“एकीची ताकद” मराठी बोधकथा marathi bodhkatha
एकीची ताकद
एक गृहस्थ म्हातारपणामुळे धकले होता. आयुष्यात चांगले जीवन जगूल सुद्धा त्याच्या पाच मुलांमध्ये सतत चालणाऱ्या भांडणांमुळे तो दुःखी होत होता. त्याने आपल्या मुलांना बराच उपदेश केला; पण पालथ्या घड्यावर पाणी, एके दिवशी त्याने आपल्या पाचही मुलांना प्रत्येकी हातभर लांबीची एक एक काठी घेऊन यायला सांगितले. त्याप्रमाणे ती मुले एकेक काठी घेऊन आली. त्या गृहस्थाने त्यांच्यापैकी प्रत्येकाला आपापली काठी मोडण्यास सांगितले. वडिलांनी सांगितलेली ती गोष्ट प्रत्येक मुलाने लगेचच करून दाखवली.
पुन्हा त्या गृहस्थाने त्या मुलांना तशाच प्रकारची एकेक काठी घेऊन यायला सांगितले. पाचही जणांनी पाच काठ्या आणून वडिलांपुढे ठेवल्या. वडिलांनी त्या पाच काठ्यांची एका दोरीने मोळी बांधली आणि प्रत्येकाला ती मोडायला सांगितली. पाच काठ्या एकत्र असलेली ती मोळी आपल्या पाच मुलांपैकी कुणालाच मोडता येत नसल्याचे पाहून तो गृहस्थ त्यांना म्हणाला, “बघितलं ना? एकीचे बळ किती असते ते?” वडील एवढेच बोलले, पण ती सुज्ञ मुले जे काही समजायचे ते समजले. तेव्हापासून ते सगळे एकजुटीने वागू लागले.









