अभिजात मराठी भाषा दिवस व अभिजात मराठी भाषा सप्ताह आयोजित करणेबाबत abhijat marathi bhasha divas saptah paripatrak 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अभिजात मराठी भाषा दिवस व अभिजात मराठी भाषा सप्ताह आयोजित करणेबाबत abhijat marathi bhasha divas saptah paripatrak 

संदर्भ: मराठी भाषा विभाग- शासन परिपत्रक क्र. अभिजा २०२५/प्र. क्र. ५३/भाषा-१ दि. २१/०७/२०२५

उपरोक्त संदर्भीय शासन परिपत्रकानुसार दि. ०३ ऑक्टोबर हा दिवस “अभिजात मराठी भाषा दिवस” व दि. ०३ ऑक्टोबर ते दि. ०९ ऑक्टोबर या कालावधीत “अभिजात मराठी भाषा सप्ताह” प्रतिवर्षी साजरा करणेबाबत मार्गदर्शक सूचना शासनस्तरावरून निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. त्यानुषंगाने अभिजात मराठी भाषा दिवस व अभिजात मराठी भाषा सप्ताहामध्ये जिल्हा, तालुका, ग्राम व नगरस्तरीय उपक्रम खालीलप्रमाणे आहेत.

१. राज्यातील सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालये/महामंडळे, केंद्र शासनाच्या अखत्यारीतील राज्यातील सर्व कार्यालये, मंडळे/महामंडळे, सार्वजनिक उपक्रम, सर्व खाजगी उद्योग, आस्थापना व व्यापारी बँका, सर्व शैक्षणिक संस्था / विद्यापीठे/महाविद्यालये इ. सर्व संस्थांमधून अभिजात मराठी भाषेसंदर्भातील जास्तीत जास्त संशोधन, संवर्धन व जनजागृती व्हावी या हेतूने प्रतिवर्षी दि. ०३ ऑक्टोबर हा दिवस “अभिजात मराठी भाषा दिवस” व दि. ०३ ऑक्टोबर ते दि. ०९ ऑक्टोबर या कालावधीत “अभिजात मराठी भाषा सप्ताह” म्हणून साजरा करण्यात यावा.

२. अभिजात मराठी भाषा सप्ताहामध्ये अभिजात मराठी भाषेसंदर्भात तज्ञ व्यक्तींची व्याख्याने, चर्चासत्रे, परिसंवाद, कार्यशाळा, शिबिरे आयोजित करण्यात यावीत.

३. अभिजात मराठी भाषेच्या अनुषंगाने ग्रंथाची प्रदर्शने आयोजित करावीत. ताम्रपट /शिलालेखांच्या प्रदर्शनांचे आयोजन करून विद्यार्थी, सामान्य जनतेस मराठी भाषेतील अभिजात ग्रंथ परंपरेची ओळख करून द्यावी.

४. अभिजात मराठी भाषेच्या अनुषंगाने प्राचीन ग्रंथ संपदेचे समकालीन मराठीमध्ये अनुवाद केलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन व विक्री करण्यात यावी.

५. शाळा/ महाविद्यालयांमध्ये अभिजात मराठी ग्रंथ संपदेचे संगणकीकरण करून त्याची विद्यार्थ्याला तोंडओळख करून द्यावी. तसेच सदर ग्रंथांचे जतन व संवर्धन करण्याच्या पद्धतीचे चलचित्र सादरीकरण अथवा प्रात्यक्षिक आयोजन करण्यात यावे.

६. शाळा/ महाविद्यालये तसेच शासकीय कार्यालयांमध्ये मराठी भाषेसंदर्भात प्रश्नमंजुषेचे, निबंध लेखन, वकृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात यावे.

७. याव्यतिरिक्त अभिजात मराठी भाषेच्या अनुषंगाने इतर नाविन्यपूर्ण उपक्रम आयोजित करण्यात यावेत.

आपल्या अधिनस्त शाळांमधून उपरोक्त नमूद कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यात यावी.

Related posts:

Leave a Comment