राज्यातील सर्व शाळा ९ जुलैला बंद आंदोलनाबाबत paripatrak 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राज्यातील सर्व शाळा ९ जुलैला बंद आंदोलनाबाबत paripatrak

संदर्भ :- विविध वर्तमान पत्रामध्ये छापून आलेली बामती

वरील विषयाबाबतचे संदर्भीय बामती सुलभ संदर्भासाठी सोबत जोडण्यात येत आहे.

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने राज्यातील खाजगी अनुदानित/अंशतः अनुदानित/विनाअनुदानित शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी हे त्यांच्या विविध मागण्यासाठी दि.०९ जुलै, २०२६ रोजी शाळा बंद आंदोलनात सहभागी होणार आहेत, असे उक्त संदर्भीय वृत्तपत्रातील बामतीद्वारे निर्देशनास आलेले आहे.

तरी विद्यार्थी हीत लक्षात घेता दि. ०९ जुलै, २०२६ रोजी कोणतीही शाळा बंद राहणार नाही याची आपल्या स्तरावरून दक्षता घ्यावी, तसेच ज्या शाळा दि. ०९ जुलै, २०२६ रोजी बंद राहतील त्या शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याची कार्यवाही आपल्यास्तरावरून करण्यात यावी व सदर बाब सर्व शाळांच्या निर्देशनास आणून द्यावी.

Leave a Comment