TET 2018 Paper – I विषय मराठी PYQ प्रश्नोत्तरे pyq tet questions answers

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

TET 2018 Paper – I विषय मराठी PYQ प्रश्नोत्तरे pyq tet questions answers 

1) वाक्यातील विशेषण ओळखा.

‘मुसळधार पावसाने धरती ओलीचिंब झाली, पण शिवारे पाण्यात तुडूंब भरली’.

(1) मुसळधार

(2) धरती

(3) शिवारे

(4) तुडूंब

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

2. खालील वाक्यातील काळ ओळखा.

मी तुला नेहमी पत्र पाठवत जाईन

(1) अपूर्ण भविष्यकाळ

(2) रीती भविष्यकाळ

(3) साधा भविष्य काळ

(4) पूर्ण भविष्यकाळ

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

3. पुढील वाक्यात चूकीच्या जागी दिलेले विरामचिन्ह कोणते ?

आजोबा राजूला म्हणाले, “शाब्बास मला तुझा अभिमान वाटतो!”

(1) स्वल्पविराम

(2) अवतरण चिन्ह

(3) उद्गारवाचक चिन्ह

(4) अर्धविराम

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

4. पुढीलपैकी कोणता शब्द उपसर्गघटित नाही?

(1) आलोक

(2) आमरण

(3) आजन्म

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

5. ‘नीर’ या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द कोणता ?

(1) तोय

(2) जल

(3) जीवन

(4) दूध

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4

6. पुढीलपैकी अशुद्ध शब्द कोणता ?

(1) परीक्षा

(2) शिक्षण

(3) उपाहारगृह

(4) आशिर्वाद

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4

7. पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द कोणता ?

(1) सविता

(2) चपला

(3) सौदामिनी

(4) विदयुत

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

8. देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या आशुतोषला सर्वांनी प्रणाम केला.

वाक्यातील अधोरेखित शब्दसमूहाबद्दल अचूक शब्द निवडा.

(1) देशप्रेमी

(3) हुतात्मा

(2) कार्यतत्पर

(4) क्रांतिकारक

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

9. ‘सर्वच कलाकारांचा अप्रतिम अभिनय पाहून प्रेक्षकांचे….. ‘ योग्य वाक्प्रचार कोणता ?

(1) डोळे येणे

(2) डोळे निवणे

(3) डोळे भिडणे

(4) डोळे लागणे

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

10. खालील वाक्यातील अव्ययाचा प्रकार कोणता ?

‘अर्जुन नेहमीच मदत करण्यास तयार असे’

(1) उभयान्वयी अव्यय

(2) केवलप्रयोगी अव्यय

(3) शब्दयोगी अव्यय

(4) क्रियाविशेषण अव्यय

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4

11. अनियमित पाणीपुरवठ्याबाबत महानगरपालिकेला लिहिलेले पत्र कोणत्या प्रकारचे असेल ?

(1) आवेदनपत्र

(2) मागणीपत्र

(3) तक्रारअर्ज

(4) विनंतीअर्ज

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

12. पुढीलपैकी कोणला ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार मिळालेला नाही ?

(1) भालचंद्र नेमाडे

(2) वि. स. खांडेकर

(3) वि. वा. शिरवाडकर

(4) पु. ल. देशपांडे

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4

13. मराठी भाषेचे आद्यकवी कोणाला म्हणतात ?

(1) मुकुंदराज

(2) म्हाइंभट

(3) संत रामदास स्वामी

(4) संत ज्ञानेश्वर

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

14. पुढीलपैकी कोणता शब्द पुल्लिंग आणि नपुंसकलिंगामध्ये बदलत नाही?

(1) वाघ

(2) हरिण

(3) हत्ती

(4) ससा

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

15. ‘आनंदघन’ या नावाने ओळखली जाणारी व्यक्ती पुढीलपैकी कोण ?

(1) राम कदम

(2) अजय अतुल

(3) लता मंगेशकर

(4) श्रीधर फडके

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

16. पुढीलपैकी कोणत्या वर्णाला ‘महाप्राण वर्ण’ म्हणतात ?

(1) च

(2) ग

(3) ब

(4) घ

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4

17. ‘आस्था’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?

(1) निरास्था

(2) शिस्था

(3) निराशा

(4) अनास्था

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4

18. पुढीलपैकी आज्ञार्थी वाक्य कोणते ?

(1) यास्मिन, तुझी वही संजनाला दे पाहू

(2) यंदाप्रमाणेच पुढील वर्षी देखील वरूणराजाची कृपा व्हावी

(3) छे ! छे! करणारच नाही मी.

(4) गर्जेल तो पडेल काय.

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

19. पुढीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्दाचा पर्याय कोणता ?

(1) खते

(2) शेते

(3) पोते

(4) दाते

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

20. वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.

‘ताप उतरल्यामुळे ऋतुजाला आता चालवते’

(1) सकर्मक

(2) सहायक

(3) प्रयोजक

(4) शक्य

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4

22. ‘जो जे वांछील, तो ते लाहो। प्राणिजात।’ अधोरेखित शब्दाचा प्रकार कोणता ?

(1) दर्शक सर्वनाम

(2) सार्वनामिक विशेषण

(3) संबंधी सर्वनाम

(4) गुणविशेषण

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

Related posts:

Leave a Comment