राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद २०२६-२७ या उपक्रमात सहभाग घेण्याबाबत rashtriy balvidnyan parishad
संदर्भ: १. Dr. Rashmi Sharma, Head, SHRI Cell & Scientist, Head, NCSTC Division, Govt. of India, Ministry of Science and Technology, DST, New Delhi यांचे पत्र क्र. DST/NCSTC/FP/CSC19/2026, Dated: 06/07/2026.
२. सौ. संध्या धारडे, प्रकल्प अन्वेषक (Project Investigator) राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद, विश्वस्त – जिज्ञासा ट्रस्ट, ठाणे यांचे दि.: ७ जुलै २०२६ चे पत्र
आपणांस कळविण्यात येते की, दरवर्षीप्रमाणे भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, नवी दिल्ली यांचे कार्यक्रमांतर्गत डिसेंबर-२०२६ या कालावधीत राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. हा उपक्रम भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचा असून या उपक्रमामध्ये १० ते १७ या वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करून त्यांना वैज्ञानिक संशोधन पद्धतीचे ज्ञान व्हावे या दृष्टीने विशेष प्रयत्न केले जातात. सदर परिषदेचे आयोजन जिल्हा, विभागीय, राज्य आणि राष्ट्रीय अशा विविध पातळ्यांवर करण्यात येते. या उपक्रमात महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थी सहभागी होणे आवश्यक आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यात या नेटवर्क मार्फत जिज्ञासा ट्रस्ट, ठाणे ही संस्था राज्य समन्वयक संस्था म्हणून काम करीत आहे. या संस्थेकडून राज्य समन्वयक व जिल्हा समन्वयक यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत,
सन २०२६-२७ या वर्षाकरिता बाल विज्ञान परिषदेचा मुख्य विषय शाश्वततेसाठी विज्ञान आणि नवोपक्रम” (Main Theme: Science and Innovation for Sustainability) असा असून या अंतर्गत खालील पाच उपविषय ठरविण्यात आले आहेत.
१. कचरा व्यवस्थापनासाठी ‘RS’ (कमी करणे, पुनर्वापर, पुनर्प्राप्ती, पुनर्निर्मिती आणि पुनर्प्रक्रिया)
२. ऊर्जेसाठी E4 – शोध (Explore), प्रयोग (Experiment), सुधारणा (Enhance) आणि विकास (Evolve)
३. जल संकलन, जल उपयोग, जल पुनर्वापर आणि जल संवर्धन
४. अन्न, कृषी आणि आरोग्य
५. शाश्वततेसाठी भारतीय ज्ञान प्रणालीचा (IKS) वापर
राज्यस्तरावरून करण्यात आलेल्या नियोजनाप्रमाणे या वर्षीच्या जिल्हास्तरीय परिषद दिनांक १० ऑक्टोबर २०२६ पूर्वी, विभागीय स्तर १० नोव्हेंबर २०२६ पूर्वी आणि राज्यस्तरीय परिषद दिनांक १ व २ डिसेंबर
२०२६ रोजी आयोजित करावयाच्या आहेत.
राज्यस्तरीय परिषदेतून एकूण ३० प्रकल्प राष्ट्रीय स्तरासाठी आणि दोन प्रकल्प इंडिअन सायन्स काँग्रेससाठी निवडले जातील. या सर्व परिषदांची ठिकाणे संबंधितांना कळविण्यात येतील. राज्यस्तरीय परिषदेसाठी एक विद्यार्थी व त्यासोबत एक शिक्षक यांचाच प्रवास खर्च संयोजकांकडून करण्यात येणार आहे. दुसरा विद्यार्थी सहभागी होऊ शकेल परंतु त्याचा प्रवास खर्च दिला जाणार नाही.
या उपक्रमासाठी दोन विद्यार्थ्याच्या गटाने वैज्ञानिक संशोधन प्रकल्प पूर्ण करावयाचा असून त्यासाठी त्यांना सुमारे दोन ते तीन महिन्याचा कालावधी मिळणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने परिषदेच्या समन्वयकांकडून जिल्हा स्तरावर शिक्षक व मार्गदर्शकांसाठी घेण्यात येणाऱ्या कार्यशाळा लवकरात लवकर घेण्यात येतील असे महाराष्ट्र बाल विज्ञान परिषदेतर्फे कळविण्यात आले आहे. सदर कार्यशाळासाठी देखील परिषदेस सहकार्य करण्यात यावे
या उपक्रमामध्ये शाळांचा सहभाग वाढण्याच्या दृष्टीने प्रत्येक जिल्ह्यात ज्यावेळी गटशिक्षणाधिकारी व मुख्याध्यापक यांच्या सहविचार सभा आयोजित केल्या जातात, त्यावेळी परिषदेच्या समन्वयकांना या सभेस बोलावून या उपक्रमाची माहिती व कार्यक्रमाची रूपरेषा सर्वांना द्यावी.
या उपक्रमांतर्गत होणारी जिल्हा, विभागीय व राज्यस्तरावरील प्रशिक्षणे, परिषदा व कार्यशाळा यांना जे शिक्षक, प्रकल्प मार्गदर्शक, मूल्यमापन, परिषदांचे पदाधिकारी व समन्वयक उपस्थित राहतील त्यांचा प्रत्यक्ष उपस्थिती व प्रवास कालावधी हा कर्तव्य कालावधी समजण्यात येईल, असेही निर्देश आपल्या स्तरावरून द्यावेत.
१. श्री. सुरेन्द्र दिघे जिज्ञासा ट्रस्ट, कार्यकारी विश्वस्त, अध्यक्ष राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद, महाराष्ट्र राज्य
२. सौ. संध्या धारडे व्दारा जिज्ञासा ट्रस्ट, ठाणे, प्रकल्प अन्वेषक (Project Investigator) ९३२३०३७९७८
३. श्री. रवींद्र स्वामी, राज्य समन्वयक, धाराशिव – ९५५२८९४१०१
४. श्री. नंदकुमार कासार, शैक्षणिक राज्य समन्वयक, नाशिक ९४२३२९४५६४
५. श्री विश्वास कोरडे, रायगड (राज्य कार्यकारिणी सदस्य रा.बा.वि.प.) ९८१९२२७५९६
६. श्री. किशोरराजे, जळगाव (राज्य कार्यकारिणी सदस्य रा.बा.वि.प.) -९४२३१८५६७०
७. श्री बी. बी. जाधव, मुंबई (राज्य कार्यकारिणी सदस्य रा.बा.वि.प) ९८६९०४३६१९
८. श्री. अरुण मुळ्ये, रत्नागिरी (राज्य कार्यकारिणी सदस्य रा.बा.वि.प)-८६९८५१९३०६
९. श्री. सुनील पोटे, पुणे (राज्य कार्यकारिणी सदस्य रा.बा.वि.प.) ९५५२९९४२९४
१०. श्री. प्रसन्न खडसे, गोंदिया (राज्य कार्यकारिणी सदस्य रा.बा.वि.प.) ९७३०५३५२४१










