उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या गुणपत्रक तथा प्रमाणपत्र व इतर साहित्य वाटपाबाबत hsc mark’s certificate 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या गुणपत्रक तथा प्रमाणपत्र व इतर साहित्य वाटपाबाबत hsc mark’s certificate

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे ४११ ००४.

।। प्रकटन ।।

विषय : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या गुणपत्रक तथा प्रमाणपत्र व इतर साहित्य वाटपाबाबत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर शनिवार दिनांक ०२ मे, २०२६ रोजी ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे.

त्याअनुषंगाने फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये झालेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेचे गुणपत्रक तथा प्रमाणपत्र, स्थलांतर प्रमाणपत्र व तपशिलवार गुण दर्शविणारे शालेय अभिलेख यांचे वाटप संबंधीत विभागीय मंडळांमार्फत सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना सोमवार दि.२५/०५/२०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता करण्यात येणार असून उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत त्याच दिवशी दुपारी ३.०० वाजता विद्यार्थ्यांना गुणपत्रक तथा प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहे. याबाबत विभागीय मंडळांमार्फत सर्व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना सूचित करण्यात आलेले आहे.

यासंदर्भात विभागीय मंडळ कार्यकक्षेतील सर्व संबंधित प्राचार्य / विद्यार्थी व पालक यांनी नोंद घ्यावी.

Related posts:

Leave a Comment