शास्रीय कला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना इ.१०वी परीक्षेमध्ये अतिरिक्त गुण देण्यासाठी ग्राह्य धरण्यात येतील अशा संस्थाची निवड करण्यासाठी पात्र कला संस्थांनी प्रस्ताव सादर करण्याबाबत (२०२६-२७) ssc exam additional marks circular
संदर्भ-
१. शालेय शिक्षण विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०१६/प्र.क्र.२०२/एस.डी.२ दिनांक: २४/११/२०१७
२. शालेय शिक्षण विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण-१०२३/प्र.क्र.७५/एस.डी. २ दिनांक: ०६/०२/२०२४
शास्त्रीय कला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे अतिरिक्त गुण देण्याबाबतच्या शासनाच्या धोरणानुसार पात्र विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण देण्यासाठी ग्राह्य धरण्यात येतील अशा संस्थाची सन. २०२६-२७ करीता निवड करण्यासाठी पात्र संस्थांकडून ऑनलाईन प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. त्यानुसास पात्र कला संस्थांनी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे यांचेकडे नोंदणीसाठी प्रस्ताव सादर करण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे.
१. कला क्षेतात्रील पात्र व इच्छुक संस्थांना दि.३१/१०/२०२६ ते दि.१५/११/२०२६ कालावधी खालील लिंकद्वारे ऑनलीईन अर्ज सादर करता येतील.
२. मागील वर्षी अथवा यापूर्वी अशाप्रकारे मान्यता प्राप्त असलेल्या संस्थांनीही याद्वारे आपले अर्ज नव्याने सादर करणे आवश्यक आहे.
३. परिपूर्ण प्रस्तावांची छाननी करुन सन. २०२६-२७ साठी संस्था मान्यतेसाठी शासनास शिफारस करण्याबाबत कार्यवाही करण्यात यईल.
४. अर्ज करण्यासाठी संस्थेचे शास्त्रीय कला व लोककला क्षेत्रातील किमान पाच वर्षाचे कार्य व नोंदणी असणे आवश्यक आहे.
५. अर्ज सादर करण्यासाठी लिंक- https://forms.gle/AqukjYuWmMpAhdF७९










