शासन अनुदानित आश्रम शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी शासनाचे अंशदान या योजनेच्या लेखाशिर्षास मान्यता देणेबाबत shikshak shikshaketar karmachari paripatrak
महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन परिपत्रक क्रमांकः बीयुडी-२०२६/प्र.क्र.४८/का-६ (ई-१६१००८८)
मंत्रालय, विस्तार, मुंबई- ४०० ०३२
दिनांकः २४ सप्टेंबर, २०२६
वाचा :-
१) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्र. संकीर्ण-२०२२/प्र.क्र.४०/सेवा-४, दि. ३० डिसेंबर, २०२४
२) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र. अआशा-२०२४/प्र.क्र.२५९/का.११, दि. १३ जानेवारी, २०२६
३) आयुक्त, आदिवासी विकास आयुक्तालय, नाशिक यांचे पत्र क्र. अनुशाआ-२०२२/प्र.क्र.२४/का.७ (१)/२१९१, दि. १८ मार्च, २०२६
प्रस्तावना :-
वित्त विभागाच्या संदर्भ क्र. (०१) येथील दि. ३०.१२.२०२४ रोजीच्या परिपत्रकानुसार नियोक्त्याच्या/शासनाच्या अंशदानाची रक्कम २०७१-Pension & Other Retirement Benefits, ११७-Defined Contribution Pension Scheme या लेखाशिर्षामधून खर्च करण्यासंबंधात सर्व प्रशासकीय विभागांनी स्वतंत्र आदेश निर्गमित करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. त्यानुसार विभागामार्फत संदर्भ क्र. (०२) येथील दि. १३ जानेवारी, २०२६ रोजीचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. त्यानुसार आयुक्त, आदिवासी विकास आयुक्तालय, नाशिक यांनी संदर्भ क्र. (०३) येथील दि. १८ मार्च, २०२६ रोजीच्या पत्रान्वये स्वयंसेवी संस्थांद्वारे चालविल्या जाणाऱ्या शासन अनुदानित आश्रमशाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नवीन परिभाषित अंशदायी निवृत्तिवेतन योजनेंतर्गत राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र लेखाशिर्ष उपलब्ध करुन देण्याची शासनास विनंती केली होती.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत स्वयंसेवी संस्थांद्वारे चालविल्या जाणाऱ्या शासन अनुदानित आश्रमशाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियोक्ता / शासनाच्या अंशदानाची रक्कम २०७१-Pension & Other Retirement Benefits, ११७-Defined Contribution Pension Scheme या मुख्य व गौण लेखाशिर्षामधून खर्ची घालण्यासाठी, महालेखापाल यांच्या कार्यालयाने दर्शविलेल्या सहमतीनुसार व वित्त विभागाने नव्याने उपलब्ध करुन दिलेल्या महसूली लेखाशिर्षांस मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय :-
राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत स्वयंसेवी संस्थांद्वारे चालविल्या जाणाऱ्या शासन अनुदानित आश्रमशाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियोक्ता / शासनाच्या अंशदानाची रक्कम 2071-Pension & Other Retirement Benefits, 117-Defined Contribution Pension Scheme या मुख्य व गौण लेखाशिर्षामधून खर्ची घालण्यासाठी, खालील लेखाशिर्षास शासन मान्यता देण्यात येत आहे:-
२. सदर शासन निर्णय प्रधान महालेखाकार (लेखा व हकदारी)-1, महाराष्ट्र यांच्या कार्यालयाचा अनौपचारिक संदर्भ क्रमांक सं.ख.वि/चा-५/आदिवासी विकास विभाग/युओआर-१००/२०२६-२७/७४३, दि. १०.०८.२०२६ अन्वये दर्शविलेल्या सहमतीनुसार व वित्त विभागाने ई नस्ती-१६१००८८ च्या नोट-८९ वर दि. ०१.०९.२०२६ रोजी दिलेल्या सहमतीस अनुसरुन निर्गमित करण्यात येत आहे.

३. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२६०९२४१२०६४८५२२४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,








