26 जानेवारी प्रजासत्ताक दिन प्रभावी मराठी भाषण speech on republic day
सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावर विराजमान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे तसेच माझे गुरुजन वर्ग आणि माझ्या बाल मित्रांनो आज आपण सर्वजण भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत त्यानिमित्ताने मी तुम्हाला भारतीय प्रजासत्ताक दिना विषयी दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांततेने ऐकून घ्याल अशी विनंती करते.
26 जानेवारी प्रजासत्ताक दिन हा दिन आपल्या प्रत्येक भारतीयांसाठी फार महत्वाचा आहे. दर वर्षी जानेवारी महिन्याच्या २६ तारखेला भारताचा ‘प्रजासत्ताक दिन’ साजरा केला जातो. आपला भारत देश १५ ऑगष्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. पण आपली राज्यघटना २६ जानेवारी १९५० रोजी अमलात आली. तो दिवस म्हणजे प्रजासत्ताक दिन होय.
आपला भारत हे एक मोठे लोकशाही राज्य आहे म्हणजे हे लोकांचे, लोकांनी, लोकांसाठी चालविलेले राज्य आहे. लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही होय. हा अधिकार भारताच्या घटनेनुसार २६ जानेवारी १९५० साली मिळाला. त्यादिवसापासून प्रजेची सत्ता सुरु झाली. प्रजा म्हणजे भारतीय लोक आणि सत्ताक म्हणजे भारतीय लोकांच्या हातात सत्ता होय.
हा दिवस भारतात सर्वत्र साजरा केला जातो. भारताची राजधानी दिल्ली मध्ये या दिवशी सकाळी ध्वजारोहणा नंतर लालकिल्ल्यावरून आपल्या देशाच्या पंतप्रधानांचे राष्ट्राला उद्देशून भाषण होते. या समारंभाचा मुख्य कार्यक्रम भारताची राजधानी दिल्ली येथे होतो. या कार्यक्रमात भारतातील सर्व घटकराज्ये सहभाग घेतात. भारताच्या सर्व क्षेत्रातील वैभवाचे दर्शन घडविणारी मोठी मिरवणूक काढतात. प्रत्येक राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात, शहरांत आणि गावागावातून ‘प्रजासत्ताक दिन’ साजरा होतो. शाळांतून, सरकारी कार्यालयांतून व अन्यत्रही सकाळी ध्वजवंदन व अन्य मनोरंजनाचे कार्यक्रम होतात. ठिकठीकाणी प्रभातफेरी भाषणे, प्रदर्शन यांचे आयोजन केले जाते. धाडशी मुलांचा, आणि विविध क्षेत्रात कर्तुत्व गाजविनार्यांचा या दिवशी शासनाकडून गौरव केला जातो. अनेक ठिकाणी रात्री रोशनाई केली जाते. प्राथमिक शाळांतून विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते सांस्कृतिक कार्यक्रम क्रीडा स्पर्धा यांचे आयोजन केले.
शाळांमध्ये रांगोळी, तोरणे-पताका, विविध सजावट तसेच आपला राष्ट्रध्वज ध्वजारोहण कार्यक्रम घेतला जातो. विद्यार्थी तिरंगा ध्वज मोठ्या उत्साहाने हातात घेऊन भारत मातेचा जयघोष करीत प्रभात फेरीत भाग घेतात. प्रभात फेरीच्या वेळेस विविध घोषणा दिल्या जातात भारत माता की जय वंदे मातरम अशा प्रकारच्या घोषणांनी पूर्ण गाव खेड्यामध्ये प्रभात फेरी काढली जाते. सर्व विध्यार्थी अध्यापक, मुख्याध्यापक यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण केले जाते. शाळेतील, एन. सी. सी. व स्काउट चे या विद्यार्थ्यांचे संचालन घेतले जाते. शाळेतील वाद्य -वृंदा वरही राष्ट्रीय गाणी वाजविली जातात. तसेच मुले मुली आपापल्या आवडीची राष्ट्रगीते गातात. भाषणे करतात, नंतर सर्वजण राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतो. गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच शिक्षक वृंद मुख्याध्यापक यांच्याकडून गुणवान विद्यार्थ्यांचा सत्कार सन्मानचिन्ह देऊन केला जातो.
या दिवशी संपूर्ण भारतभर आनंदाचे व उत्साहाचे वातावरण असते. आजचा दिवस म्हणजेच खऱ्या अर्थाने शूरवीरांचे स्मरणाचा दिवस असतो या दिवशी अनेक गावांमध्ये देश सीमेवर लढणाऱ्या जवानांच्या परिवाराच्या हाताने ध्वजारोहण कार्यक्रम घेतले जातात. हा आपल्या देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांचा खऱ्या अर्थाने सन्मान आहे. लोकशाहीच्या उदघोषाचा दिवस ! प्रत्येक भारतीयाने या महत्वाच्या दिवशी देशासाठी देशहितकारक कार्य करण्याची प्रतीज्ञां केलीच पाहिजे, आणि त्यानुसार आचारा विचाराने आपले वर्तन असले पाहिजे. असे राष्ट्रीय दिन साजरे केल्या मुळे प्रत्येकाच्या मनातील राष्ट्रीय भावना राष्ट्र प्रेम अधिक उसळून, उजळून निघते. आपल्या भारतीय देशाला सुजलाम सुफलाम बनवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रतिज्ञा करायला हवी की आपल्या देशातून भ्रष्टाचार समूळ नष्ट झाला पाहिजे. तसेच देशावर येणाऱ्या संकटा विरोधात सर्वांनी एकत्रित लढले पाहिजे. ही सर्वांची खरी जबाबदारी आहे. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते.
जय हिंद जय भारत
प्रजासत्ताक दिन भाषण क्रमांक- 1
प्रजासत्ताक दिन भाषण क्रमांक- 2
प्रजासत्ताक दिन भाषण क्रमांक- 3
प्रजासत्ताक दिन भाषण क्रमांक- 4
प्रजासत्ताक दिन भाषण क्रमांक- 5
प्रजासत्ताक दिन इंग्रजी भाषण क्रमांक- 6
प्रजासत्ताक दिन भाषण क्रमांक- 7
प्रजासत्ताक दिन इंग्रजी भाषण क्रमांक- 8
प्रजासत्ताक दिन भाषण क्रमांक- 9
प्रजासत्ताक दिन भाषण क्रमांक- 10








