२६ नोव्हेंबर संविधान दिन सुंदर भाषण sanvidhan din bhashan 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

२६ नोव्हेंबर संविधान दिन सुंदर भाषण sanvidhan din bhashan 

२६ नोव्हेंबर संविधान दिन सुंदर भाषण खालील प्रमाणे

आदरणीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व प्रमुख पाहुणे व माझे गुरुजन वर्ग आणि माझ्या बंधू आणि भगिनींनो तुम्हा सर्वांना सर्वप्रथम संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

सर्वधर्म संप्रदाय जगी एकत्र गुंफले…..

संविधानाने बीज संमतेची रोवले……

आज आपण सर्वजण संविधान दिन साजरा करण्यासाठी येथे एकत्र जमलो आहोत 26 नोव्हेंबर 1949 रोजी देशाच्या संविधान सभेने राज्यघटना स्वीकारली हा तो दिवस आहे जेव्हा संविधान तयार झाले संविधानाचा सन्मान हाच आमचा अभिमान भारताच्या संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधानाच्या मसुद्याला मंजुरी दिली ही मंजुरी मिळताच जयजयकार जयघोष झाला या पद्धतीने संविधान सभेच्या सदस्यांनी आनंद साजरा केला 26 नोव्हेंबर संविधान दिन एक प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी अभिमानाचा दिवस आहे.

कोणताही देश संविधानाशिवाय चालू शकत नाही भारतातील विविध धर्म आणि जातींच्या 140 कोटी लोकसंख्येला एक देश म्हणून एकत्रित करणारी हीच राज्यघटना आहे श्रद्धा, उपासनेचे स्वातंत्र्य हाच संविधानाचा मूलमंत्र होय.

15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वातंत्र्य झाला तेव्हा आपल्याकडे स्वतःची कोणतीही संविधान नव्हते संविधानाशिवाय देश चालवता येत नाही म्हणून संविधान सभेची स्थापना करण्यात आली पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, श्यामाप्रसाद मुखर्जी मौलाना अबुल कलाम आझाद हे नेते या बैठकीचे प्रमुख सदस्य होते तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. म्हणून त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असेही म्हटले जाते.

2015 मध्ये भारत सरकारने 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. 2015 हे वर्ष यासाठी विशेष ठरले कारण त्यावर्षी राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 125 वी जयंती साजरी करण्यात आली. भारत सरकारने आंबेडकरांची 125 वे जयंती वर्ष साजरे केले जात असताना त्यांना एक प्रकारची श्रद्धांजली वाहण्यासाठी 26 नोव्हेंबर 2015 रोजी पहिला अधिकृत संविधान दिन साजरा केला. तेव्हापासून संविधानिक मूल्यांबद्दल नागरिकांमध्ये आदराची भावना वाढवण्यासाठी हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो.

“संविधानाची महानता विविधतेत एकता

लोकशाहीचा जागर संविधानाचा आदर”

संविधान तयार करण्यासाठी दोन वर्षे 11 महिने 18 दिवस लागले 26 नोव्हेंबर 1949 रोजी पूर्ण होऊन त्याचा स्वीकार करण्यात आला यानंतर एक वर्षांनी म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटना लागू करण्यात आली. आपल्या संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य भारतात राहण्याचा समान अधिकार दिला आहे.

पाश्चिमात्य संस्कृतीच्या युगात देशातील तरुणांमध्ये संविधानाची मूल्य रुजवणे हा संविधान दिन साजरा करण्यामागचा एकमेव उद्देश आहे. आपल्या देशाच्या संविधानाच्या निर्मितीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सर्वात महत्त्वाचा वाटा होता. त्यामुळे त्यांना आदरांजली वाहण्याचे प्रतीक म्हणून संविधान दिन साजरा केला जातो संविधानामुळेच आपण स्वतंत्र देशाचे स्वतंत्र नागरिक आहोत राज्यघटनेने दिलेले मूलभूत अधिकार हे आपली ढाल म्हणून काम करून आपल्याला हक्क बहाल करत आहे.असले तर त्यात दिलेली मूलभूत कर्तव्य आपल्याला आपल्या जबाबदाऱ्यांची आठवण करून देतात.

भारतीय संविधान हे जगातील सर्वात लांब लिखित संविधान आहे त्याचे बरेच भाग युनायटेड किंगडम अमेरिका जर्मनी आयर्लंड ऑस्ट्रेलिया कॅनडा आणि जपानच्या संविधानांमधून घेतले गेले आहेत. यामध्ये देशातील नागरिकांचे मूलभूत अधिकार कर्तव्य सरकारची भूमिका पंतप्रधान राष्ट्रपती राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांचे अधिकार यांचे वर्णन केले आहे.विधिमंडळ कार्यपालिका आणि न्यायपालिका यांचे काम काय आहे देश चालवताना त्यांची भूमिका काय असावी. अशा या सर्व गोष्टी राज्यघटनेत नमूद केले आहेत.

या संविधान दिनी आपण आपली मूलभूत कर्तव्य आणि देशाचे कायदे आयुष्यभर पाळण्याची शपथ घेतली पाहिजे. देशाचा एक चांगला आणि जबाबदार नागरिक बनल्याने संविधानाचा उद्देश तर पूर्ण होईलच शिवाय संविधान निर्मात्यांच्या स्वप्नातील राष्ट्रीय घडेल. आज देशातील एका मोठ्या वर्गाचे जीवनमान गरीब आफ्रिकन देशांपेक्षा वाईट आहे त्याला अन्न वस्त्र शिक्षण आरोग्य या मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत त्यांना शोषणाचे बळी व्हावे लागते.मित्रांनो आज आपण अशा लोकांना आर्थिक आणि सामाजिक न्याय मिळवून देण्याची शपथ घेतली पाहिजे.आर्थिक विषमतेची खोल दरी कमी करून राज्यघटनेचे उद्दिष्ट पूर्ण होईल या देशातील या सर्वात महान दिनाबद्दल माझे दोन शब्द ऐकल्याबद्दल सर्वांचे आभार जय हिंद जय भारत

Leave a Comment