TET केवलप्रयोगी अव्यय प्रश्नसंच tet practice questions
1. शाब्बास, अबब, अरेरे, बापरे’ या शब्दाची जात ओळखा.
(1) उभयान्वयी अव्यय
(2) केवलप्रयोगी अव्यय
(3) क्रियाविशेषण
(4) शब्दयोगी अव्यय
उत्तर पर्याय क्रमांक 2
2. खालीलपैकी कोणते केवलप्रयोगी अव्यय नाही?
(1) अरेरे
(2) अबब
(3) बापरे
(4) आणि
उत्तर पर्याय क्रमांक 4
3. शब्दाच्या जात ओळखा.अबब, अरेरे
(1) शब्दयोगी
(2) उभयान्वयी
(3) क्रियाविशेषण
(4) केवलप्रयोगी
उत्तर पर्याय क्रमांक 4
4. केवलप्रयोगी अव्यये ओळखा.
(1) येथे, तेथे, इकडे, तिकडे
(2) आणि, व, शिवाय, अन्
(3) अबब, अगाई, बापरे
(4) कारण की, जर-तर
उत्तर पर्याय क्रमांक 3
5……… ! धोनी आऊट झाला.’ योग्य शब्द निवडा.
(1) अरेरे
(2) बापरे
(3) अहो
(4) अबब
उत्तर पर्याय क्रमांक 1
6. अबब! किती मोठा साप आहे! यातील ‘अबब’ हे काय आहे?
(1) केवलप्रयोगी अव्यय
(3) क्रियाविशेषण अव्यय
(2) उभयान्वयी अव्यय
(4) क्रियापद
उत्तर पर्याय क्रमांक 1
7. ‘अबब! हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे?
(1) केवलप्रयोगी
(2) उभयान्वयी
(3) विशेषण
(4) क्रियापद
उत्तर पर्याय क्रमांक 1
8. उद्गारवाचक अव्यय ओळखा.
(1) शिवशिव
(2) परंतु
(3) शिवाय
(4) त्यापेक्षा
उत्तर पर्याय क्रमांक 1
9. जे उद्गार दाखविणारे शब्द वाक्याच्या आरंभी येतात. ते वाक्याचा भाग नसतात. ते स्वतंत्र उद्गार असतात. त्यांना काय म्हणतात ?
(1) केवलप्रयोगी अव्यय
(2) उभयान्वयी अव्यय
(3) शब्दयोगी अव्यय
(4) क्रियाविशेषण अव्यय
उत्तर पर्याय क्रमांक 1
10. ‘छे, छे’ या केवलप्रयोगी अव्ययातून कोणता भाव व्यक्त होतो?
(1) तुच्छता
(2) तिरस्कार
(3) आश्चर्य
(4) विरोध
उत्तर पर्याय क्रमांक 2
11. शाबास! असेच यश पुढेही मिळव. अधोरेखित अव्ययाचा प्रकार ओळखा.
(1) शब्दयोगी अव्यय
(2) केवलप्रयोगी अव्यय
(3) उभयान्वयी अव्यय
(4) क्रियाविशेषण अव्यय
उत्तर पर्याय क्रमांक 2
12. चुप् ! खाली बस यात केवलप्रयोगी अव्ययाचा कोणता प्रकार आहे?
(1) मौनदर्शक
(2) तिरस्कार दर्शक
(3) शोकदर्शक
(4) विरोध दर्शक
उत्तर पर्याय क्रमांक 1
13. पुढील केवलप्रयोगी अव्ययांची चुकीची जोडी असलेला पर्याय ओळखा.
(1) मौनदर्शक – चूप, गप्
(2) हर्षदर्शक – वा, अहाहा
(3) विरोधदर्शक – छे, छट
(4) संमतीदर्शक – अरे, अहो
उत्तर पर्याय क्रमांक 4
14. ‘हा, ठिक, अच्छा’ हे शब्द खालीलपैकी कोणते केवलप्रयोगी अव्यये आहेत ?
(1) संबोधनदर्शक केवलप्रयोगी अव्यये
(2) मौनदर्शक दर्शक केवलप्रयोगी अव्यये
(3) हर्षदर्शक केवलप्रयोगी अव्यये
(4) संमतीदर्शक केवलप्रयोगी अव्यये
उत्तर पर्याय क्रमांक 4
15. अबब! हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे?
(1) केवलप्रयोगी
(2) उभयान्वयी अव्यय
(3) विशेषण
(4) क्रियापद
उत्तर पर्याय क्रमांक 1
16. वा ! वा ! मी हे कसे कबूल करीन? या वाक्यातील केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.
(1) हर्षदर्शक
(2) संमतीदर्शक
(3) विरोधदर्शक
(4) शोकदर्शक
उत्तर पर्याय क्रमांक 3
17. खालीलपैकी प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यय कोणते ते ओळखा.
(1) अबब !
(2) अरेच्चा !
(3) छे !
(4) शाब्बास !
उत्तर पर्याय क्रमांक 4
18…….. ! काय दुर्दशा झाली त्याची !
(1) शी…
(2) वाहवा
(3) अरेरे
(4) अबब
उत्तर पर्याय क्रमांक 3
19. बाप रे! तो पाहा वाघ ! बाप रे हे कुठले अव्यय आहे?
(1) उभयान्वयी अव्यय
(2) केवलप्रयोगी अव्यय
(3) शब्दयोगी अव्यय
(4) क्रियाविशेषण अव्यय
उत्तर पर्याय क्रमांक 2
20. ‘येणार असेल तर येईल बापडा !’ अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
(1) हर्षदर्शक केवलप्रयोगी अव्यय
(2) व्यर्थ उद्गारवाची अव्यय
(3) क्रियाविशेषण अव्यय
(4) यापैकी नाही
उत्तर पर्याय क्रमांक 2
21. खालीलपैकी संमतीदर्शक केवलप्रयोगी अव्यय ओळखा.
(1) ओहो !
(2) अच्छा !
(3) अंह !
(4) अरेच्या !
उत्तर पर्याय क्रमांक 2
22. पुढीलपैकी प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यय कोणते ?
(1) भले
(2) अरेच्चा
(3) अरे
(4) ओहो
उत्तर पर्याय क्रमांक 1
23. अबब! हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे?
(1) केवलप्रयोगी अव्यय
(2) विशेषण
(3) उभयान्वयी अव्यय
(4) क्रियापद
उत्तर पर्याय क्रमांक 1
24. ‘अयाई’ हे कोणते अव्यय आहे?
(1) शब्दयोगी
(2) उभयान्वयी
(3) केवलप्रयोगी
(4) व्यर्थ उद्गारवाची
उत्तर पर्याय क्रमांक 3
25. जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना म्हणतात.
(1) शब्दयोगी
(2) उभयान्वयी
(3) केवलप्रयोगी
(4) सर्वनामे
उत्तर पर्याय क्रमांक 3









