राजमाता जिजाऊ जयंती निमित्त सोपे भाषण rajmata jijau jayanti 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राजमाता जिजाऊ जयंती निमित्त सोपे भाषण rajmata jijau jayanti 

आज 12 जानेवारी, राजमाता जिजाऊ यांची आज जयंती ! आज छत्रपती शिवाजी महाराज नावाच्या वादळाला जन्म देणाऱ्या एका वाघिणीचा जन्मदिवस ! आजचाच तो दिवस ज्या दिवशी सिंदखेडराजा येथील लखुजीराव जाधवांच्या घरी जिजाऊ जन्मल्या. पुढे विदर्भातील जाधवांची लेक मराठवाड्यातल्या भोसल्यांची सून झाली आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना जन्म देऊन स्वराज्य जननी झाल्या. मातृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व या तीन गुणांचा संगम असलेल्या जिजाऊंनी कोवळ्या वयातच शिवरायांमध्ये स्वराज्याचा स्वप्न पेरलं. अठरा पगड जातीतील मावळे आणि जीवाला जीव देणारे साथीदार सोबतीला घेऊन महाराजांनी अविरत संघर्षातून हे स्वप्न सत्यात उतरवलं. दिनांक 6 जून 1674 रोजी शिवरायांचा राज्याभिषेक झाला आणि माँसाहेब जिजाऊ स्वराज्यजननी झाल्या. “माँसाहेब जिजाऊ म्हणजे मदिराचा उंच कळस ! माँसाहेब जिजाऊ म्हणजे अंगणातील पवित्र तुळस ! माँसाहेब जिजाऊ म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी ! माँसाहेब जिजाऊ म्हणजे वाळवंटात प्यावे असे थंड पाणी ज्यांनी फक्त छत्रपती शिवराय घडविले नाही तर छत्रपती संभाजी महाराज नावाचा वाघाचा छावा सुद्धा घडविला. मित्रहो आजची सामाजिक, राजकीय परिस्थिती पाहता पुन्हा एकदा आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची गरज आहे असे वाटते, म्हणून शेवटी एवढेच म्हणेन की,

“घडविण्या अजेय तो महाराष्ट्राचा विधाता

पुन्हा जन्म घ्यावा, जिजाऊ राजमाता !!”

Related posts:

Leave a Comment