अवकाश विज्ञान संशोधनात इतिहास घडविणाऱ्या सुनीता विल्यम्स antralvir sunita williams
(१९ सप्टेंबर, १९६५)
अवकाश विज्ञान संशोधनात इतिहास घडविणाऱ्या सुनीता विल्यम्स या मूळ भारतीय वंशाच्या असून, कल्पना चावला यांच्या निधनानंतर भारतीय वंशाच्या दुसऱ्या व जगातील सहाव्या महिला आहेत. ज्यांना अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था अर्थात ‘नासा’तर्फे अंतराळ मोहिमेवर पाठविण्यात आले. सुनीता विल्यम्स यांचा जन्म १९ सप्टेंबर, १९६५ रोजी अमेरिकेच्या युक्लिड प्रांतातील ‘ओहिओ’ शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव दीपक पांड्या असून, गुजरात पश्चिम किनाऱ्यावर असलेल्या ‘मेहसाना’ या गावी त्यांचा जन्म झाला. ते अमेरिकेत प्रख्यात न्यूरोलॉजिस्ट आहेत. ते ‘मॅसॅचुट’ शहरात राहतात. सुनीता यांच्या आई ‘बॉनी’ या मूळच्या स्लोव्हेनियन. ‘स्लोव्हेनिया’ हा युरोपमधील एक लहानसा देश आहे. सुनीता विल्यम्स यांना भारतीय संस्कृती व भारत देशाप्रति अधिक प्रेम आहे. त्या सुखवस्तू कुटुंबातील आहेत. त्यांच्या घरचे वातावरण आनंदी आहे. सुनीता आपल्या आईसोबत अहमदाबाद येथे येत असत.
“तुला काय व्हायचे आहे?”
“मला अॅस्ट्रोनॉट व्हायचे आहे.”
तुझे डोके ताळ्यावर आहे? का खूळ लागले? कितीही जीवतोड प्रयत्न कर, तू अॅस्ट्रोनॉट तर कधीच होणार नाहीस. तुझ्यात त्यासाठी आवश्यक गुणच नाहीत. मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीची मुक्ताफळं त्यांच्या जिव्हारी झोंबली. त्या खूप रागवल्या. त्यांचे अक्षरशः डोके फिरते की काय? अस त्यांना झाले आणि त्यांनी अंतराळवीर होणारच हा दृढनिश्चय केला. वाटेल ते झाले तरी मी अॅस्ट्रोनॉट होणार म्हणजे होणारच! असा निर्धारच सुनीता विल्यम्स यांनी केला.
आज सर्व जग त्यांना ‘अंतराळवीर’ म्हणून ओळखते. सुनीता यांनी ‘फ्लोरिडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ मधून इंजिनिअरिंग मॅनेजमेंट या विषयात एम.एस्सी. ची पदवी संपादन केल्यानंतरच त्यांच्या स्वप्नपूर्तीचे दिवस दृष्टिक्षेपात येऊ शकले.
सुनीता यांना लहानपणापासून अंतराळ भ्रमणाविषयी उत्सुकता होत्या. त्या अंतराळ वैज्ञानिक होण्याची स्वप्न बघत होत्या. विश्वातील सर्व स्वर्गीय वस्तू ज्या अतिविशाल पोकळीत फिरतात, त्या पोकळीला ‘अवकाश’ किंवा ‘अंतराळ’ म्हणतात. बाह्य अवकाशाची सुरुवात पण पृथ्वीपासून ९५ किमी वर होते. दि. ४ ऑक्टोबर, १९५७ रोजी रशियाचा स्पुटिनक नामक उपग्रह पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालू लागला आणि तेव्हापासून या जगात अवकाश किंवा अंतराळ युगाची सुरुवात झाली. सुनीता यांच्या व्यक्तिमत्त्वाला पैलू पाडण्याचे श्रेय आणखी एका गोष्टीला दधावे लागेल. ते म्हणजे स्काऊट गाईड प्रशिक्षण, शाळेत असताना सुनीता स्काऊट गाईडच्या सभासद होत्या.
इसवी सन १९५८ साली अमेरिकेत नॅशनल एरोनॉटिकल स्पेस एव्हिएशन म्हणजे ‘नासा’ या अंतराळ विज्ञान संशोधन संस्थेची स्थापना करण्यात आली. त्या योगे अवकाशात दूर दूर जाणे, तिथे काही काळ वास्तव्य करणे आणि तिथेच विज्ञान प्रयोग करणे शक्य होऊ शकले. ‘मॅक्सीम फॅगेट’ नामक वैज्ञानिकाने पहिले स्पेस शटल यान तयार केले. त्याला अवकाश परिवहन यंत्रणा (Space Transporation System) म्हणतात. एस.टी.एस. स्पेस शटलचे प्रमुख तीन भाग असतात. १) पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालणारे यान, २) इंधन भरलेली बाह्य टाकी ३) पृथ्वीवरून उड्डाण करण्यासाठी वापरावयाचे दोन अग्निबाण. एस.टी.एस यानाचे वजन २०,००,००० किलोग्रॅम असून उंची साधारण, ५६ मीटर एवढी असते. पृथ्वीभोवताली प्रदक्षिणा घालणाऱ्या यानाला ‘ऑर्बिटर’ म्हणतात. सर्वांत वरच्या भागाला ऑर्बिटर, त्याच्या खाली व बाह्य टाकीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला हा एक असतो. ऑर्बिटरमध्ये अंतराळवीर बसतात. अवकाशात नेण्याच्या वस्तू संगणक, इलेक्ट्रॉन आणि तीन मुख्य इंजिन असतात. बाह्य टाकीत प्राणवायू भरलेला असतो. अग्निबाणाला लागणारे इंधन बाहेर जात असल्यामुळे, उड्डाण प्रक्रियेतच या यानाचा एक भाग, यान अवकाशात गेल्यावर, बल कार्यरत होते. टाकीचा काही भाग यानापासून अलग करून फेकून देण्यात येतो. आकार आणि वस्तुमान कमी होऊन मोठे
इसवी सन १९९३ साली अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, इटली इत्यादी देशांच्या सहभागाने आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक स्थापन करण्यात आले. स्पेस शटलची आता आंतरराष्ट्रीय संशोधन संस्था झाली. इसवी सन १९९८ साली सुनीता विल्यम्स यांची अंतरिक्ष अभियानासाठी निवड झाली आणि त्यांच्या आनंदाला उधाण आले. सुनीता सर्व कसोट्यांतून तावूनसुलाखून बाहेर पडल्या. त्या झपाट्याने कामाला लागल्या. अंतराळ प्रशिक्षण संपल्यावर लगेच डिसेंबर २००६ मध्ये अमेरिकेच्या डिस्कव्ही यानासोबत त्यांना अवकाशात पाठविण्यात आले. फ्लाईट इंजिनिअरिंगचे कार्य त्यांनी यशस्वीपणे पार पाडले. या मोहिमेत त्यांचे अन्य सहकारी होते. अमेरिकेचे मायकेल लोपेझ, रशियाचे मिखाईल टायूरिन आणि अल्जेरिया इत्यादी सर्व यान सदस्यांनी आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रावर गेल्यानंतर पृथ्वीवरून नेलेली सामग्री ठीक केली. तेथील जीवनशैली स्वीकाण्यास त्यांना एक आठवडा लागला. अवकाश केंद्राभोवती सुनीता विल्यम्स यांनी २२ तास २७ मिनिटे इतका ‘स्पेस वॉक’ करून अंतराळ विज्ञानात इतिहास निर्माण केला. या संशोधनातून वैज्ञानिकांना मानवी शरीरास भाररहित होण्याच्या परिणामांची मोलाची माहिती मिळू शकेल. तसेच मांसपेशी आणि हाडांवर अवकाशात ६ महिन्यांपर्यंत वास्तव्य करताना त्यांनी शारीरिक अध्ययन करून आपल्या रक्तावरसुद्धा संशोधन केले. यावरून एखादया सूत्राचा शोध घेणे शक्य होऊ शकेल. अवकाशात असताना २००७ रोजी त्यांनी नववर्ष पृथ्वीभोवती १६ प्रदक्षिणा पूर्ण करून साजरे केले.
अटलांटिसचा पृथ्वीवर परत येण्याचा म्हणजे परतीचा दिवस २१ जून, २००७ होता. भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री ११.३० ची अडथळ्यांची शर्यत संपली नव्हती. यानाला आणखी एक अडथळा पार करावा लागणार होता, २१, २२ जून रोजी फ्लोरिडा येथील हवामान लैंडिगला अनुकूल नव्हते. खराब हवामानामुळे नियोजित स्थळी व ठरलेल्या वेळी यानाचे लैंडिंग होऊ शकले नाही. वादळाची चिन्हे दिसत होती. ८००० फुटांवर ढगांची दाटी झाली होती. ते दोन दिवस मोठे कसोटीचे ठरले, जमिनीवर उतरण्यासाठी
तज्ज्ञ अक्षरशः डोळ्यांत तेल घालून लक्ष ठेवून होते. अंतराळवीरांच्या सुखरूप आगमनाबाबत सर्व प्रकारची दक्षता घेणे चालू होते, नासाने २२ तारखेला दोन वेळा लैंडिंगचा प्रयत्न केला. त्यात त्यांना यश आले नाही. २३ तारखेला ११ वाजून २० मिनिटांनी केलेला प्रयत्नही असफल ठरला.
२४ जूनपर्यंत पुरेल, एवढेच इंधन शटलच्या टाकीत होते. ‘मन चिंती ते वैरी न चिंती’ तत्पूर्वी फ्लोरिडाच्या हवामानात अपेक्षित बदल झाला नाही तर? हृदयाचे ठोके वाढले. सुनीता आणि अंतराळवीरांच्या कुटुंबीयांची जीवाची घालमेल झाली. भारतवासीयांचा जीव टांगणीला लागला होता. साऱ्यांना वेध लागले होते अवकाशयानाच्या लैंडिंगचे. ‘नासा’ने योग्य निर्णय घेतला. कॅलिफोर्नियातील ‘एडवर्ड विमानतळ’ तेथील वातावरण कोरडं होतं, आकाशही निरभ्र होतं ही समाधानाची बाब ! १ वाजून २० मिनिटे ‘नासा’ने वेळ निश्चित केली. एडवर्ड विमानतळावर ‘अटलांटिस यान’ उतरविण्याची तयारी सुरू झाली. यानाने १२.१५ च्या सुमारास पृथ्वीच्या पाठीवर कक्षेत प्रवेश केला. यानातील हायड्रोलिक सिस्टीम व अन्य मशीन्स योग्य पद्धतीने कार्यरत आहे, हे समजताच शास्त्रज्ञांचा जीव भांड्यात पडला. गतीवर नियंत्रण मिळवत यानाने आपला मोर्चा कॅलिफोर्नियाकडे वळविला होता. ही १.२० मिनिटे म्हणजे सुवर्णाक्षरांनी नोंदवावा असा तो क्षण ! यान जमिनीवर उतरल्यावर साऱ्यांनीच सुटकेचा निःश्वास टाकला. ‘वेलकम बँक, काँग्रॅच्युलेशन्स ऑन अवर ग्रेट मिशन!’ ‘नासा मिशन’ कंट्रोलने विजयी अंतराळवीरांचे अभिनंदन केले. अशा प्रकारे परतीचा प्रवास गोड झाला. सुनीता विल्यम्स यांना आजपर्यंत अनेक पुरस्कार मिळाले. त्यात नेव्ही कमेंडशन मेडल, नेव्ही कोर्स, ‘अचिव्हमेंट मेडल्स ह्यूमेटेरियन’, सर्व्हिस मेडल अमेरिकेत एका टेलिव्हिजन नेटवर्कने दिलेल्या ‘पर्सन ऑफ द वीक’ अशा अनेक पुरस्कारांनी त्यांचा सन्मान करण्यात आला. डिलवर्थ एलिमेंटरी स्कूलच्या एका विद्यार्थ्याने सुनीता विल्यम्सला विचारले, “तुमच्या पाऊल खुणांवर चालणाऱ्या मुलांना तुम्ही कोणता संदेश दयाल? “विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना त्या
म्हणाल्या, “तुम्हांला जे काम मनापासून आवडते, जो व्यवसाय आवडतो तो मन लावून करा.” आता ५ जून, २०२४ ला सुनीता विल्यम्स व बच विलमोर परत अंतराळात गेले आहेत. आठ दिवसांसाठी हे अंतराळात गेले होते; पण अजूनही पृथ्वीवर परतले नाहीत. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा ‘आणि ‘बोईंग’ ही एअरोस्पेस कंपनी या दोघांची मिळून ‘स्टारलायनर’ ही पहिली व्यावसायिक चाचणी मोहीम होती. ती यशस्वी व्हावी म्हणून तब्बल ५० तास ४० मिनिटांचे असे सात ‘स्पेस वॉक’ विक्रम नावावर असलेल्या सुनीता विल्यम्स व तिच्यासोबत बेरी ऊर्फ बच विलमोर या अनुभवी अंतराळवीरांची निवड करण्यात आली. परंतु गेल्या ५ जूनच्या उड्डाणाच्या वेळीच स्टारलायनरमध्ये काहीसा बिघाड झाला. हेलियमची गळती होऊ लागली. पृथ्वीपासून साडेतीनशे किमी उंचीवर ताशी अंदाजे २८ हजार किमी वेगाने घिरट्या घालणाऱ्या स्थानकावर पोहोचण्याच्या वेळी ती लक्षात आली. परिणामी आठ दिवसांत परत येणारे हे दोघे गेले तीन महिने अंतराळातच अडकले. सुनीता विल्यम्स कधी परत येणार, कशा परत येणार, याबद्दल जगभरात खास करून भारतीयांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. अखेर त्या १९ मार्च, २०२४ ला पृथ्वीवर उतरल्या.









