सन 2013 ते 2025 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यावरील TET परीक्षेत आलेले प्रश्नसंच tet questions paper
छत्रपती शिवाजी महाराज : शिवनेरी :: समर्थ रामदास : ?
1) सज्जनगड
2) जांब
3) चाफळ
4) शिवथरघळ
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
शिवरायांनी रायरीच्या किल्यास तर तोरणा किल्यास नाव दिले. हे
1) राजगड, प्रचंडगड
2) रायगड, तोरणाई
3) रायगड, प्रचंडगड
4) रायरेश्वर, पावनगड
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू सहकारी व त्यांची जबाबदारी यांची अयोग्य जोडी कोणती ?
1) पायदळातील अधिकारी – नूर बेग
2) आरमारदलातील अधिकारी – मुहम्मद कुलीखान
3) स्वराज्यातील सरदार – सिद्दी हिलाल
4) शिवरायांचा वकील – काझी हैदर
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
रियासतकार गो. स. सरदेसाई यांनी ‘स्थिरबुद्धी’ या विशेषणाचा वापर कोणाच्या संदर्भाने केला आहे ?
1) छत्रपती संभाजी महाराज
2) छत्रपती राजाराम महाराज
3) महाराणी ताराराणी
4) छत्रपती शिवाजी महाराज
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात ‘मावळा’ या टोपणनावाने वर्तमानपत्रात व्यंगचित्रे कोणी काढली ?
1) आर. के. लक्ष्मण
2) सुधीर तैलंग
3) प्रबोधनकार केशव ठाकरे
4) बाळासाहेब ठाकरे
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
खालील पर्यायांपैकी कोकणातील ‘दशावतारी’ नाटकांचे वैशिष्ट्य कोणते ?
1) प्रायोगिक नाटकाचा प्रकार
2) नाटकातील बहुतेक भाग गद्यमय असतो
3) नाटकातील पात्रांचा अभिनय, रंगभूषा व वेशभूषा परंपरागत असते
4) नाटकातील पात्रांची रंगभूषा व वेशभूषा आधुनिक असते
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
खालीलपैकी संत नामदेव यांच्याबाबत योग्य विधाने कोणती ?
(A) महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार
(
B) आपल्या विचारांचा पंजाबात प्रसार केला
(C) ‘गुरुग्रंथसाहिब’ ग्रंथात काही पदांचे लेखन
1) फक्त (A) व (B) योग्य
2) फक्त (B) व (C) योग्य
3) फक्त (A) व (C) योग्य
4) तिन्ही (A), (B) व (C) योग्य
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
शिवरायांच्या अष्टप्रधानमंडीशिवरायांच्या अष्टप्रधानमंडळातील ‘मंत्री’ या पदावरील व्यक्ती कोणते काम पहात असे ?
1) सरकारी आज्ञापत्रे सांभाळणे
(2) परराज्याशी संबंध ठेवणे
3) राज्याचा जमाखर्च पाहणे
4) पत्रव्यवहार सांभाळणे
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
शिवकाळात हिंदवी स्वराज्याचा / साम्राज्याचा भाग नसलेला प्रदेश / ठिकाण दर्शविणारा पर्याय कोणता?
1) कर्नाटकातील बेळगाव
2) कारवार व धारवाड
3) तमिळनाडूतील वेल्लोर
4) म्हैसूर व मदुराई
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सहकाऱ्यांना उद्देशून बोलत आहेत.’ असा प्रसंग कल्पून कोणी काव्यरचना केली आहे?
1) महात्मा जोतिबा फुले
2) सुब्रमण्यम भारती
3) रविंद्रनाथ टागोर
4) सरोजिनी नायडू
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
मध्ययुगीन भारताचे पहिले आरमारदल कोणत्या शतकात उभारले गेले ?
1) पंधरावे
2) सोळावे
3) सतरावे
4) अठरावे
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
शिवराय आपल्या सेवकांची/सहकाऱ्यांची पित्यासारखी काळजी घेत’. या वाक्याशी संबंधित स्पष्टीकरण देतांना विद्यार्थ्यांना शिक्षक कोणाचा दाखला देणार नाहीत?
1) मदारी मेहत्तर
2) कान्होजी जेधे
3) प्रतापराव गुजर
4) बाजी घोरपडे
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
शिवरायांच्या काळात ‘बारगीर’ हे संबोधन / पद कोणत्या सैन्यदलाशी संबंधित आहे?
1) घोडदळ
2) पायदळ
3) आरमारदल
4) हेरखाते
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
सातवाहन सत्तेची राजधानी असलेले ‘प्रतिष्ठान’ हे ठिकाण सध्या कोणत्या नावाने ओळखले जाते?
1) पाटणा
2) पैठण
3) बदामी
4) हंपी
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
खालीलपैकी योग्य विधान / विधाने कोणते/कोणती?
अ) निजामशाहने शहाजीराजांना ‘सरलष्कर’ हा किताब दिला होता
ब) निजामशाहने शहाजीराजांना बंगळूरची जहागिरी बक्षीस दिली होती.
1) फक्त ‘अ’ योग्य
2) फक्त ‘ब’ योग्य
3) दोन्ही ‘अ’ आणि ‘ब’ योग्य
4) दोन्ही ‘अ’ आणि ‘ब’ अयोग्य
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे निष्ठावंत पाईक नसलेल्या व्यक्तीचा पर्याय कोणता ?
1) सिद्दी इब्राहिम
2) सिद्दी हिलाल
3) दौलतखान
4) दाऊदखान
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
छत्रपति शिवरायांनी अष्टप्रधान मंडळातील प्रधानांना त्यांच्या कामाचा मोबदला कोणत्या स्वरूपात दिला?
1) इनामे
2) रोख पगार
3) जहागिरी
4) वतने
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
भावार्थ रामायणाच्या निमित्ताने लोकजीवन रेखाटणे.’ व ‘लोक नाटयाच्या परंपरेस उचलून धरणे.’ या प्रकारच्या साहित्याशी संबंधित संत कोण?
1) संत एकनाथ
2) संत नामदेव
3) संत तुकाराम
4) समर्थ रामदास
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी ‘श्री राजा शिवछत्रपती’ ही अक्षरे कोरलेले कोणते नाणे पाडण्यात आले?
1) सोन्याचा होन
2) सोन्याची मोहोर
3) चांदीचा होन
4) चांदीची मोहोर
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
खालीलपैकी योग्य विधान/विधाने कोणते/कोणती?
अ) आदिलशहाने शहाजीराज़ांना ‘सरलष्कर’ हा किताब दिला होता.
ब) निजामशहाने शहाजीराजांना बंगळूरची जहांगिरी बक्षीस दिली होती.
1) फक्त ‘अ’ योग्य
2) फक्त ‘ब’ योग्य
3) दोन्हीही ‘अ’ आणि ‘ब’ योग्य
4) दोन्हीही ‘अ’ आणि ‘ब’ अयोग्य
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे निष्ठावंत पाईक नसलेल्या व्यक्तीचा पर्याय कोणता?
1) नूर बेग
2) सलाबत खान
3) काझी हैदर
4) सिद्दी मिसरी
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील कोणाला युद्धप्रसंगी लढाई करावी लागत असे?
1) अमात्य व सचिव
2) अमात्य व पंडितराव
3) न्यायाधीश व सचिव
4) न्यायाधीश व पंडितराव
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा केलेल्या सुरतेवरील स्वारीचे प्रमुख कारण खालील पर्यायांपैकी कोणते?
1) पुरंदरच्या तहात मुघलांना दिलेले किल्ले व प्रदेश परत मिळविणे.
2) सिद्दी जोहरवर वचक बसविणे.
3) शाहिस्तेखानाच्या तीन वर्षांच्या राजवटीत स्वराज्याचे झालेले नुकसान भरून काढणे.
4) आग्रा भेटीत झालेल्या अपमानाचा बदला घेणे.
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी ‘श्री राजा शिवछत्रपती’ अशी अक्षरे कोरलेली कोणती नाणी पाडण्यात आली?
1) सोन्याचा होन व तांब्याची शिवराई
2) सोन्याची शिवराई व तांब्याचा होन
3) सोन्याचा होन व सोन्याची शिवराई
4) तांब्याची शिवराई व तांब्याचा होन
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
शिवकालीन हिंदवी स्वराज्याचा / साम्राज्याचा भाग नसलेला प्रदेश/ठिकाण दर्शविणारा पर्याय कोणता?
1) बऱ्हाणपूर व तुळजापूर
2) कारवार व धारवाड
3) तमिळनाडूतील वेल्लोर
4) कर्नाटकातील बेळगाव
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हते, तर ते साऱ्या राष्ट्राचे होते, त्यांचे आपल्या देशावर फार प्रेम होते आणि मानवी सद्गुणांचे ते साक्षात प्रतिक होते’ असे कोणी म्हटले आहे?
1) महात्मा ज्योतीबा फुले
2) पं. जवाहरलाल नेहरू
3) लाला लजपतराय
4) रविंद्रनाथ टागोर
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
भारतीय आरमाराचे जनक कोणाला मानतात ? 3.
1) टिपू सुलतान
2) नवाब सिराजउद्दौला
3) सम्राट अकबर
4) राजा शिवछत्रपती
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
पैठण : संत एकनाथ :: नरसी : ?
1) संत निळोबा
2) संत नरहरी
3) संत नामदेव
4) संत निर्मळबाई
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
कर्तव्यापुढे शिवराय नातेगोते मानत नसत.’ या वाक्याशी संबंधित स्पष्टीकरण देताना विद्यार्थ्यांना शिक्षक कोणाचा दाखला देतील ?
1) धनाजी जाधव
2) राणोजी शिंदे
3) हंबीरराव मोहिते
4) बजाजी नाईक-निंबाळकर
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
शिवरायांच्या काळात ‘घोडदळ’ या सैन्यदलाशी संबंधित संबोधन/पद कोणते ?
1) बारगीर
2) नाईक
3) जुमलेदार
4) हवालदार
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
सातवाहन सत्तेची राजधानी असलेले ‘प्रतिष्ठान’ हे ठिकाण सध्या कोणत्या राज्यात आहे ?
1) कर्नाटक
2) मध्यप्रदेश
3) आंध्रप्रदेश
4) महाराष्ट्र
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे पाईक असलेल्या व्यक्तीचा पर्याय कोणता ?
1) दौलतखान
2) फाजलखान
3) सलाबतखान
4) दाऊदखान
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील कोणाला युद्धप्रसंगी लढाई करावी लागत नसे?
1) अमात्य व न्यायाधीश
2) पंडितराव व न्यायाधीश
3) अमात्य व सचिव
4) पंडितराव व सचिव
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
संस्कृत पंडितांना मराठी भाषेचे महत्त्व सांगताना ‘संस्कृत वाणी देवे केली। तरी प्राकृत काय चोरापासून झाली?’ असे कुणी म्हटले आहे?
1) संत नामदेव
2) संत तुकाराम
3) समर्थ रामदास
4) संत एकनाथ
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी ‘श्री राजा शिवछत्रपती’ ही अक्षरे कोरलेले कोणते नाणे पाडण्यात आले ?
1) तांब्याची शिवराई
2) सोन्याची शिवराई
3) सोन्याची महोर
4) तांब्याची महोर
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्याशी संबंधित नसलेली बाब खालील पर्यायांपैकी कोणती ?
1) सार्वजनिक पाणवठे अस्पृश्यांना खुले करण्याचे विधेयक संमत करून घेतले.
2) देवदासी प्रथेविरुद्ध चळवळ सुरू केली.
3) बहुजन समाजातील स्त्रियांसाठी सुधारणेची चळवळ सुरु केली.
4) डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केली.
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
धर्म-जात न पाहता माणसाची योग्यता पाहून शिवरायांनी स्वराज्यात नोकरीस ठेवलेल्या व्यक्तीचे खालील पर्यायांपैकी कोणते उदाहरण अयोग्य ठरते?
1) आरमार दलातील अधिकारी सिद्दी मिसरी
2) पायदळातील प्रमुख सेनानी – सिद्दी मसूद
3) सैन्यातील सरदार – सिद्दी हिलाल
4) विश्वासू सेवक – सिद्दी इब्राहिम
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
खालीलपैकी योग्य विधान/विधाने कोणते/कोणती ?
अ) छत्रपती संभाजी महाराजांनी संस्कृतमध्ये ‘बुधभूषण’ हा राजनीतीपर ग्रंथ रचला.
ब) फार्सी शब्दांना पर्यायी संस्कृत शब्द असणारा असा राज्यव्यवहारकोश शिवरायांनी तयार करवून घेतला.
1) फक्त (अ) योग्य
2) फक्त (ब) योग्य
3) (अ) आणि (ब) दोन्ही योग्य
4) (अ) आणि (ब) दोन्ही अयोग्य
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
स्वराज्याचे शत्रू आणि त्यांच्या विरुद्ध संघर्ष केलेल्या शिवरायांच्या स्वामीनिष्ठ व्यक्ती यांची अयोग्य जोडी खालील पर्यायांपैकी कोणती ?
1) शाहिस्तेखान – फिरंगोजी नरसाळा
2) दौलतखान – मुरारबाजी
3) बहलोलखान – प्रतापराव गुजर
4) सिद्दी मसूद – बाजीप्रभू देशपांडे
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
गोपाळ हरी देशमुख यांच्याशी संबंधित नसलेली बाब खालील पर्यायांपैकी कोणती ?
1) ‘दिग्दर्शन’ या साप्ताहिकातून शतपत्रांचे लेखन
2) वाचनालयाची चळवळ
3) विधवा विवाहाचा पुरस्कार
4) ‘लोकहितवादी’ या टोपणनावाने लेखन
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
मुरुंबदेवचा किल्ला आणि खेळणा किल्ला यांची छत्रपती शिवरायांनी अनुक्रमे कोणती नावे नव्याने दिली ?
1) राजगड, विशाळगड
2) विशाळगड, राजगड
3) रायगड, प्रतापगड
4) प्रतापगड, रायगड
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
खालील पर्यायातील शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील मंत्रीपद आणि त्यांची कामे यांची योग्य जोडी कोणती ?
1) पंडितराव – पत्रव्यवहार सांभाळणे
2) सचिव आज्ञापत्रे तयार करणे
3) अमात्य – परराज्यांशी संबंध ठेवणे
4) सुमंत – जमाखर्च पाहणे
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2