माझा आवडता छंद my favourite hobby marathi essay 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

माझा आवडता छंद my favourite hobby marathi essay 

कुणाला छंद असतो गाण्याचा, तर कुणाला गड किल्ले घेण्याचा, तर कोणाला पोस्टाची तिकिटे, जुनी नाणी किंवा विविध जुन्या दुर्मिळ वस्तू जमवण्याचा काहीजण एकांतात सतार छेडत बसतात. कोणी पुस्तकांना आपले मित्र मानतात तर कोणी कागदावर कुंचल्याने चित्र रेखाटण्याचा आनंद लुटतात. माझा छंद मात्र जरा मुलखावेगळा आहे. लहानपणापासून मला आवड आहे ती माणसे जोडण्याची जसजसा मी मोठा होत गेलो. तशी माझी आवड सतत वाढतच गेली.

माझ्या लहानपणापासून मला आपल्या घरी खूप माणसे यावे घरात वर्दळ वाढावी गडबड उडाली असे खूप खूप वाटे. सुट्टीचा वार रविवार आणि सुट्टीचा मे महीना मला अत्यंत प्रिय आहे. कारण सुट्टी मध्ये खूप पाहुणे घरी येतात उन्हाळ्याची सुट्टी येण्यापूर्वीच मी माझ्या आप्तांना मित्रांना आमंत्रणे पाठवतो. त्यांना वाटते की किती प्रेमळ लाघवी मुलगा आहे. पण माझे माणूसवेडाचे महत्व त्यांना अज्ञात असते.

मला कोणतीही माणसे आवडतात. आम्ही जेव्हा कालनीण राहायला आलो. तेव्हा मी प्राथमिक शाळेत होतो. मोकळा वेळ भरपूर असे. तेथे बांधकाम करणाऱ्या माणसांची मी दोस्ती करत असे. बांधकामांवर खूप स्त्रीया असत आणि त्यांच्याबरोबर त्यांची लहान मुलेही असत. त्या मुलांबरोबर मी खूप खेळत असे. त्यांच्याकडून मी विटी दांडू चा खेळ शिकलो ही मुले लहान वयातच आपल्या आई-वडिलांना केवढी मदत करतात. ती मुले मोठी होऊन स्वतंत्रपणे काम करू लागली आहेत.

माझा छंद सतत वाढतच गेला वर्गातील दोस्तच काय पण शाळेतील इतर वर्गातील आणि मुलांशी मैत्री जमली. मला बोलायला खूप आवडते पण तितकेच मला इतरांचे विचारही ऐकायला आवडतात. त्यामुळे माझा दुरचा प्रवासही कधी कंटाळवाणा होत नाही. प्रवासात अनेक ओळखी होतात आणि अनुभव ऐकायला मिळतात आणि अनेकांनी मैत्रीचे संबंध निर्माण होतात. गाडीत माल विकणाऱ्या फेरीवाल्या बरोबर ही मला गप्पा मारायला आवडतात. मी माझ्या अनुभवातून मित्र जोडण्याची व मैत्री करण्याची एक शास्त्र तयार केले आहे. मी जोडलेली असंख्य माणसे मित्रमंडळींना सदैव माझ्याबरोबर असतात. कधी प्रत्यक्ष कधी पत्ररूपाने तर कधी छायाचित्रांच्या स्वरूपात.

माझ्या मित्रासाठी मला वेळ द्यावा लागतो अगदी परीक्षेच्या दिवसातही एखाद्यासाठी माझा वेळ खर्चावा लागतो पण त्यात मला आगळा आनंद मिळतो माझे सुख सर्वस्व या छंदात सामावलेले आहे छंद माझा वेगळा आनंद माझा वेगळा हेच खरे.

Leave a Comment