राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त सुंदर मराठी भाषण rajarshi shahu maharaj jayanti bhashan
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत मी राजर्षी शाहू महाराज यांच्या विषयी दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांततेने ऐकून घ्यावे ही नम्र विनंती
दरवर्षीप्रमाणे आपण राजर्षी शाहू महाराजांची जयंती साजरी करतो याही वर्षी मोठ्या उत्साहात आणि आनंदात राजर्षी शाहू महाराज यांची जयंती आपल्या शाळेमध्ये आपण साजरी करत आहोत
राजर्षी शाहू महाराज हे कोल्हापूर संस्थानचे छत्रपती, बहुजनांचा आधार व थोर लोकराजा होते. त्यांचा जन्म २६ जून १८७४ रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव यशवंत, आईचे नाव राधाबाई व वडिलांचे नाव जयसिंगराव घाटगे असे होते. १७ मार्च १८८४ रोजी चौथे शिवाजी महाराज यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी यशवंताला दत्तक घेतले व त्यांचे नव्याने ‘शाहू’ असे नामकरण केले. राजर्षी शाहू महाराजांनी समाजाला शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही असा संदेश दिला. त्यांनी शिक्षण, कृषी, उद्योग, कला, क्रीडा इ. क्षेत्रात लोककल्याणकारी कार्य केले. दुर्देवाने, राजर्षी शाहू महाराज यांनी ६ मे १९२२ रोजी अखेरचा श्वास घेतला.
अशा या महान जनतेचा राजा,
लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांना माझे कोटी कोटी प्रणाम !
धन्यवाद ! जय हिंद, जय महाराष्ट्र !







