शिक्षक संवर्गातून पदोन्नती देतांना शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अनिवार्य असल्याबाबत teacher eligibility test
संदर्भः १. सिव्हील अपील क. १३८५/२०२५ या प्रकरणात मा. सर्वोच्च न्यायालयाने पारीत केलेला दि. १/९/२०२५ रोजीचा न्यायनिर्णय
२. संचालनालयाचे पत्र क्र.प्राशिसं/निवेदन/टे-३०१/२०२५/दि.४/११/२०२५
३. शासनाचे पत्र क्र संकीर्ण-२०२५/प्र.क्र.७९१/टीएनटी-१/दि.१९/१/२०२६
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सदर्भ क्र. १ येथील सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय निर्णयाच्या पार्श्वभूमीवर शिक्षक संवर्गातून पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, समुह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) व विस्तार अधिकारी (शिक्षक) या पदावर पदोन्नती प्रकरणी कार्यवाही करण्याबाबत विविध शिक्षक संघटना व जिल्हा परिषदांमार्फत मार्गदर्शन मिळण्याबाबत विनंती करण्यात आली होती.
तरी सदर न्यायनिर्णयाच्या अनुषंगाने करावयाच्या पुढील कार्यवाही संबंधी शासनामार्फत राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेकडे तसेच केंद्र सरकारच्या शालेय शिक्षण विभागाकडे मार्गदर्शन मागवण्यात आलेले असून त्याबाबतचे अभिप्राय अद्याप अप्राप्त आहेत.
तथापि विधी व न्याय विभागाच्या अभिप्रायानुसार शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) उत्तीर्ण या अर्हतबरोबरव पदोन्रती साठी आवश्यक अन्य अर्हता धारण केली आहे, केवळ असेच शिक्षक पदोन्नतीसाठी पात्र आहेत. असे शासनाचे सदर्भ क्र.३ नुसार कळविण्यात आलेले आहे. तरी शासन पत्रात नमूद निर्देशानुसार यथानियम कार्यवाही करण्यात यावी.











