डी.एल.एड प्रथम वर्ष ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया सन २०२६-२७ मधील शासकीय कोट्यातील रिक्त जागा विशेष फेरी क्र.२ द्वारे भरणेबाबत dled first year online pravesh
संदर्भ :
– १) परिषदेचे पत्र क्र. रारीसंप्रपम/सेवापूर्व शिक्षण/प्रवेश कक्ष/२०२६-२७/२००१६१६/२०२६. दि.०६/०७/२०२६
२) परिषदेचे पत्र क्र. राशैसंप्रपम/सेवा पूर्व शिक्षण/प्रवेश कक्ष/२०२६-२७/२०२०८४४/२०२६. दि.१५/०७/२०२६
३) दि.१४/०७/२०२६ रोजी जाहीर झालेल्या इयत्ता १२ वी. पुरवणी परीक्षेचा निकाल
दि.२३/०७/२०२६ पर्यंत विद्यार्थी, प्राचार्य अध्यापक विद्यालय यांची मुदतवाढीबाबत प्राप्त पत्रे
४) Note # २७ वरील मा. संचालक यांनी दिलेले निर्देश
उपरोक्त संदर्भीय पत्र क्र.१ अन्वये शासकीय कोट्यातील रिक्त जागा विशेष फेरीद्वारे “प्रथम येणान्यास प्रथम प्राधान्य” या तत्वायर दि.०८/०७/२०२६ ते दि.१२/०७/२०२६ या कालावधीत व संदर्भ क्र.२ नुसार मुदतवाढीनंतर दि.१५/०७/२०२६ पर्यंत नियोजित वेळापत्रकानुसार घेण्यात आली.
संदर्भ क्र.३ अन्वये विद्यार्थी व प्राचार्य अध्यापक विद्यालय यांनी केलेल्या मागणीनुसार दि.२५/०७/२०२६ ते दि.२७/०७/२०२६ या कालावधीत संदर्भ क्र.४ अन्वये विशेष फेरी क्र.२ सोबत संलग्न केलेल्या वेळापत्रकानुसार राबविण्यात येत आहे.
सदर विशेष फेरीबाबतच्या सर्व सूचना संदर्भीय पत्र क्र.१ अन्वये निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. करिता सुधारित वेळापत्रकानुसार डी. एल. एड प्रथम वर्ष ऑनलाईन विशेष फेरी क्र. २ संदर्भात संबंधितांनी विहित मुदतीत कार्यवाही करावी. तसेच याबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील अध्यापक विद्यालयांना अवगत करावे.










