गुणवत्ता दर्जा सुधार योजनेंतर्गत अध्यापकांना प्रतिनियुक्तीने पाठविण्यासाठी मार्गदर्शक सूचना adhyapaka deputation 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

गुणवत्ता दर्जा सुधार योजनेंतर्गत अध्यापकांना प्रतिनियुक्तीने पाठविण्यासाठी मार्गदर्शक सूचना adhyapaka deputation 

संदर्भ

: १) समक्रमांकाचा शासन निर्णय, दि. २४/०२/२०२१.

२) संचालक, तंत्रशिक्षण यांचे पत्र DTEM-D४A०EST२/१४७/२०२५, Desk४१, दि.२०/०८/२०२५.

प्रस्तावना :-

तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील शासकीय व अशासकीय अनुदानित तंत्रनिकेतने व तत्सम संस्था, अभियांत्रिकी महाविद्यालये व औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयांमधील अध्यापकांना गुणवत्ता दर्जा सुधार योजनेंतर्गत प्रतिनियुक्तीने उच्च शिक्षणासाठी (पीएच.डी./एम.ई/एम.टेक./एम. फार्म.) पाठविण्याबाबत संदर्भाधिन क्र.१ येथील शासन निर्णयान्वये मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.

सदर शासन निर्णयामधील परिच्छेद (१) (क) २ मध्ये नमूद केल्यानुसार अर्जदाराने एम.ई/एम.टेक/एम.फार्म करीता प्रवेश घेण्यापूर्वीच्या आधीच्या वर्षात प्रतिनियुक्तीकरीता दि.३० सप्टेंबर पर्यंत अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. तसेच निवड समितीने प्रत्येक वर्षाच्या माहे, जानेवारी अखेरपर्यंत शासनास शिफारशी सादर करण्याची कालमर्यादा विहीत केलेली आहे. तथापि, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांच्या गुणवत्ता सुधार योजनेअंतर्गत पीएच.डी. व एम.ई/एम.टेक. अभ्यासक्रमाच्या वेळापत्रकानुसार एम.ई./एम.टेक अभ्यासक्रमाकरीता प्रवेश प्रक्रिया ही प्रवेश घेण्यापूर्वीच्या आधीच्या शैक्षणिक वर्षात होत नसून, संबंधित शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस होते. त्यामूळे अर्जदारांना संदर्भाधिन क्र.१ येथील शासन निर्णयातील वेळापत्रकानुसार अर्ज सादर करणे शक्य होत नसल्याने ते या योजनेतंर्गत प्रतिनियुक्तीस पात्र ठरत नव्हते.

त्यानुषंगाने संदर्भाधिन क्र.०२ येथील प्राप्त प्रस्तावानुसार, गुणवत्ता सुधार योजनेअंतर्गत एम. ई. / एम.टेक /एम. फार्म इ. पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमास प्रतिनियुक्तीसाठी अर्जदारांनी अर्ज करणे, संदर्भाधिन क्र.१ येथील शासन निर्णयान्वये गठीत समितीची बैठक घेऊन शासनास शिफारशी करणे इ. बाबत स्वतंत्र वेळापत्रक निर्धारीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णयः

गुणवत्ता सुधार योजनेअंतर्गत अध्यापकांना प्रतिनियुक्तीवर पाठविण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये एम. ई. /एम.टेक/एम. फार्म इ. पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमास प्रतिनियुक्तीवर पाठविण्यासाठीच्या वेळापत्रकात खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे :-

१) एम.ई/ एम.टेक/ एम. फार्म इ. पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी गुणवत्ता सुधार योजनेअंतर्गत अर्ज करण्याची मुदत : प्रत्येक वर्षी दि. ३० जुन पर्यंत.

२) प्राप्त अर्जाच्या अनुषंगाने, तंत्रशिक्षण संचालनालय स्तरावर समिती गठित करुन शासनास शिफारशी करण्याची मुदत प्रत्येक वर्षी ३१ जुलै पर्यंत.

०२. गुणवत्ता दर्जा सुधार योजनेअंतर्गत प्रतिनियुक्तीसाठी निवड प्रक्रियेच्या संदर्भाधिन क्र.१ येथील शासन

निर्णयातील अन्य सर्व मार्गदर्शक सूचना कायम राहतील.

०३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५१२०२१६१८२४१९०८ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

शासन परिपत्रक pdf download

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

Related posts:

Leave a Comment