“भारताची अवकाशीय उत्तुंग झेप वाटचाल नव्या भारताची” मराठी निबंध marathi nibandh
२३ ऑगस्ट, २०२३ या ऐतिहासिक दिनी भारतीय तिरंग्याने वाढवली देशाची शान ! भारताने पटकावला दक्षिण ध्रुवावर पोहोचण्याचा प्रथम मान ! आभार मानूनी इस्रोच्या तज्ज्ञ शास्त्रज्ञांचे करू या अभिनंदन, त्यांच्या उज्ज्वल यशाचे ‘इस्रो’ अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने दि. १८ नोव्हेंबर, २०२२ ला ‘विक्रम सबार्टिकल’ या भारताच्या पहिल्या खाजगी रॉकेटचे अंतराळामध्ये प्रक्षेपण करून इतिहास घडवला. स्कायरूट एअरोस्पेस कंपनीने विकसित केलेले ‘विक्रम ५’ हे रॉकेट श्रीहरीकोटा येथून अवकाशात झेपावले आणि भारतीयांसाठी हा एक ऐतिहासिक क्षण तरला आहे. भारताच्या खाजगी अवकाश क्षेत्रातील कामगिरीतील हा एक महा टप्पा ठरला. ‘इस्रो’च्या प्रवासातील हा अविस्मरणीय क्षण ठरला आहे. भारतीय स्टार्टअपसाठी सुद्धा हा एक निर्णायक व महत्त्वाचा टप्पा आहे. जगातील या प्रक्षेपणामुळे जगाच्या प्रमुख अंतराळ क्षेत्रामध्ये भारताने महत्त्वाचे स्थान मिळविले आहे. अवकाश क्षेत्रातील सुधारणांनी स्टार्टअप उदद्योगातील अभिनव संशोधन क्षमताही खुल्या केल्या आहेत. भारत आज जगातल्या होतकरू देशांना क्षमतानिर्मिती, सूक्ष्म (नॅनो) उपग्रहासह इतर उपग्रहनिर्मितीसाठी मदत करत असल्याने आज संपूर्ण जग भारताकडे प्रेरणास्थान म्हणून पाहत आहे. भारताचे हे यश म्हणजे गेल्या काही वर्षांत केलेल्या सुधारणांचे फलित आहे. फक्त भारताच्याच नाही, तर जगाच्या इतिहासात हा ऐतिहासिक क्षण नोंदवला गेला, कारण भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपले चंद्रयान उतरवण्याचा पहिला मान पटकवला आहे. चांद्रयानाचे लैंडर चंद्रावर उतरले आणि इस्रोच्या गौरवशाली इतिहासात एक यशाचे पाऊल पडले व भारताच्या यशाचा सूर्य थेट चंद्रावर उगवला. आपल्या भारत देशाने १४ जुलै रोजी चांद्रयान ३ श्रीहरीकोटा येथून प्रक्षेपित केले होते. त्यानंतर ५ ऑगस्ट या दिवशी हे चांद्रयान चंद्राच्या कक्षेत यशस्वीरीत्या पोहचले, तर २३ ऑगस्ट या दिवशी हे चांद्रयान-३ यशस्वीरीत्या चंद्रावर उतरले व यामुळे भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच ‘इस्रो’ने अत्यंत अभिमानास्पद भरारी घेऊन आपल्या भारत देशाच्या शिरपेचात चांद्रयान-३ मोहीम यशस्वीपणे पूर्ण करून मानाचा तुरा खोवला. भारतीयांनी पृथ्वीवर संकल्प केला आणि ‘इस्रो’च्या संशोधकांनी तो संकल्प चंद्रावर साकारला. ज्यामुळे भारत आज चंद्रावर आहे. यामुळे ‘इस्रो’चे प्रमुख एस. सोमनाथ व संपूर्ण भारतीय शास्त्रज्ञांचा, संशोधकांचा आम्हाला अभिमान आहे. या कामगिरीमुळे आपल्या भारत देशाला ‘तांत्रिक शक्ती’ म्हणून जगभरातून मोठे स्थान प्राप्त झाले आहे. म्हाणूनच २३ ऑगस्ट हा दिवस ‘नॅशनल स्पेस डे’ म्हणून गौरवण्याचे जाहीर केले. ‘चांद्रयान- ३’ मध्ये लँडर मॉड्यूल (LM) एक प्रोपल्शन मॉड्यूल (PM) आणि एक रोव्हर असेल. लँडरला ‘विक्रम’ म्हणतात आणि रोव्हरला ‘प्रज्ञान’ म्हणतात. चंद्राच्या पृष्ठभागावर सॉप्ट लैंडिंगसाठी विक्रम जबाबदार असेल, तर प्रोपल्शन मॉड्यूल आणि रोव्हर कॉन्फिगरेशन (जुळवून) घेऊन जातात आणि संपूर्ण मोहिमेस प्रोपल्शन आणि वृत्ती नियंत्रण प्रदान करतात. रोव्हरचा वापर चंद्राच्या पृष्ठभागाचे अन्वेषण करण्यासाठी आणि वैज्ञानिक माहिती गोळा करण्यासाठी केला जातो.
मराठी निबंध Marathi Nibandh
| अणु.क्र | निबंधाचे नाव | pdf download |
| 1 | ग्रंथ हेच गुरु | क्लिक करा |
| 2 | मोबाईल शाप की वरदान | क्लिक करा |
| 3 | मराठी असे आमची मायबोली | क्लिक करा |
| 4 | अपयशी हीच यशाची पहिली पायरी | क्लिक करा |
| 5 | नेमबाज मनू भाकर | क्लिक करा |
| 6 | आपत्ती व्यवस्थापन काळाची गरज | क्लिक करा |
| 7 | covid-19 : एक संकट की संधी | क्लिक करा |
| 8 | भारताच्या 15 व्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू | क्लिक करा |
| 9 | भारताची अवकाशीय उत्तुंग झेप | क्लिक करा |
| 10 | वर्तमान काळातील स्त्री | क्लिक करा |
| 11 | क्लिक करा | |
| 12 | क्लिक करा | |







