनंद होते. म्हणून मला माझी आई खूप आवडते.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

माझी आई निबंध

“स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी” हे स्वामी विवेकानंदांचे वाक्य अगदीच खरं आहे. आपल्याजवळ खूप धन आहे, पण जर मायेने डोक्यावर हाथ फिरवणारी आई नाही तर मग आपले जीवन व्यर्थ आहे. जेव्हा एक बालक बोलायला शिकतो तेव्हा पहिले अक्षर तो बोलायला शिकतो ते म्हणजे आई. माझ्या आईबद्दल मी काय सांगू, माझ्या जीवनातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती आहे ती. प्रत्येक क्षणी, जीवनातील प्रत्येक कठीण वाटेवर माझ्या सोबत उभी राहते ती माझी आई. लहानपणा पासून आज पर्यंत मी तिला बघतो आहे. पहाटे सर्वप्रथम ती उठते, मला उठवते, शाळे करता तैयार करते, माझा नाश्ता बनवते, माझी बैग पैक करण्यास मदत करते। माझा डब्बा सुद्धा मी शाळेत निघायच्या आत तयारच असतो. ही तिची रोजचीच दिनचर्या आहे। सकाळी लवकर उठणे, मला शाळेत व बाबांना ऑफिसामध्ये पाठवणे, घरकाम करणे, संध्याकाळी माझा अभ्यास घेणे व माहिती नाही आणखी किती काम ती करते ते. आणि एवढं केल्यानंतर ही कधीच तिच्या चेहरा वर तो त्रास नाही दिसत कि कधी कंटाळा नाही दिसत. एकदा तर मला खूप ताप आला असताना ती रात्रभर माझ्या शेजारी बसून पाण्याची पट्टी माझ्या माथ्यावर ठेवत बसली होती। सदा न कदा माझ्या आवड़ीं-निवड़ींची काळजी घेत असते माझी आई. मला जे चांगले संस्कार लाभले आहेत ते तुझीच देणगी आहे. मी कितीही आईबद्दल लिहिले तरी ते कमीच वाटणार.. पण आईला नेहमी आनंदात ठेवणं व माझ्याकरिता घेतलेल्या कष्टांच चीज करणं हेच माझ्या जीवणाचं खरं उद्देश्य आणि लक्ष्य आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

माझी आई निबंध

जेव्हा कधी आपल्या आयुष्यामधे कठीन प्रसंग येतो तेव्हा सगळ्यात आधी मनात विचार येतो तो म्हणजे आई, कारण प्रतेक क्षणाला आईच आपल्यांना कठीण परीस्तिथी मधून बाहेर काढते म्हणूनच सगळ्यांना आपली आई प्रिय असते जशी मला माझी आई प्रिय आहे. माझ्या आईच नाव “वंदना केशव राव” आहे. माझ्या आई बदल सांगायच झाल तर शब्द कमी पडतील, तरीही मी माझ्या आई बदल थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. मला लक्षात आहे जेव्हा मि लहान होतो म्हणजे मि शाळेत जायला सुरवातच केली होती, पण तुमच्या प्रमाणे मला ही शाळेत जायला त्यावेळी काही आवडेना. मि घरी शाळेत नाय जायचा हट्ट करायचा आणी शाळेत न जाण्यासाठी रडायचा. मि रडायला लागला कि माझे बाबा मला ओरडायला सुरवात करायचे आणि आई येऊन मला समजवत असे कि बाला असे शाळेत जायला रडू नये, आणि तिच्या मायेने मि शांत होऊन शाळेत जायचा. माझी आई मला स्वता शाळेत सोडायला व घ्यायला येत असे. आईची ममता कधीच कमी होत नाही जेव्हा घरा मदे कठीण प्रसंग येतो तेव्हा ति आईच असते जि तीच सुख सोडून आपल्यांना आनंदी ठेवते आई कधीही स्वताचा विचार न करता आधी आपल्या घराचा विचार करते अशी आपल्या आईची ममता असते. शाळेचा अभ्यास असेल किंव्हा आयुष्यामदे काही अडचण असेल तर सर्वात आधी मदत करणारी आईच असते. कधी आपल्यांना बर नसेल तर रात्रभर जागून आपली देखबाल करणारी आईच असते. स्वताचा घास न खाता आपल्या मुलांना देणारी वेक्ती म्हणजे आईच असते. आई हा ममतेचा सागर आहे, आपल्यावर झालेले संस्करणमदे आपल्या आईचा मोठा वाटा असतो. आई नेहमी आपल्या मुलांनवर आयुषभर चंगले संस्कार करते. आपल्या आईची तुलना जगातल्या कोणाशी हि करता येणार नाही अशी आपली आई असते. माझ्या साठी माझी आईच माझ सगळ काही आहे, तीच माझा देव आहे. संपूर्ण जगात मला सगळ्यात जास्ती प्रेम आहे तर ते माझ्या आईवर. तिची माझ्या वर असणारी मायेची तुलना करता येणार नाही. आयुष्यात कधी काही लागल तर होठा वर येणार पहिला शब्द म्हणजे “आईग”. मला मझी आई खूप प्रिय आहे व मला माझी आई खूप-खूप आवडते.

➖➖➖➖➖➖➖➖➖

निबंध संग्रह खालील प्रमाणे

अं.क्र.निबंधाचे नाववाचन लिंक
1.माझा आवडता पक्षी मोरक्लिक करा 
2.माझा आवडता प्राणी कुत्राक्लिक करा
3.माझा आवडता प्राणी ससाक्लिक करा
4.माझा आवडता सण होळीक्लिक करा
5.माझा आवडता सण दिवाळीक्लिक करा
6.माझा आवडता सण बैलपोळाक्लिक करा
7.माझी शाळाक्लिक करा
8.माझी आईक्लिक करा
9.जंगल तोड एक समस्याक्लिक करा
10.माझा आवडता छंदक्लिक करा
11.विज्ञानाचे चमत्कारक्लिक करा
12.मातृभाषेचे ऋणक्लिक करा
13.झाडे नसती तरक्लिक करा
14.माझा आवडता खेळक्लिक करा
15.माझी आईक्लिक करा
16. क्लिक करा
17. क्लिक करा
18. क्लिक करा
19. क्लिक करा
20. क्लिक करा
21. क्लिक करा
22. क्लिक करा
23. क्लिक करा
24. क्लिक करा
25. क्लिक करा
26. क्लिक करा
27. क्लिक करा
28. क्लिक करा
29. क्लिक करा
30. क्लिक करा
31. क्लिक करा
32. क्लिक करा
33. क्लिक करा
34. क्लिक करा
35. क्लिक करा
36. क्लिक करा
37. क्लिक करा
38. क्लिक करा
39. क्लिक करा
40. क्लिक करा
41. क्लिक करा
42. क्लिक करा
43. क्लिक करा
44. क्लिक करा
45. क्लिक करा
46. क्लिक करा
47. क्लिक करा
48. क्लिक करा
49. क्लिक करा
50. क्लिक करा
51. क्लिक करा
52. क्लिक करा
53. क्लिक करा
54. क्लिक करा
55. क्लिक करा
56. क्लिक करा
57. क्लिक करा
58. क्लिक करा
59. क्लिक करा
60. क्लिक करा
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   

1 thought on “माझी आई मराठी निबंध marathi essay on my mother ”

Leave a Comment