क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त सोपे मराठी भाषण krantijoti savitribai fule jayanti
शिक्षणाच्या स्वर्गाचे, जिने उघडले दार ।
तीच सावित्री….
आज जगाची शिलेदार !
सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजनवर्ग आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो.
आज मी आपणासमोर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी बोलणार आहे. सर्वप्रथम, सावित्रीबाई फुले यांना माझे त्रिवार
वदन. सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या त्यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्हयातील नायगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते. त्यांचा विवाह वयाच्या ९ व्या वर्षी ज्योतिबा फुले
यांच्याशी झाला.
त्याकाळी स्त्रियांनी शिक्षण घेणे महापाप मानले जाई; परंतु ज्योतिबांनी सावित्रीबाईना लिहायला वाचायला शिकवले.
सावित्रीबाई व ज्योतिबांनी १८४८ मध्ये पुण्यात मुलींची पहिली शाळा काढली. त्यांच्या या क्रांतीकारी निर्णयाला लोकांनी तीव्र विरोध केला. त्या शिकवायला जात असताना लोक त्यांच्यावर चिखल, दगड, शेण फेकत. पण त्या मागे हटल्या नाहीत.
त्यांनी गरीब, दलित, अनाथ व विधवांना आधार दिला. त्यांनी समाजातील सती, बालविवाह, केशवपन, अशा वाईट प्रथाना विरोध केला.
सावित्रीबाई फुले या स्त्री – शिक्षणाच्या जननी होत्या.
प्लेगच्या साथीच्या काळात त्यांनी रुग्णांची सेवा केली. परंतु दुर्देवाने १० मार्च १८९७ रोजी प्लेगने त्यांचे निधन झाले.
आज आपण शिकत आहोत, पुढे जात आहोत त्यामागे सावित्रीबाईच्या त्यागाचे प्रऋण आहे. सावित्रीबाई फुले या अन्यायाविरुध्द लढणारी क्रांती होत्या.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन







