संपत्तीचा उपयोग uses of wealth marathi bodhkatha 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

संपत्तीचा उपयोग uses of wealth marathi bodhkatha 

एका कंजूष मनुष्याने आपल्याजवळील सर्व संपत्ती हे विकून आलेल्या पैशाची सोन्याची लगड बनवून घेतली व ती एका जागी पुरून ठेवली. तो मनुष्य रोज त्या सोन्याच्या लगडीकडे डोळे भरून पाहात असे व समाधान मानीत असे.

 

 

एका मजुराने त्याच्यावर लक्ष ठेवले आणि त्याला त्याचे गुपित समजले व त्याने गुपचूप ती सोन्याची लगड लांबविली व खड्डा पूर्ववत करून ठेवला. दुसऱ्या दिवशी कंजूष मनुष्य त्या जागी गेला व खड्डा उकरून काढला. रिकामा खड्डा पाहून तो जोराने ओरडू लागला. रस्त्यावरून जाणाऱ्या मनुष्याने रडण्याचे कारण विचारले. सर्व हकीकत समजल्यावर तो समजल्य म्हणाला, “बाबारे, तुला दुःख करण्याचे काहीच कारण नाही. तुझ्याजवळ असलेल्या सोन्याचा तू वापर करीत नव्हतास. त्यामुळे त्याजागी एखादा दगड पुरून ठेव व त्या दगडाला सौने मानून रोज पाहात जा.

तात्पर्य : मनुष्य आपल्याजवळ असलेल्या गोष्टीचा, वस्तूचा उपभोग घेत नसेल, तर अशा वस्तू असूनही त्या नसल्यासारख्याच असतात. उपभोग घेतली नाही तर त्या वस्तूच्या मालकीचा उपयोग काय ?