राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित मराठी निबंध marathi essay on mahatma gandhi 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित मराठी निबंध marathi essay on mahatma gandhi 

देशामध्ये प्रत्येक कार्यालयामध्ये आपण महात्मा गांधी यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी करत असतो महात्मा गांधी यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अटक प्रयत्न केले शांततेच्या मार्गाने त्यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले दरवर्षी आपण आपल्या शाळेमध्ये देखील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी करत असतो या जयंतीनिमित्त सुंदर मराठी निबंध खालील प्रमाणे सादर केलेले आहे

महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनचंद करमदास गांधी आहे.महात्मा गांधींचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला.भारतात दरवर्षी २ ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंती साजरा केली जाते.महात्मा गांधींना देशाचे राष्ट्रपिता म्हटले जाते. त्यांना ही उपाधी थोर स्वातंत्र्यसेनानी सुभाषचंद्र बोस यांनी दिली. बोस यांनी जवाहरलाल नेहरू सोबत इंडिपेंडन्स फॉर इंडिया लीगची स्थापना केली. महात्मा गांधींना ‘राष्ट्रपिता’ म्हणून संबोधणारे ते पहिले व्यक्ती होते.

महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून ९ जानेवारी १९१५ भारतात परतले. सध्या हा दिवस भारतात प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा केला जातो. ९ जानेवारी या दिवशी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून जहाजाने मुंबईला पोहोचले. दक्षिण आफ्रिकेत दोन दशकांहून अधिक काळ त्यांनी वास्तव्य केले.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली. महात्मा गांधी हे सत्य आणि अहिंसेच्या धोरणासाठी ओळखले जातात. महात्मा गांधी म्हणून प्रसिद्ध असलेले मोहनदास करमचंद गांधी हे भारतातील एक प्रमुख राजकीय आणि आध्यात्मिक नेते होते. ज्यांनी १९२२ मध्ये असहकार चळवळ आणि १९३० मध्ये मिठाचा सत्याग्रह आणि नंतर १९४२ मध्ये भारत छोडो आंदोलनात स्वातंत्र्य लढ्यात देशाचे नेतृत्व केले. भारतात ‘बापू’ म्हणून ओळखले जाणारे, महात्मा गांधींनी भारतातील ब्रिटिश राजवटीविरुद्ध शस्त्र म्हणून अहिंसक प्रतिकार करण्याचे धोरण स्वीकारले आणि अहिंसेच्या तत्त्वाचे पालन केले. त्यांचा संघर्ष भारतापुरता मर्यादित नाही, कारण गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेतील नागरी हक्क चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांना न्याय आणि समानतेचा अधिकार मिळवून दिला होता. त्यांचा जन्मदिवस २ ऑक्टोबर हा दिवस भारतात ‘गांधी जयंती’ म्हणून साजरा केला जातो. यादिवशी देशात राष्ट्रीय सुट्टी दिली जाते. तसेच जगभरात ‘आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस’ म्हणून साजरा केला जातो.

महात्मा गांधींनी इ.स. १९२१ मध्ये

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची सूत्रे सांभाळल्यानंतर गरिबी निर्मूलन, आर्थिक स्वावलंबन, स्त्रियांचे समान हक्क, सर्व-धर्म-समभाव, अस्पृश्यता निवारण आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वराज्य यासाठी देशभरात चळवळ चालू केली. गांधींनी भारतातील ग्रामीण गरिबांची ओळख म्हणून स्वतः कातलेल्या सुताचे धोतर आणि शाल अशी साधी राहणी स्विकारली. त्यांनी शाकाहाराचा अवलंब केला आणि अनेकदा आत्मशुद्धीसाठी आणि राजकीय चळवळीसाठी साधन म्हणून दीर्घ उपवास केले. ते एका स्वयंपूर्ण निवासी समुदायात राहू लागले आणि साधे अन्न खाऊ लागले. गांधी हे आजीवन साम्प्रदायीकातावादाचे (सम्प्रदायांवर राजकारण करण्याचे) विरोधक होते आणि ते मोठ्या प्रमाणात सर्व धर्म आणि पंथ यांच्यापर्यंत पोहोचले. ढासळत जाणाऱ्या खिलाफत चळवळीला त्यांनी आधार दिला आणि ते मुस्लिमांचे नेते बनले. इ.स. १९३० मध्ये इंग्रजांनी लादलेल्या मिठावरील कराविरोधात त्यांनी हजारो भारतीयांचे ४०० कि.मी. (२५० मैल) लांब दांडी यात्रेमध्ये प्रतिनिधित्व केले. इ.स. १९४२ मध्ये त्यांनी इंग्रजांविरुद्ध भारत छोडो आंदोलन चालू केले. या आणि यासारख्या इतर कारणांसाठी त्यांना भारतात आणि दक्षिण आफ्रिकेत अनेक वेळा तुरुंगवास भोगावा लागला.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा

Leave a Comment