बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार दुर्बल व वंचित घटकाकरिता २५ टक्के ऑनलाईन प्रवेश सन २०२६-२७ प्रकियेबाबत सुधारित सूचना right to education online addmission 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार दुर्बल व वंचित घटकाकरिता २५ टक्के ऑनलाईन प्रवेश सन २०२६-२७ प्रकियेबाबत सुधारित सूचना right to education online addmission 

संदर्भ:-शासन निर्णय क्र आरटीई-२०२५/प्र.क्र/०८/एसडी-१/दि.१२/२/२०२६

Pdf download

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ (सी) (१) नुसार दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना स्वयं अर्थसहाय्यित शाळा, विना अनुदानित शाळा या शाळांमध्ये आरटीई २५ टक्के सन २०२६-२७ या वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. शासन निर्णय दि.१२/२/२०२६ नुसार बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार वंचित व दुर्बल घटकांतील बालकांना २५ टक्के प्रवेश प्रकिया राबविणेबाबत सुधारित सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार क्षेत्रिय स्तरावरील सर्व संबंधित कार्यालय व बालकांच्या पालकांनी खालील सुचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी.

बालकांच्या पालकांकडून आरटीई २५ टक्के प्रवेश ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया दि.१७/२/२०२६ ते दि.१०/३/२०२६ या कालावधीपर्यंत https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेत स्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

१. ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शक सूचना

१. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ (सी)

(१) नुसार दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना स्वयं अर्थ सहाय्यित शाळा / विनाअनुदानित शाळा या शाळांमध्ये इयत्ता १ ली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग या स्तरावर २५ टक्के प्रवेश प्रक्रियेकरिता पालकांना https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेत स्थळावर जाऊन अर्ज भरण्याची प्रक्रिया विहित मुदतीत पूर्ण करावी.

२. वंचित घटकातील बालकांमध्ये खालील प्रवर्गाचा समावेश होतो.

३. आर्थिक वर्षामध्ये पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आहे अशा पालकांच्या बालकांचा आर्थिक दुर्बल गटामध्ये समावेश होतो.

४. बालकांच्या पालकांना त्यांच्या निवासस्थानाच्या ठिकाणापासून ०१ किलोमीटर किंवा त्यापेक्षा कमी अंतरावरील शाळा आरटीई पोर्टलवर दिसतील.

२५ टक्के प्रवेश प्रक्रियेकरिता विचारपूर्वक १० शाळांची निवड करण्यात यावी.

५. ६. पालकांनी अर्ज भरताना शाळेपासून ते घरापर्यंवचे हवाई अंतर हे गुगल मॅपने निश्चित करावायाचे असल्याने शाळा निवडताना अंतराची बाब लक्षात घेऊन पालकांनी बलूनव्दारे निवास्थनाचे ठिकाण निश्चित करण्याकरिता तो बलून जास्तीत जास्त पाच वेळाच निश्चित करता येईल याची नोंद घ्यावी त्यामुळे पालकांनी निवासस्थानाचे लोकेशन अचूक नमूद करावे.

७. प्रवेशप्रक्रियेबाबत विहित मुदतीमध्ये परिपूर्ण अर्ज भरला जाईल याची दक्षता घ्यावी.

८. अर्ज सादर करावयाच्या अंतिम कालावधीमध्ये इंटरनेट अथवा इतर तांत्रिक अडचणीमुळे परिपूर्ण अर्ज सादर करण्यामध्ये व्यत्यय येण्याची शक्यता नाकारता येणार नाही सबब शक्य तितक्या लवकर अर्ज सादर केला जाईल याची दक्षता घेण्यात यावी

९. प्रवेशप्रक्रियेबाबत आपणांस काही समस्या असल्यास आरटीई पोर्टलवर मदत केंद्रांची माहिती देण्यात आलेली आहे. त्यांच्याशी संपर्क करून समस्येचे निराकरण करण्यात यावे.

१०. पालकांना ऑनलाईन अर्ज करताना अचूक माहिती भरावी (उदा. घरचा पत्ता, बालकांचा जन्मदिनांक, उत्पन्नचा प्रमाणपत्र, दिव्यांगाचा प्रमाणपत्र, जातप्रमाणपत्र इ.)

११. ज्या बालकांना यापूर्वी आरटीई २५ टक्के अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला असल्यास सदर बालकाला पुन्हा अर्ज करता येणार नाही.

१२. यापूर्वी २५ टक्के प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रवेश मिळालेल्या बालकांची चुकीची माहिती भरून पुन्हा प्रवेश अर्ज भरल्याचे निदर्शनास आल्यास सदरील प्रवेश अर्ज रह करण्यात येईल तसेच पालकांना एकच परिपूर्ण अर्ज सादर करावा एकापेक्षा अधिकचे अर्ज भरल्याचे निदर्शनास आल्यास एकही अर्ज लॉटरीसाठी विचारात घेतला जाणार नाही.

१३. बालकांच्या पालकांनी आरटीई २५ टक्के अंतर्गत ऑनलाईन अर्ज भरतेवेळी खालील कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.

बालकांच्या पालकांचे आई किंवा वडीलांचे आधारकार्ड अनिवार्य (अनाथ बालक असल्यास जे पालक त्यांचा सांभाळ करतात त्यांचे आधारकार्ड अनिवार्य

बालकांच्या जन्माचे प्रमाणपत्र व वास्तव्याचा पुरावा (अनिवार्य)

भाडे तत्वावर राहणा-या पालकांच्या बाबतीत दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत भाडेकरारनाम्याची प्रत आवश्यक (सर्व घटकांना अनिवार्य)

सामाजिक वंचित घटक (पालकांचा / बालकांचा जातीचा दाखला व अपंगत्वाचे प्रमाणपत्र अनिवार्य) (परराज्यातील जातीचे प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येणार नाही)

आर्थिक दुर्बल घटकातील बालकांच्या पालकांचा उत्पन्नचा दाखला रूपये १ लाखापेक्षा कमी उत्पन्न (सन २०२३-२४ किंवा २०२४-२५) या वर्षातील उत्पन्नाचा दाखला ग्राहय समजण्यात येईल.

२. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत २५ टक्के प्रवेश प्रक्रियेकरिता आवश्यक कागदपत्रांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

निवासी पुरावा -२५ टक्के प्रवेश प्रक्रियेकरिता आपण ज्या कार्यक्षेत्रातील शाळा निवडत आहात ज्या कार्यक्षेत्रात स्वतःच्या मालकीची निवासी व्यवस्था असल्यास त्या निवासी पुराव्याकरिता रेशनिंग कार्ड / ड्रायव्हिंग लायसन्स / वीज देयक / टेलिफोन देयक /प्रॉपर्टी टॅक्स देयक / घरपट्टी / मतदान ओळखपत्र / पासपोर्ट / राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक / आधारकार्ड यापैकी कोणताही एक पुरावा ग्राहय धरण्यात येईल.

२५ टक्के प्रवेशप्रक्रियेकरिता आपण ज्या कार्यक्षेत्रातील शाळा निवडत आहात उक्त कार्यक्षेत्रामध्ये स्वतःच्या मालकीची निवासी व्यवस्था नसल्यास भाडेकरार ग्राहय धरण्यात येईल. सदरचा भाडेकरार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत असणे अनिवार्य आहे. भाडेकरार हा फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा व त्याचा कालावधी ११ महिन्याचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा असावा जे पालक रहिवासी पुरावा म्हणून भाडेकराराची प्रत जोडतील त्यांच्या निवासाची पडताळणी करण्यात येईल. ज्या ठिकाणचा भाडेकरारनामा दिला असेल त्याठिकाणी बालक/पालक राहत नाही असे आढळून आल्यास त्या बालकांचा प्रवेश मिळाला असल्यास तो रह करण्यात येईल.

जन्म तारखेचा पुरावा रुग्णालयातील एएनएम रजिस्टर मधील दाखला/ अंगणवाडी / बालवाडीतील रजिस्टर मधील दाखला. ग्रामपंचायत / मनपा / नपा यांचा दाखला /

सामाजिक वंचित जात संवर्गातील बालक असल्यास वडिलांचे/बालकांचे सादर करावयाचे कागदपत्र तहसिलदार/उपजिल्हाधिकारी / उपविभागीय महसूल अधिकारी यांनी निर्गमित केलेला पालकांचा (वडीलांचा/बालकांचा) जातीचे प्रमाणपत्र. परराज्यातील जातीचे प्रमाणपत्र प्रवेश प्रक्रियेकरिता ग्राहय धरण्यात येणार नाही.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल संवर्गातील प्रवेशाकरिता वार्षिक उत्पन्नाचा दाखला – सन २०२६-२७ या वर्षी आरटीई २५ टक्के अंतर्गत प्रवेशाकरिता विदयार्थ्यांच्या पालकांचा आर्थिक वर्ष सन २०२३-२४ किंवा सन २०२४-२५ या वर्षाचा ०१ लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेला तहसिलदारांचा दाखला.

दिव्यांग मुलांसाठी वैदयकीय प्रमाणपत्राचा पुरावा जिल्हाशल्य चिकीत्सक /वैदयकीय अधीक्षक अधिसूचित जिल्हा शासकीय रूग्णालय यांचे ४० टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र.

पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरताना एकल पालक (सिंगल पॅरेंट) (विधवा, घटस्फोटित आई अथवा वडील यापैकी कोणताही एक) पर्याय निवडला असेल तर संबंधित बालकांचे पालकत्व स्विकारलेल्या व्यक्तीचे प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र ग्राहय धरण्यात येईल.

आरटीई २५ टक्के प्रवेश अर्ज भरतेवेळी बालकांच्या पालकांचे (आई किंवा वडील) यांचे आधारकार्ड असणे आवश्यक आहे. बालकांचे आधारकार्ड नसल्यास आधारकार्ड सादर करण्याच्या अटींच्या अधिन राहून बालकांना तात्पुरता प्रवेश देण्यात यावा. तात्पुरता प्रवेश दिल्याच्या दिनांकापासून ९० दिवसांच्या आत बालकांचे आधारकार्ड शाळेकडे सादर करणे बंधनकारक राहील. बालकांच्या आधारकार्डची विहीत कालावधीत पुर्तता न झाल्यास आरटीई २५ टक्के अंतर्गत दिलेला तात्पुरता प्रवेश रह करण्यात येईल.

अनाथबालके (वंचित घटक) आवश्यक कागदपत्रे अ) अनाथ बालकांच्या बाबतीत अनाथालयाची/बालसुधारगृहाची कागदपत्र ग्राहय धरण्यात येतील. ब) जर बालक अनाथालयात राहत नसेल तर जे पालक त्यांचा सांभाळ करतात त्यांचे हमीपत्र आवश्यक राहील. क) अनाथ बालकांच्या संदर्भात इतर कागदपत्र-उदा वार्षिक उत्पन्नाचा दाखला विचारात घेतला जाणार नाही.

एच.आय.व्ही बाधित/प्रभावित असल्यास आवश्यक कागदपत्रे- जिल्हा शल्यचिकित्सक / वैदयकिय अधीक्षक, अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे प्रमाणपत्र अनिवार्य राहील.

घटस्फोटीत महिला पालक असल्यास १. न्यायालयाचा निर्णय २. घटस्फोटीत महिलेचा / बालकाच्या आईचा रहिवाशी पुरावा. ३. बालक वंचित गटात असल्यास बालकांचे किंवा त्यांचे वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल

घटकातील असल्यास तर बालकाच्या आईच्या उत्पन्नाचा दाखला इ. कागदपत्रे दाखल करणे अनिवार्य राहील.

न्यायप्रवष्ठि असलेल्या घटस्फोट प्रकरणतील महिला १. प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचा पुरावा २. घटस्फोट प्रकरण न्यायप्रवष्ठि असलेल्या महिलेचा अथवा बालकांच्या आईचा रहिवासी पुरावा. ३. बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याचे वडीलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल घटक असल्यास बालकांच्या आईच्या उत्पन्नाचा दाखला इ. कागदापत्रे दाखल करणे अनिवार्य राहील.

विधवा महिला- १. पतीचे मृत्युप्रमाणपत्र २. विधवा महिलेचा/बालकाच्या आईचा राहिवासी पुरावा ३. बालक वंचित गटातील असल्यास बालकांचे व त्यांच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल घटकांतील असल्यास तर बालकाच्या आईच्या उत्पन्नचा दाखला इ. कागदपत्रे दाखल करणे अनिवार्य राहील.

३. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर व्यापक प्रसिध्दी देऊन ऑनलाईन सोडत (लॉटरी) काढण्याकरीता दिनांक निश्चित केली जाईल. उक्त तारखेस ऑनलाईन पध्दतीने सोडत (लॉटरी) काढण्यात येईल). सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाकरिता आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रीयेसाठी एकाच टप्यात लॉटरी काढली जाईल. तसेच शाळेत आरटीई अंतर्गत उपलबध जागांएवढी एक प्रतिक्षा यादी (वेटींग लिस्ट) तयार केली जाईल. लॉटरी लागलेल्या विदयार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी पुरेसा कालावधी देण्यात येईल. या कालावधीमध्ये विदयार्थ्यांनी प्रवेश घेऊन शाळेत जागा रिक्त राहिल्या असतील तर पहिल्या प्रतिक्षा यादी (वेटींग प्रतिक्षा यादी (वेटींग लिस्ट) मधील अनुक्रमे विदयार्थ्यांना प्रवेश घेण्याबाबतचा मेसेज पाठविला जाईल. मगच प्रतिक्षा यादीतील विदयार्थ्यांनी अलॉटमेंट लेटर काढून विहीत मुदतीत प्रवेश घ्यावा. या कालावधीत विदयार्थ्यांनी प्रवेश घेऊन शाळेत जागा रिक्त राहिल्या असतील तर दुस-या प्रतिक्षा यादी (वेटींग लिस्ट) मधील अनुक्रमे विदयार्थ्यांना प्रवेश घेण्याबाबतचा मेसेज एनआयसीव्दारे पाठविला जाईल. मगचा दुस-या प्रतिक्षा यादीतील विदयार्थ्यांनी अलॉटमेंट लेटर काढून विहीत मुदतीत प्रवेश घ्यावा. अशा पध्दतीने आरटीई प्रवेशपात्र शाळांची प्रवेश क्षमता पूर्ण होईपर्यंत तिस-या आणि चौथ्या प्रतिक्षा यादीतील विदयार्थ्यांना एन.आय.सी. कडून मेसेज पाठविले जातील.

४. सोडत (लॉटरी) झाल्यांनतर पडताळणी सामितीला आरटीई पोर्टलवर त्यांच्या लॉगीनला विदयार्थ्यांची नावे व मोबाईल क्रमांक दिले जातील, विदयार्थ्यांच्या नावापुढे ज्या दिनांकास विदयार्थ्यांना प्रवेशासाठी बोलविले आहे त्या पालकांकडून त्यांनी आरटीई २५ टक्के प्रवेशावेळी अपलोड केलेल्या कागदपत्रांची मूळ प्रत व एक छायांकित प्रत पडताळणी समितीने प्राप्त करून घ्यावी. कागदपत्राची प्राथमिक तपासणी करून योग्य असल्यास विदयार्थ्यांच्या नावापुढे ऑनलाईन नोंद करावी, तसे पालकाकडील अलॉटमेंट लेटरवर तात्पुरता प्रवेश दिला असे नोंद करावे व ती नोंद करून पालकांना परत करावे तसेच पालकांकडून हमीपत्र भरून घ्यावे.

५. काही पालक मुळ गावी किंवा अन्य जागी प्रवेश प्रक्रियेच्या दरम्यान स्थलांतर होण्याची शक्यता असते त्यामुळे दिलेल्या तारखेस पालक कागदापत्र पडताळणीस उपस्थित राहू शकले नाही तर त्यांना पुन्हा संधी देण्यात यावी. बालकांना प्रवेश घेण्याकरिता पालकांनी पडताळणी समितीशी संपर्क साधावा.

६. कागदपत्रे तपासणी करण्याकरिता राज्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी/प्रशासन अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पडताळणी समिती गठीत करण्यात यावी पडताळणी समितीची रचना खालीलप्रमाणे-

७. पडताळणी समितीने प्रवेशपत्र बालकांच्या प्रवेशाकरीता आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्यात यावी. गटशिक्षणाधिकारी यांनी प्रत्येक बालकाला प्रवेशाकरिता तीन संधी देऊनही पालकांनी संपर्क केला नाही अथवाप्रवेशासाठी आले नाही तर विहित मुदतीत आरटीई पोर्टल वर Not Approach करावे. पडताळणी समिती केद्रांवर गर्दी होणार नाही व बालके प्रवेशापासून वंचित राहणार नाही यांची दक्षता घ्यावी.

८. पडताळणी समितीने सविस्तर माहिती सर्वांना दिसण्यासाठी पोर्टलवर भरावी व दिसते का याची खात्री करावी.

९. समितीने संबंधित विदयार्थ्यांची कागदपत्रे तपासणी करून प्रमाणित केल्यानंतर सदर विदयार्थ्यांना प्रवेश देण्याची सुविधा आर.टी.ई. पोर्टलवर करण्यात येत आहे. पडताळणी समितीने तपासणी केलेले पात्र विद्यार्थी गटशिक्षणाधिकारी यांचे स्वाक्षरी पत्र घेऊन शाळेत जातील शाळा स्तरावर कोणत्याही कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार नाही. ज्या बालकंचा कागदपत्रे तपासणीमध्ये अपात्र होतील त्यांची निवड रह करण्यात यावी व अशा रह झालेल्या विदयार्थ्यांना शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद यांचेकडे तक्रारीची दाद मागता येईल. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद यांचा निर्णय मान्य नसल्यास विभागीय

शिक्षण उपसंचालक यांचेकडे दाद मागता येईल व विभागीय शिक्षण उपसंचालक यांचा निर्णय अंतिम राहील.

१०. प्रतिक्षा यादीमध्ये नाव आहे याचा अर्थ प्रवेश निश्चित होईलच असे नाही.

११. पालकांना केवळ SMS वर अवलंबून न राहता RTE Portal वर वेळोवळी दिलेल्या सूचनांचे अवलोकन करावे व सदरील माहितीचा लाभ घ्यावा.

१२. विहित मुदतीनंतर प्रवेशासाठी शाळेत जागा रिक्त असल्या तरीही कोणत्याही परिस्थितीत बालकाला प्रवेश दिला जाणार नाही याची सर्व पालकांनी नोंद घ्यावी. विहित मुदतीनंतर प्रवेशासाठी कोणत्याही पालकांच्या अर्जाची किंवा निवेदनाची दखल घेतली जाणार नाही याची सर्व पालकांनी नोंद घ्यावी.

शासन परिपत्रक pdf download 

१३. बालकांच्या पालकांनी खोटी/चुकीची माहिती भरून प्रवेश निश्चित केला व सदर बाब प्रशासनाच्या निदर्शनास आल्यास खोटी/चुकीची माहिती भरून दिशाभूल केल्याप्रकरणी आरटीई २५ टक्के प्रवेश कोणत्याही टप्प्यावर रह करण्यात येईल. तसेच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यईल याची सर्व संबधितांनी नोंद घ्यावी.

Related posts:

Leave a Comment