6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त मराठी भाषण mahaparinirvan din marathi bhashan

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त मराठी भाषण mahaparinirvan din marathi bhashan

1. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्यप्रदेशातील इंदौर जिल्ह्यामधील ‘महू’ येथे झाला.

2. भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून त्यांना ओळखलं जातं.

3. स्वतंत्र भारताचे पहिले कायदे मंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिलं.

4. अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी इकोनॉमिक्समध्ये पी.एच.डी. मिळवली. असे करणारे ते पहिलेच भारतीय होते.

5. मराठी, हिंदी, इंग्रजी, पारशी, गुजराती, पाली, संस्कृत, बंगाली, जर्मन, फ्रेंच इ. भाषा त्यांना अवगत होत्या.

6. भारतरत्न डॉ.आंबेडकर यांच्या ‘The Problem of the Rupee – Its origin and its solution’ पुस्तकाच्या आधारावर ‘रिझर्व बँक ऑफ इंडिया’ची पायाभरणी झाली.

7. तत्कालीन भारतीय समाजात अस्पृश्यांना दिली जाणारी हीन वागणूक डॉ. आंबेडकरांनी स्वतः अनुभवली होती. त्यामुळे त्यांच्या हक्कांसाठी ते आयुष्यभर झटले.

8. ‘शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा’, असा संदेश त्यांनी जनतेला दिला.

9. 14 ऑक्टोंबर 1956 रोजी नागपूर येथे 5,00,000 अनुयायांसमवेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.

10. 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली येथील राहत्या घरी झोपेत असताना या महामानवाचं महापरिनिर्वाण झालं. दलितांचा कैवारी अनंतात विलीन झाला.

Related posts:

Leave a Comment