राज्यातील शाळांची पटपडताळणी करण्यासाठी स्टुडंट पोर्टलवर उपलब्ध करुन दिलेल्या सुविधेबाबत patpadtalni students portal
संदर्भ:- १. शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, शासनपत्र क्रमांका लवेसु-१२२५/प्र.क्र.१०/२५/एसएम.३. दिनांक ०३.११.२०२५.
२. संचालनालयाचे पत्र क्र. शिसंमा/टि-८व/२०२५-२६/१८२०१२९, दिनांक ३१.०३.२०२६. ३. संचालनालयाचे पत्र क्र. शिसंमा/टि-८५/२०२५-२६/१८३०२०२, दिनांक ०६.०४.२०२६
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने राज्यातील शाळांची पटपडताळणी करण्याबाबत संबालनालयाचे संदर्भीय पत्र क्र २ व क्र. ३ अन्वये सूचना देण्यात आल्या आहेत. संदर्भीय पत्रान्वये इ. १ ली ते इ.९ व इ. ११ वी या वर्गाची पटपडताळणी ११ एप्रिल २०२६, १५ एप्रिल २०२६ व २२ एप्रिल २०२६ रोजी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सदर पटपडताळणी करण्याकरीता ऑनलाईन सुविधा स्टुडंट वर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. सदर सुविधा स्टुडेंट पोर्टलवर HM Login, Cluster Head Login, BEO Login, EO Login, Deputy Director Login, Director Login ला उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत, सदर लॉगीन चा उपयोग करुन पटपडताळणी करणारे अधिकारी उपस्थित व अनुपस्थित विद्यार्थ्यांची नोंद करतील व भेट दिलेल्या शाळेची पटपडताळणी पुर्ण करतील.
शाळेची पटपडताळणी करण्याकरीता उपलब्ध करुन दिलेली ऑनलाईन सुविधा व त्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना सोबत जोडलेल्या User manual मध्ये सविस्तर नमूद करण्यात आलेल्या आहेत. पटपडताळणी करण्याच्या अनुषंगाने संबंधित अधिकारी यांनी या सोबत जोडलेले User manual पहावे व पटपडताळणीचे कामकाज पूर्ण करावे. सोबत :- पटपडताळणी मार्गदर्शिका (User manual) pdf download









