शासन निर्णय दि.०६.०२.२०२३ मधील तरतूदीनुसार अपात्र ठरलेल्या तथापि, तदनंतर पात्र ठरत असलेल्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालये व तुकड्या यांची माहिती शासनास सादर करणेबाबत shala mahiti paripatrak 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शासन निर्णय दि.०६.०२.२०२३ मधील तरतूदीनुसार अपात्र ठरलेल्या तथापि, तदनंतर पात्र ठरत असलेल्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालये व तुकड्या यांची माहिती शासनास सादर करणेबाबत shala mahiti paripatrak

संदर्भ-

१. संचालक (प्राथमिक) म.रा., पुणे यांचे अहवाल दि.०९.०४.२०२६ व दि.३०.०६.२०२६

२. शासन निर्णय क्र, माशाअ-२०२२/प्र.क्र.२७५/एसएम-४, दि.०६.०२.२०२३.

महोदय,

संदर्भाधीन दि.०६.०२.२०२३ अन्वये, सन २०२२-२३ वर्षाच्या संचमान्यतेनुसार, आधार पडताळणी पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार निश्चित होणारा शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी वर्ग अनुदानास पात्र ठरविण्यात आला आहे.

२. तथापि, उपरोक्त अटी च्या अनुषंगाने काही प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा/ वर्ग व तुकड्या या अपात्र ठरल्या आहेत. सदर शाळा, वर्ग व तुकड्या या नंतरच्या सन २०२३-२४ च्या संचमान्यतेनुसार पात्र ठरत असल्याचे शासनास निवेदने प्राप्त झाली आहेत. तसेच सदंर्भ क्र.१ येथील अहवालामध्ये देखील काही शाळा अशा प्रकारे पात्र होत असल्याचे कळविले आहे.

३. त्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, उपरोक्त दि.०६.०२.२३ मधील सन २०२२-२३ च्या संच मान्यतेनुसार अपात्र ठरलेल्या परंतु, सन २०२३-२४ च्या अथवा त्यानंतरच्या संचमान्यतेनुसार पात्र ठरत असलेल्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा / वर्ग व तुकड्या यांची माहिती आजच शासनास सादर करावी, ही विनंती.

Related posts:

Leave a Comment