माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा वार्षीक तपासणी व शाळा भेटीचे नियोजन शैक्षणिक वर्ष (२०२६-२७) करणे बाबत shala varshik tapasani paripatrak
संदर्भ :-
१. मा. शिक्षण आयुक्त, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे पत्र क्र. प्राशिस /२०२५/नियमीत शाळा/आस्था, दि. १४.०६.२०२६.
२. मा. शिक्षण संचालक (माध्य. व उच्च माध्य.) यांचे पत्र क्र. शिसमा-२६/शाळा तपासणी/एस-१/२०२७३५९,दि. १७.०७.२०२६.
वरील संदर्भीय विषयान्वये माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा वार्षीक तपासणी व शाळा भेटीचे
नियोजन शैक्षणिक वर्ष (२०२६-२७) करणे बाबत कळविले आहे. तरी आपल्या जिल्हयातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची वार्षीक तपासणी व शाळा भेटीचे नियोजन या कार्यालय स्तरावरुन करण्यात आलेले असून नेमूण दिलेल्या आपल्या नावासमोरील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची १०० टक्के वार्षीक तपासणी करुन शाळा तपासणी अहवाल १५ मार्च २०२७ पूर्वी या कार्यालयात सादर करावा.
तपासणी करावयाची कार्यवाही करणे बाबत आपल्या अधिनीस्त उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी यांना आपल्यास्तरावरुन कळविण्यात यावे. वार्षीक तपासणी अहवाल GEO TAG फोटोसह सरल प्रणालीवर अपलोड करावे. शाळा भेटीकरीता पुढील मुद्दाची तपासणी/पडताळणी करावी.
१. शिक्षक व विद्यार्थी उपस्थिती
२. शाळा परिसर स्वच्छता व विद्यार्थी वैयक्तिक स्वच्छता.
३. वर्ग अध्यापन निरीक्षण (किमान एक वर्ग एक तासीका)
४. विद्यार्थ्यांशी संवाद, प्रश्नोत्तरे याद्वारे सर्व विषयनिहाय संपादणुक पडताळणी.
५. निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत विद्यार्थी संपादणुक.
६. आनंददायी शनिवार अंमलबजावणी.
७. विविध स्पर्धापरीक्षा तयारी.
८. डॉ. जयंत नारळीकर गणित व विज्ञान अध्ययन समृध्दी कार्यक्रम अंमलबजावणी.
९. PM POSHAN (मेणु आहार चव स्वच्छता इत्यादी)
१०. शाळेत उपलब्ध विविध शैक्षणिक साहित्य, किट, लॅब व त्याचा वापर.
११. शाळेत घेतले जाणारे खेळ व त्याबाबतची तयारी
१२. विद्यार्थी सुरक्षा संदर्भात उपाययोजना.
१३. सर्व शालेय अभिलेखे तपासणी
१४. उपरोक्त मुद्दयांच्या आधारे शाळेबद्दल सर्वसाधारण अभिप्राय (उल्लेखनीय बाबी, आढळलेल्या त्रुटी, सुचना इ. नमूद करावा.
सोबत :
१. मा. आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र.
२. मा. शिक्षण संचालक (माध्य. व उच्च माध्य.) म.रा. पुणे यांचे पत्र.
३. नेमणूक केलेल्या अधिकारी कर्मचारी यांची यादी.










