संच मान्यता व शालार्थ पदांची जोडणी केल्यानुसार वेतन देयक सादर करणेबाबत sanchmanyata shalartha
संदर्भ श्री. पवन जोशी, प्रोजेक्ट लिड, शालार्थ शालार्थ सिस्टीम यांकडील संदेश दि. ९.१०.२०२५
शालार्थ व संचमान्यता या दोन्ही प्रणालीची जोडणी इंटीग्रेशन केलेले असून, शालार्थ मध्ये पे-विल जनरेट करत असताना संचमान्यत्तेमधील मान्य पदांपेक्षा जास्त पदांचे देयक अदा करावयाचे असल्यास एक स्तर वरिष्ठ अधिकारी यांनी सदर देयकास मंजूरी दिल्यानंतर सदर देयक वेतन पथक कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे. पगार देयकामधील मान्य पदांपेक्षा जास्त असल्यास अशा पदांचे वेतन करतांना एक स्तर बरिष्ठ अधिकारी यांनी अशा देयकांना मान्यता घेणे अनिवार्य असेल.
याबाबतच्या कार्यप्रणाली विषयीची सविस्तर युजर मॅन्युअल शालार्थ प्रणालीवर उपलब्ध केले आहे.
शालार्थ व संचमान्यता या दोन्ही प्रणालीचे जोडणी बाबतच्या कार्यप्रणाली संदर्भात सूचना खालीलप्रमाणे आहेत. १. शालार्थ मध्ये संचमान्यता पोस्ट मॅपिंग व युडायस कोड मॅपिंग ची प्रोसेस पुर्ण असणे अनिवार्य आहे.
२. DDO Level 1 (शाळा / कॉलेज) स्तरावर वेतन देयक तयार करता येणार आहे.
३. मदर वेतन देयक फॉरवर्ड करताना व संचमान्यता प्रणाली मधुन सदयस्थितीमध्ये मान्य पंदाचा तपशील तपासुन जर
संचमान्यतेपेक्षा जास्त पदांचे वेतन देयक तयार झालेले असेल तर शालार्थ प्रणाली तसा संदेश येईल व तसेच शाळा स्तरावर त्याबाबतचा सर्व तपशील शाळा प्रमुखांच्या लॉगीन मध्ये Error Screen याबटनावर क्लीक केल्यावर उपलब्ध
होईल.
४. यानंतर सदर देयक हे एक स्तर बरिष्ठ अधिकारी यांना मान्यतेसाठी Forward to EO (Primary & Secondary) व
DYD याबटणावर क्लीक केल्यानंतर सदर वेतन देयक हे एक स्तर बरिष्ठ अधिकारी यांचे लॉगीनला उपलब्ध होईल.
५. एक स्तर वरिष्ठ अधिकारी (EO (Primary & Secondary) / Dy Director) यांचे स्तरावर सदर देयकाचा सविस्तर
तपशील उपलब्ध होईल, यास्तरावर मंजूरी मिळाल्यानंतरच सदर देयक शाळा प्रमुखांकडे कार्यवाहीसाठी उपलब्ध होईल.
१. सद्यस्थितीमध्ये बाजगी अनुदानीत प्राथमीक व माध्यमीक शाळांसाठी गदर मुविधा उपलब्ध झालेली असुन पुडिल आठवड्यामध्ये उच्च माध्यमीक शाळा करीता मदर सुविधा कार्यान्वीत होईल.
२. ज्या माध्यमिक शाळांची संचमान्यता प्रलंचित आहे. त्या शाळांच्या संचमान्यता करण्याची कार्यवाही संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) व विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी शाळा प्रमुखांमार्फत त्वरीत नियमाप्रमाणे करावी. शैक्षणिक वर्ष २०२४-२५/२०२५-२६ (यापैकी लागू असेल ती) संचमान्यतेअभावी संबंधित शाळांच्या वेतन देयकासंबंधी अडचणी निर्माण झाल्यास याची संपूर्ण जबाबदारी शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) व विभागीय शिक्षण उपसंचालक यांची राहील. यापुढे विहित कानमयदित संचमान्यता करीता आवश्यक असलेली माहिती यु-डायस व सरल प्रणालीवर अद्ययावत करणे शाळा प्रमुखांना अनिवार्य अमेल, माहिती योग्य नोंदवली नसल्यास संचमान्यता त्या त्या वर्षाची होणार नाही.
करीता उपरोक्त प्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.









