26 जानेवारी प्रजासत्ताक दिन सोपे मराठी भाषण speech on republic day
आजचा दिवस मांगल्याचा! आजचा दिवस भारतीय गणराज्याचा ! आजचा दिवस प्रत्येक भारतीयाचा ! माझा- तुमचा सगळ्यांचा…..
आजच्या या मंगलमय पावन दिवसाच्या कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष, व्यासपीठावरील प्रमुख अतिथी गण, पूज्य गुरुजन वर्ग व उज्ज्वल भारताचे देशदूत माझ्या बंधू भगिनींनो……
अनमोल योगदान दिले ज्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी त्या सर्व वीरांना, महापुरुषांना वंदन मी करतो… वंदन करुनी माझ्या प्राणप्रिय भारतमातेला, मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो….
आज आपला भारत देश प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. हा आपला महत्त्वाचा राष्ट्रीय सण आहे. या सणानिमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला भारत देश ब्रिटीशांच्या जुलमी राजवटीतून स्वतंत्र झाला. स्वतंत्र झाल्यावर या देशाचा कारभार चालवण्याचे कोणतेही कायदे नव्हते. अशा वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली घटना समिती स्थापन करण्यात आली. या समितीने २ वर्षे ११ महिने १८ दिवस अथक परिश्रम करून भारत देशाला मजबूत संविधान दिले.
२६ जानेवारी १९५० ला आपल्या देशामध्ये हे संविधान लागू करण्यात आले. आपला भारत देश सार्वभौम, लोकशाही, प्रजासत्ताक देश बनला. आपल्या देशाची राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी लिखीत राज्यघटना आहे. घटनेने आपल्याला हक्क आणि अधिकार दिलेले अहित.
आपल्या देशाला स्वतंत्र आणि प्रजासत्ताक करण्यासाठी अनेक शूर वीरांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. त्या शूर वीरांचे आपल्यावर खूप अहित. त्यांच्यामुळेच आज आपण सुखाचे उपकार दिवस जगत आहोत.
आज देखील आपले भारतीय जवान डोळ्यात तेल घालून मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी सीमेवर खडा पहारा देत आहेत. या जवानांना माझे कोटी कोटी प्रणाम.
एवढे बोलून मी माझे आषण संपवतो.
जय हिंद ! जय भारत !!
प्रजासत्ताक दिन भाषण क्रमांक- 1
प्रजासत्ताक दिन भाषण क्रमांक- 2
प्रजासत्ताक दिन भाषण क्रमांक- 3
प्रजासत्ताक दिन भाषण क्रमांक- 4
प्रजासत्ताक दिन भाषण क्रमांक- 5
प्रजासत्ताक दिन इंग्रजी भाषण क्रमांक- 6
प्रजासत्ताक दिन भाषण क्रमांक- 7
प्रजासत्ताक दिन इंग्रजी भाषण क्रमांक- 8
प्रजासत्ताक दिन भाषण क्रमांक- 9
प्रजासत्ताक दिन भाषण क्रमांक- 10









2 thoughts on “26 जानेवारी प्रजासत्ताक दिन सोपे मराठी भाषण speech on republic day ”