जनगणना कार्यात दिव्यांग कर्मचारी/अधिकाऱ्यांना कामे न देण्याबाबत census paripatrak 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जनगणना कार्यात दिव्यांग कर्मचारी/अधिकाऱ्यांना कामे न देण्याबाबत census paripatrak

संदर्भ :-१) राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी/अधिकारी संघटना मुंबई – ३२ यांचे दिनांक १३.०४.२०२६ रोजीचे निवेदन

२) महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग, क्र. संकीर्ण २०१० / मुमंस २०३/प्र.क्र.३३७/५, दिनांक २७ सप्टेंबर २०१०

उपरोक्त विषयांन्वये आपणांस कळविण्यात येते कि, राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी/अधिकारी संघटना मुंबई ३२ यांचे १३.०४.२०२६ रोजीचे निवेदन या आयुक्तालयास प्राप्त झाले आहे. सदर निवेदनामध्ये शासनामार्फत जनगणना कार्यवाही सुरू होत असताना, महाराष्ट्र शासनाच्या वरील संदर्भ २ अन्वये दिव्यांग कर्मचारी/अधिकाऱ्यांना जनगणनेची कामे देऊ नयेत, असे निर्देश देण्यात आलेले आहेत. तसेच दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ नुसार दिव्यांग व्यक्तींना भेदभावमुक्त व सन्मानपूर्वक वागणूक देणे ही शासनाची महत्त्वाची जबाबदारी आहे.

तथापि, काही ठिकाणो या निर्देशांचे पूर्ण पालन होत नसल्याच्या तक्रारी अधूनमधून प्राप्त होतात. त्यामुळे दिव्यांग कर्मचारी/अधिकाऱ्यांना अनावश्यक त्रास होण्याची शक्यता निर्माण होत आहे.

त्या अनुषंगाने वरील संदर्भाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आपल्या स्तरावरून संबंधितांना तसेच सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, सर्व महानगरपालिका आयुक्त, सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मार्गदर्शक सूचना देण्यात याव्यात, जेणेकरून कोणत्याही दिव्यांग कर्मचारी/अधिकाऱ्याला जनगणनेची कामे देण्यात येऊ नयेत व शासन निर्णयाची योग्य अंमलबजावणी होईल व केलेल्या कार्यवाहीची एक प्रत संघटनेस अवगत करावी ही नम्र विनंती. अशी निवेदनात मागणी केली आहे. त्याअनुषंगाने सदर प्रकरणी शासन नियमानुसार उचित कार्यवाही करावी.

Related posts:

Leave a Comment