शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित करणेबाबत shala pravesh balkache kiman vay paripatrak

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित करणेबाबत shala pravesh balkache kiman vay paripatrak 

वाचा:-

महाराष्ट्र शासन

शालेय शिक्षण विभाग

शासन निर्णय क्रमांकः आरटीई २०२४/प्र. क्र. १३९ (ई-१४४६१२४)/ एसडी-१

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई- ४०००३२.

दिनांक : १५ ऑक्टोबर, २०२६.

१. शिक्षण संचालक (प्राथमिक), प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे यांचे पत्र, क्र. प्राशिसं/ड-३०१/ २०२४/७५८८, दि. ०४.१२.२०२४.

२. सह सचिव, स्कूल शिक्षा व साक्षरता विभाग, शिक्षा मंत्रालय, भारत सरकार यांचे पत्र, क्र. D.O. No. २२-७/२०२१-EE. १९/IS.१३, दि. १५.०२.२०२४.

३. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र. आरटीई २०१८/प्र. क्र. १८०/एसडी-१, दि.१८.०९.२०२०.

४. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र. आरटीई ९८१४/प्र. क्र. ११९/ एसडी-१, दि. २५.०७.२०१९.

५. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र. संकीण ९८१४/प्र. क्र. १६०/ एसडी-१, दि.२५.०१.२०१७.

६. शासन शुध्दीपत्रक, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र. संकीण ९८१४/ प्र. क्र. १६०/ एसडी-१, दि.२३.०१.२०१५.

७. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र. संकीण ९८१४/प्र. क्र. १६०/एसडी-१, दि.२१.०१.२०१५.

८. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र. पीआरई-२०१०/ (२१५)/प्राशि-१, दि.११.०६.२०१०.

प्रस्तावना :-

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९ नुसार बालकांच्या शाळा प्रवेशाबाबतची कार्यपध्दती शासन निर्णय, दि. ११.०६.२०१० अन्वये निश्चित करण्यात आलेली आहे. सदर शासन निर्णयात प्रवेशाबाबतच्या इतर तरतुदीबरोबरच शाळा प्रवेशासाठी बालकाचे वयाबाबतची तरतूद आहे. सदर तरतूदीनुसार इयत्ता १ ली मधील प्रवेशासाठीची वयोमर्यादा ६ वर्षे निश्चित केलेली होती. तथापि, ५ वर्षे पूर्ण झालेले बालक इयत्ता १ ली मधील प्रवेशासाठी पात्र राहतील, असे आदेशात नमूद केले होते. राज्यात राज्य मंडळाचा अभ्यासक्रम राबविणाऱ्या शाळा, सी. बी. एस. ई., आय. सी. एस. ई., आय. बी. अशा विविध प्रकारच्या शाळा आहेत. सदर सर्व प्रकारच्या शाळांमध्ये प्रवेशाच्या वेळेस इयत्ता १ ली साठी वेगवेगळी वयोमर्यादा वेगवेगळ्या दिनांकास ग्राह्य धरुन प्रवेश दिले जात होते. तसेच पूर्व प्राथमिकसाठी वर्गातील प्रवेशासाठी निश्चित अशी वयाची अट अस्तित्वात नव्हती. या बाबी विचारात घेऊन बालकांच्या किमान वयामध्ये शिथिलता आणण्यासाठी संदर्भाधीन शासन निर्णयान्वये बालकांच्या शाळा प्रवेशासाठी किमान वय निश्चित करण्यात आले आहे.

२. उपरोक्त तरतुदींमुळे शैक्षणिक वर्ष सुरू होताना प्ले ग्रुप / नर्सरी (इ. १ ली पूर्वीचा ३ रा वर्ग) २.५ वर्ष आणि इ. १ ली साठी प्रवेश देताना ५.५ वर्ष वयाच्या मुलांना प्रवेश दिला जातो. आता, केंद्र शासनाने इ. १ ली साठी प्रवेश देताना ६+ वर्ष वयाच्या मुलांना प्रवेश द्यावा, असे कळविलेले आहे. तसेच, नवीन शैक्षणिक धोरण २०२० नुसार, बालकांचे इयत्ता पहिलीतील वयाचे ६+ धोरण राबविताना पूर्व प्राथमिक (१ ली पूर्व) वर्गांना वयाचे धोरण ठरविल्यास इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश देताना वयाच्या अटीचा पुढील ३ वर्ष अडथळा येणार नाही, याकरिता बालवाडी/अंगणवाडी / नर्सरी यात प्रवेश देताना मुलाचे वय ३० जून रोजी ३ वर्ष पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी प्रवेशाबाबतची टप्याटप्याने अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. त्यास अनुसरून शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णयः-

सदर शासन निर्णयान्वये पूर्व प्राथमिक व इयत्ता १ मधील शाळा प्रवेशासाठीचे किमान वय खालील तक्त्यात नमूद करण्यात आल्याप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे.

२. पायाभूत वर्गासाठी नामांकन, नर्सरी ते इयत्ता पहिलीमध्ये प्रवेशासाठी किमान वय निकषांसह, राष्ट्रीय शिक्षण

धोरण, २०२० मध्ये दिलेल्या सुचनांचे पालन करण्यात यावे.

३. उपरोक्त तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे वयाचे निकष शैक्षणिक वर्ष २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू केले जातील.

४. सन २०२६-२७ च्या शैक्षणिक सत्रासाठी नर्सरी ते इयत्ता पहिलीच्या विद्यमान विद्यार्थ्यांसाठी हे वयाचे निकष

लागू होणार नाहीत.

५. पूर्व-प्राथमिक वर्गाच्या (नर्सरी) ते इयत्ता पहिलीसाठी शाळाप्रमुख स्तरावर किमान आणि कमाल वय १५ दिवसांची वयाची सूट दिली जाईल.

६. कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेतून मागील वर्ग उत्तीर्ण झालेल्या नियमित विद्यार्थ्यांना पुढील उच्च वर्गात प्रवेशासाठी वयानुसार निकष लागू करण्यापासून सूट दिली जाईल.

७. शैक्षणिक वर्ष २०२७-२८ पासून प्रवेश घेण्यासाठी, बालकांचे दि. ३० जून रोजी उपरोक्त तक्त्यात दर्शविल्यानुसार किमान वय पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे. (म्हणजेच, शैक्षणिक वर्ष २०२७-२८ मध्ये ३+ वर्षांच्या वयात नर्सरीमध्ये प्रवेश करणारे बालक ६+ वर्षांच्या वयात इयत्ता पहिलीमध्ये असेल.)

८. पूर्व-प्राथमिक वर्ग आणि इयत्ता पहिलीसाठी नवीन वयाच्या निकषांनुसार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत सूचना/मार्गदर्शक सुचना शिक्षण संचालक (प्राथमिक), प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे यांच्या स्तरावरून देण्यात याव्यात.

९. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२६१०१५१७१४४७१०४९ असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

शासन निर्णय pdf download 

Related posts:

Leave a Comment