जिल्ह्यामध्ये नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत साक्षरता दूत म्हणून निवृत्त शिक्षक, माजी सैनिक, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या व महिला बचत गटातील सदस्य यांची नियुक्ती करण्याबाबत navbharat saksharta karyakram circular
संदर्भ: 1
) शासन निर्णय क्रमांकः नभासाका-032/प्र.क्र.39/एस.डी. 2, मंत्रालय, मुंबई-32 दि. 14 ऑक्टोबर, 2022.
2) शासन निर्णय क्रमांकः नभासा-1626/प्र.क्र.84/एस.डी. 2, मंत्रालय, मुंबई-32 दि. 02 जून, 2026.
3) उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत राज्यस्तरीय नियामक परिषद बैठक दि. 15/10/2025.
महोदय/महोदया,
उपरोक्त संदर्भ क. 1 अन्वये, केंद्र पुरस्कृत उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने आदेशित केले आहे. त्यानुसार वय वर्षे 15 व त्यापुढील असाक्षर असणा-या व्यक्तींना साक्षर करण्यासाठी केंद्र पुरस्कृत उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम राज्यात राबविण्यात येत आहे. संदर्भ क. 2 अन्वये, आपण जिल्हा कार्यकारी समिती, उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच जिल्हा नियामक परिषदेचे उपाध्यक्ष आहात. संदर्भ क्र. 3 नुसार, मा. मंत्री महोदय, शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई यांनी उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमाचा प्रचार-प्रसार गाव पातळीपर्यंत करणेबाबत निर्देश दिलेले आहेत.
केंद्र शासनाच्या उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत जिल्ह्यातील असाक्षर प्रौढ नागरिकांना साक्षर करण्यासाठी सामाजिक बांधीलकी म्हणून लोकसहभाग वाढविणे आवश्यक आहे. या उद्देशाने समाजात विश्वासार्ह व सेवाभावी व्यक्तींचा सहभाग घेणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील निवृत्त शिक्षक, माजी सैनिक, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या तसेच महिला बचत गटातील सदस्य यांची ‘साक्षरता दूत’ म्हणून नियुक्ती करण्यात यावी. सदर साक्षरता दूतांमार्फत असाक्षर व्यक्तींचा शोध, नावनोंदणी, असाक्षरांची स्वयंसेवकांसोबत जोडणी (Tagging), साक्षरता वर्गाचे आयोजन, स्वयंसेवकांना शैक्षणिक सहकार्य, जनजागृती व कार्यक्रमाचा प्रचार-प्रसार व प्रभावी अंमलबजावणीस मदत होईल.
तरी आपल्या अधिनस्त सर्व गट विकास अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, आरोग्य अधिकारी, ग्रामपंचायती तसेच संबंधित विभागांना आवश्यक सूचना देऊन पात्र व्यक्तींची ‘साक्षरता दूत’ म्हणून नियुक्ती करण्याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश द्यावेत. केंद्र पुरस्कृत उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी सहकार्य करावे, ही विनंती.










