“हर घर तिरंगा २०२६” अभियानांतर्गत राष्ट्रध्वज फडकविण्याबाबत ध्वज संहितेनुसार मार्गदर्शक सूचना har ghar tiranga paripatrak 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

“हर घर तिरंगा २०२६” अभियानांतर्गत राष्ट्रध्वज फडकविण्याबाबत ध्वज संहितेनुसार मार्गदर्शक सूचना har ghar tiranga paripatrak 

महोदय / महोदया,

भारत सरकारच्या “हर घर तिरंगा २०२६” अभियानाच्या अनुषंगाने नागरिक, खाजगी संस्था, शैक्षणिक संस्था तसेच विविध आस्थापनांनी राष्ट्रध्वज फडकविताना भारतीय ध्वज संहितेतील तरतुदींचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने राष्ट्रध्वज फडकविण्याबाबतच्या खालील बाबी सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणून देण्यात येत आहेत.

१. अभियानाचा कालावधीः

“हर घर तिरंगा २०२६” अभियानाचा कालावधी दि. ९ ऑगस्ट २०२६ ते दि. १७ ऑगस्ट २०२६ असा आहे. या कालावधीत नागरिक, खाजगी संस्था, शैक्षणिक संस्था तसेच विविध आस्थापनांना अभियानाच्या कालावधीतील कोणत्याही दिवशी राष्ट्रध्वज फडकविता येईल. तथापि, राष्ट्रध्वजाची प्रतिष्ठा, सन्मान व पावित्र्य अबाधित राहील, याची विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे.

२. दिवस व रात्र राष्ट्रध्वज फडकविण्याबाबत :

केंद्र शासनाने जुलै २०२२ मध्ये भारतीय ध्वज संहितेत केलेल्या सुधारणेनुसार, खुल्या जागेत किंवा नागरिकांच्या घरावर फडकविण्यात आलेला राष्ट्रध्वज दिवस तसेच रात्र अशा दोन्ही वेळेस फडकविता येतो.

३. राष्ट्रध्वज फडकविण्याच्या वेळेबाबत :

वरील तरतुदींनुसार, “हर घर तिरंगा २०२६” अभियानाच्या कालावधीत राष्ट्रध्वज फडकविण्यासाठी विशिष्ट दिवस अथवा वेळेचे बंधन नाही. नागरिकांना त्यांच्या सोयीनुसार अभियान कालावधीत कोणत्याही दिवशी व कोणत्याही वेळी राष्ट्रध्वज फडकविता येईल. मात्र, राष्ट्रध्वज फडकविताना त्याचा योग्य सन्मान राखणे तसेच भारतीय ध्वज संहितेतील सर्व नियम व तरतुदींचे पालन करणे आवश्यक आहे.

केंद्र शासनाच्या उपरोक्त निर्देशाप्रमाणे कार्यवाहीबाबत विनंती करण्यात येत आहे.

Related posts:

Leave a Comment