“धैर्यशील विवेकानंद !” मराठी बोधकथा marathi bodhkatha
धैर्यशील विवेकानंद !
बनारसमध्ये असताना स्वामी विवेकानंद एकदा एका अरुंद पायवाटेने चालले होते. वाटेत लाल तोंडाची माकडे त्यांच्या पाठीमागे लागली. त्यांच्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी स्वामीजी पळू लागले; पण ती माकडे काही त्यांचा पिच्छा सोडेनात.
इतक्यात पळणाऱ्या स्वामीजींना कुठून तरी एका साधूचा आवाज ऐकू आला. “पळू नका ! त्यांना सामोरे जा !” असे तो त्यांना सांगत होता. त्यांच्या सांगण्यानुसार स्वामीजी एकदम वळले आणि माकडाकडे तोंड करून खंबीरपणे उभे राहिले आणि काय आश्चर्य !
सर्व माकडे मागे सरली आणि पळून गेली. या अनुभवावरून स्वामी विवेकानंदांनी सर्वांना सांगितले की, संकटांना घाबरून पळू नका. त्यांना धैर्याने तोंड दया.









