सरल (SARAL) पोर्टलवर नवोपक्रमशील व गुणवत्तापूर्ण शाळांच्या यशोगाथा, माजी विद्यार्थी संघ व शालेय समित्यांची माहिती अद्ययावत करण्याबाबत सूचना saral portal instructions 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सरल (SARAL) पोर्टलवर नवोपक्रमशील व गुणवत्तापूर्ण शाळांच्या यशोगाथा, माजी विद्यार्थी संघ व शालेय समित्यांची माहिती अद्ययावत करण्याबाबत सूचना saral portal instructions 

संदर्भ :

१) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दि.०१.१०.२०२५

२) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दि.०८.०४.२०२५

३) प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे पत्र क्र. प्राशिसं./टे-३०२/२०२६, दि.२१.०१.२०२६

४) प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे पत्र क्र. प्राशिसं./टे-३०२/२०२६, दि.२०.०२.२०२६

५) प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे पत्र क्र. प्राशिसं./टे-३०१/२०२१/४७१४, दि.२८.०२.२०२६

उपरोक्त विषयांकित व संदभीय पत्रांच्या अनुषंगाने आपणांस कळविण्यात येते की, सरल (SARAL) प्रणाली अंतर्गत स्कूल पोर्टलवर नवोपक्रमशील व गुणवत्तापूर्ण शाळांच्या यशोगाथा, माजी विद्यार्थी संघ तसेच विविध शालेय समित्यांची माहिती अद्ययावत करण्याबाबत यापूर्वी वेळोवेळी सूचना देण्यात आलेल्या आहेत.

तथापि, आपल्या कार्यक्षेत्रातील माहिती अद्याप पूर्णपणे अद्ययावत झालेली नसल्याचे निदर्शनास येत आहे. सदर बाब प्रशासकीय दृष्ट्या समाधानकारक नाही.

त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे तात्काळ कार्यवाही करण्यात यावी :–

१. सर्व माध्यमिक शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन करुन त्यामार्फत आयोजित उपक्रम, स्नेहसंमेलने तसेच शैक्षणिक कार्याची माहिती व छायाचित्रे स्कूल पोर्टलवर मुख्याध्यापक लॉगिनवरुन अपलोड करण्यात यावीत..

२. शाळा व्यवस्थापन समिती, सखी सावित्री समिती, महिला तक्रार निवारण समिती तसेच विद्यार्थी सुरक्षा समिती यांच्या अध्यक्षांची माहिती पोर्टलवर अद्ययावत करण्यात यावी.

३. उन्हाळी सुट्टयांमध्ये शाळांमधील मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शाळेत उपस्थित राहून संकेतस्थळे वेळोवेळी अद्ययावत करावीत.

तरी वरील सर्व माहिती आपल्या अधिनस्त सर्व शाळांकडून पुढील ०७ दिवसांच्या आत अद्ययावत करुन घ्यावी व करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल या कार्यालयास तात्काळ सादर करावा.

Related posts:

Leave a Comment