शैक्षणिक वर्ष सन २०२६-२०२७ पासून इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये अधिक सुसूत्रता आणण्याबाबत eleventh online pravesh prakriya
वाचा :-
१) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांक, एचएससी-१०९७/(१४४४/९७) उमाशि-१, दिनांक-२६.०६.१९९७.
२) शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांक, एसएसएन २१०३/(५०/०३)/माशि-२ दिनांक २७.०५.२००३.
३) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांक, एचएससी-१७०९/ (४४/०९) उमाशि-१, दिनांक-२८.०५.२००९.
४) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांक, एचएससी-१७०९/(४४/०९) उमाशि-१, दिनांक-०७.०६.२०१०.
५) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांक, एचएससी-१८११/(४४१/११) उमाशि-१, दिनांक-१६.०३.२०१२.
६) शासन पत्र, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांक संकीर्ण-१०१३/प्र.क्र.२३६/१३/एसडी-२,
दिनांक-०३.०३.२०१४.
७) शासन निर्णय, अल्पसंख्यांक विभाग, क्रमांक, अशैस २०१२/प्र.क्र.२१/कार्या-५. दिनांक-१८.०६.२०१४.
८) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांक, व्यशि २०१४/प्र.क्र.८२/१४/एसडी-६, दिनांक-२१.०८.२०१४.
९) शासन पत्र, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांक, प्रवेश-२०१४/प्र.क्र.१९२/एसडी-२, दिनांक-१४.०५.२०१५.
१०) शिक्षण संचालक (माध्यामिक व उच्च माध्यामिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र क्र. उच्च माध्यामिक
२४२/११ ऑनलाईन /६१३१, दिनांक २७.१०.२०१५.
११) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांक, न्यायाप्र-२०१५/ (६१/१५)/एसडी-२,
दिनांक २८.०३.२०१६.
१२) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांक, प्रवेश-२०१६/(१८०/१६) एसडी-२, दिनांक ०७,०१,२०१७.
१३) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांक, प्रवेश-२०१८/प्र.क्र.३३३३/एसडी-२, दिनांक-०७.०३.२०१९.
१४) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांकः प्रवेश-२०१८/प्र.क्र-३३३/एसडी-२,
दिनांक २३.०६.२०२०.
प्रस्तावना-
शासन निर्णय क्रमांकः प्रवेश-१२२५/प्र.क्र.१६/ एसडी-२
१५) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांकः प्रवेश-०४२२/प्र.क्र-४१/एसडी-२, दिनांक ०९.०६.२०२२.
१६) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांकः प्रवेश १२२५/प्र.क्र.१६/एसडी-२ दिनांक २५.०२.२०२५.
१७) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांकः प्रवेश १२२५/प्र.क्र.१६/एसडी-२ दिनांक ०६.०५.२०२५.
सन २००९-२०१० या शैक्षणिक वर्षापासून मुंबई, ठाणे व रायगड जिल्ह्यातील मुंबई महानगर विकास प्राधिकरण (MMRDA) क्षेत्रातील सर्व उच्च माध्यामिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांचे इयत्ता ११ वी चे प्रवेश ऑनलाईन पध्दतीने करण्याबाबत संदर्भ क्रमांक ३ येथील दिनांक २८.०५.२००९ च्या शासन निर्णयान्वये आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. सदर आदेशामध्ये संदर्भ क्रमांक ४ व ५ येथील शासन निर्णयान्वये वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या होत्या.
संदर्भाधीन क्रमांक ६ येथील दिनांक ०३.०३.२०१४ च्या शासन पत्रान्वये सन २०१४-१५ या शैक्षणिक वर्षापासून पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील इयत्ता ११ वीचे प्रवेश ऑनलाईन पध्दतीने करण्याबाबत शासनाची मान्यता देण्यात आलेली होती. इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत त्रुटी असल्याचे नमूद करुन मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे जनहित याचिका क्रमांक १२७/२०१४ दाखल करण्यात आली होती. मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी सदर जनहित याचिका प्रकरणी दि.०५.०६.२०१५ रोजी दिलेल्या निर्णयातील निर्देशानुसार इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रक्रियेबाबत सन २०१६-१७ साठी धोरण निश्चित करुन संदर्भ क्रमांक ११ मधील शासन निर्णय दिनांक २८.०३.२०१६ रोजी निर्गमित करण्यात आला होता. इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया मुंबई महानगर विकास प्राधिकरण (MMRDA), पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रासोबत सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून नागपुर, अमरावती, नाशिक, औरंगाबाद या महानगरपलिका क्षेत्रातील सर्व मान्यता प्राप्त उच्च माध्यामिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना लागू करण्याचा निर्णय संदर्भ क्रमांक १२ येथील दिनांक ०७.०१.२०१७ च्या शासन निर्णयान्वये घेण्यात आला होता.
मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील मुंबई महानगर विकास प्राधिकरण (MMRDA) क्षेत्र, पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, नागपुर महानगरपालिका, अमरावती महानगरपालिका, नाशिक महानगरपालिका व छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका या क्षेत्रातील सर्व मान्यता प्राप्त उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता ११ वी चे प्रवेश ऑनलाईन पध्दतीने करण्याबाबत दिनांक २८.०५.२००९, दिनांक ०७.०६.२०१०, दिनांक १६.०३.२०१२ व दिनांक ०७.०१.२०१७ च्या शासन निर्णनयान्वये कार्यपध्दती निश्चित करण्यात आली होती. यामध्ये वेळोवेळी सुधारणा करून इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आलेल्या आहेत.
सन २०१८-१९ च्या इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत मा. उच्च न्यायालय, खंडपीठ नागपुर येथे २ रिट याचिका (रिट याचिका क्र.३८३१/२०१८ व रिट याचिका क्र.३९३२/१८) दाखल करण्यात आल्या होत्या. सदर रिट याचिकांबाबत मा. उच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेले आदेश, सन २०१८-१९ च्या प्रवेश
प्रक्रियेदरम्यान तसेच तद्नंतर आलेले अनुभव, पालकांच्या व विद्यार्थ्यांच्या तक्रारी व त्या अनुषंगाने शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), पुणे यांच्या कडून शासनास प्राप्त अहवाल इ. विचारात घेऊन सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापर्यंत प्रवेश प्रक्रिया करण्यात आलेली होती. या पार्श्वभुमीवर दिनांक २५.०२.२०२५ व दिनांक ०६.०५.२०२५ च्या शासन निर्णयान्वये इयत्ता ११ वीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने संपूर्ण राज्यात गुणवत्तेनुसार सन २०२५-२६ मध्ये राबविण्यात आलेली आहे. या प्रक्रियेमध्ये अधिक सुसूत्रता आणण्यासाठी इ.११ वी प्रवेश प्रक्रियेसाठी तरतूदी निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार पुढीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.
शासन निर्णय :-
सन २०२६-२७ पासून संपूर्ण राज्यातील सर्व मान्यता प्राप्त उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयातील इ. ११ वी चे प्रवेश ऑनलाईन पध्दतीने व गुणवत्तेनुसार करण्यात येणार आहेत. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दिनांक ०६ मे २०२५ याद्वारे अधिक्रमीत करण्यात येत असून शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून खालील प्रमाणे कार्यपध्दती अवलंबिण्यात यावी :-
अ) ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया :-
(१) राज्यातील सर्व क्षेत्रांकरीता उच्च माध्यमिक कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या उच्च माध्यमिक शाळा/स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय/वरिष्ठ महाविद्यालय यांचेशी संलग्न सर्व शाखांमधील इयत्ता ११ वीच्या प्रवेशाकरीता या शासन निर्णयातील तरतुदी लागू राहतील.
(२) राज्यातील अल्पसंख्यांक दर्जासह अन्य सर्व उच्च माध्यमिक कला, वाणिज्य व विज्ञान या शाखांमधील इयत्ता ११ वीच्या प्रवेशाकरीता या शासन निर्णयातील तरतूदी लागू राहतील.
(३) शैक्षणिक सत्र २०२६-२७ पासून राज्यातील राज्यमंडळ संलग्नित उच्च माध्यमिक कला, वाणिज्य व विज्ञान या शाखांचे इयत्ता ११ वी चे प्रवेश केंद्रीय पध्दतीने व ऑनलाईन प्रणाली द्वारा करण्यात यावे. तसेच शैक्षणिक सत्र २०२६-२७ पासून HSVC व्यावसायिक चे प्रवेश ऑफलाईन पध्दतीने शाळा स्तरावर होतील. शालेय शिक्षण विभागाच्या व्यतिरिक्त आदिवासी विभाग, सामाजिक न्याय व अन्य विभागाच्या राज्य मंडळ संलग्नित शाळांच्या विभाग प्रमुखांनी मान्यता दिल्यास अशा शाळा या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होऊ शकतील. ही परवानगी त्या त्या विभागाने दिनांक ३० एप्रिल पूर्वी देणे अनिवार्य असेल.
(४) खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व उच्च माध्यमिक शाळा, स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय व वरिष्ठ महाविद्यालयांशी संलग्न उच्च माध्यमिक शाखा यांनी विहित कालमर्यादेत आवश्यक कागदपत्रे वरीष्ठांना उपलब्ध करून द्यावेत, तसेच विहित मुदतीत माहिती संकेतस्थळावर अद्ययावत करणे आवश्यक राहील. इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे अनुषंगिक कामकाज विहित मुदतीत करणे आवश्यक राहील. याबाबत शाळा स्तरावरील कामकाज पारदर्शकपणे करण्याची जबाबदारी खाजगी व्यवस्थापनाची असेल. इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया गुणवत्तेच्या आधारे करण्यात येईल.
(५) खाजगी व्यवस्थापनाने माहिती देण्यास विलंब करणे, टाळाटाळ करणे, खोटी/दिशाभूल करणारी माहिती सादर करणे, विद्यार्थ्यांना अवाजवी फी आकारणे, प्रवेशास मनाई करणे इत्यादी व आवश्यकतेनुसार कायदेशीर कारवाई करण्यास विभागीय शिक्षण उपसंचालक यांना प्राधिकृत करण्यात येत आहे.
(६) विद्यार्थ्यांना एकावेळी एका प्रवेश अर्जाद्वारे कला, वाणिज्य व विज्ञान शाखा यापैकी प्रत्येक फेरीमध्ये एका शाखेची निवड करता येईल. प्रत्येक फेरीच्या वेळी शाखा बदल करण्याची मुभा असेल. कोणत्याही शाखेकरीता अर्ज करता येईल.
(6) इयत्ता ११ वी प्रवेशाकरीता इच्छुक विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश अर्ज करणे आवश्यक असेल. बनावट कागदपत्रे सादर करून प्रवेश निश्चित केल्यास आवश्यकतेनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. इयत्ता १० वीच्या गुणपत्रिकेमध्ये फेरफार केल्याप्रकरणी इयत्ता ११ वीच्या प्रवेश प्रकियेतून प्रतिबंधित करण्यात येईल.
(८) इयत्ता १० वीचा ऑनलाईन निकाल घोषित झाल्यानंतर लगेच विद्यार्थ्यांना इयत्ता ११ वी प्रवेशाकरीता
प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.
(९) सन २०२६-२७ पासून इ. ११ वी ऑनलाईन प्रवेशाकरिता पुढीलप्रमाणे फेऱ्यांचे नियोजन करण्यात येईल.
सर्वसाधारण ३ फेऱ्या आयोजित करण्यात येतील. सर्व प्रवेश इयत्ता १० वीच्या गुणांच्या आधारे करण्यात येतील. राज्य मंडळ संलग्नित इयत्ता १० वी मधील विषयांच्या उच्चतम ५ विषयांचे गुण गुणवत्तेकरीता विचारात घेण्यात येतील. राज्य मंडळाव्यतिरिक्त इतर मंडळांच्या माध्यमिक स्तरावरील इयत्ता १० मधील मुख्य ५ विषयांमधील गुण हे गुणवत्तेकरीता विचारात घेण्यात येतील. समान गुणवत्तेचे दोन किंवा त्यापेक्षा अधिक उमेदवार असल्यास जन्म दिनांकानुसार जेष्ठतम विद्यार्थ्यांच्या प्रवेशास प्राधान्य देण्यात येईल. या दोन स्तरावर (गुण व जन्मदिनांक) समान असल्यास विद्यार्थी, पालक, आडनाव इंग्रजीमध्ये घेऊन वर्णाक्षरांच्या क्रमानुसार जेष्ठतेनुसार प्रवेश करण्यात येतील.
(१०) सर्वसाधारण ३ फेऱ्या गुणवत्तेनुसार आयोजित करण्यात येतील. यामध्ये सामाजिक व समांतर आरक्षण लागू असेल. नियमित ३ फेऱ्यांनंतर ओपन टू ऑल या विशेष फेरीचे आयोजन करण्यात येईल. यामध्ये ऑनलाईन पध्दतीने रिक्त जागा दाखविण्यात येतील. उर्वरीत रिक्त जागांकरीता दोन दिवसांचा कालावधी देऊन उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयातील शाखा निवडण्याची संधी विद्यार्थ्यांना असेल. ओपन टू ऑल या फेरीनंतर मुलींकरीता एक विशेष ५ वी फेरी घेण्यात येईल. उपलब्ध रिक्त जागांपेक्षा जास्त अर्ज आल्यास केवळ इयत्ता १० वी च्या प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश निश्चित करण्यात येतील, याकरीता संगणकीय प्रणालीचा व ऑनलाईन पध्दतीचा उपयोग करून प्रवेश देण्यात येतील.
(११) अल्पसंख्यांक कोटा अल्पसंख्यांक उच्च माध्यमिक विद्यालय/कनिष्ठ महाविद्यालयांना अल्पसंख्यांक कोटा ५० टक्के त्यांच्या धार्मिक/भाषिक संवर्गातून भरण्याची मुभा असेल. सदर प्रवेश शेवटच्या फेरीपर्यंत गुणवत्तेनुसार भरण्याची मुभा अल्पसंख्यांक दर्जाप्राप्त शाळांना असेल. सदर कोट्यांतर्गत प्रवेश अर्ज ऑनलाईन पध्दतीने करावे लागतील. भरलेल्या जागांची माहिती संकेतस्थळावर अपलोड करण्यासाठीच्या सूचना वेळोवेळी संकेतस्थळावर देण्यात येतील. त्यानुसार कार्यवाही करणे व्यवस्थापनास बंधनकारक असेल, अल्पसंख्यांक ५० टक्के कोटयामधील एकूण प्रवेश क्षमतेपैकी रिक्त जागा प्रवेश फेरीच्या कोणत्याही वेळी प्रत्यार्पित करणे, ही बाब व्यवस्थापनाचा स्वेच्छाधिकार असेल. तथापि शेवटच्या प्रवेश फेरीपर्यंत रिक्त जागा व्यवस्थापनास ऑनलाईन प्रक्रियेतून भरता येतील. शासन निर्णय अल्पसंख्यांक विभाग दिनांक १८/०६/२०१४ मधील धार्मिक व भाषिक
अल्पसंख्यांक कोट्यातील प्रवेश करतांना त्या त्या समूहातील विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश दयावेत. त्या समूहातील विद्यार्थी उपलब्ध न झाल्यास धार्मिक व भाषिक दर्जानुसार अंतर्गत बदलाप्रमाणे प्रवेश करता येतील. उर्वरीत ५० टक्के कोटा हा केंद्रिय प्रवेश प्रक्रियेतून भरण्यात येईल.
(१२) व्यवस्थापन कोटा सर्व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना व्यवस्थापन कोट्याअंतर्गत ५ टक्के जागा आरक्षित असतील. या कोट्यातील जागा सर्वसाधारण शेवटची फेरी संपेपर्यंत गुणवत्तेनुसार भरता येतील. कोणत्याही फेरीच्या टप्यावर या कोट्यातील प्रवेश क्षमतेपेक्षा कमी प्रवेश झाल्यास उर्वरित रिक्त जागा प्रत्यार्पित करणे ही बाब व्यवस्थापनाचा स्वेच्छाधिकार असेल. तथापि शेवटच्या प्रवेश फेरीपर्यंत जागा व्यवस्थापनास ऑनलाईन प्रक्रियेतून भरता येतील. शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना व्यवस्थापन कोटा लागू राहणार नाही.
(१३) इन-हाऊस कोटा इन-हाऊस कोट्या अंतर्गत भरण्यात येणाऱ्या जागा गुणवत्तेनुसार ऑनलाईन
पध्दतीने भरण्यात याव्यात.
(१३.१) एखाद्या संस्थेच्या इयत्ता १ ली ते इयत्ता १२ वी / इयत्ता ५ वी ते इयत्ता १२ वी/इयत्ता ६ वी ते इयत्ता १२ बी/इयत्ता ९ वी ते इयत्ता १२ वी चे वर्ग असलेल्या शाळेतील १० वी मधील इच्छुक विद्यार्थी व विद्यार्थीनींना इयत्ता ११ वी ला शुन्य फेरीत इन-हाऊस कोट्यांतर्गत प्रवेश घेता येईल. सदर प्रवेश देताना विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी १० टक्के कोट्याच्या प्रमाणात प्रवेश देण्यात यावेत व उर्वरित जागांसाठी ऑनलाईन पध्दतीने गुणवत्तेनुसार प्रवेश निश्चित करण्यात येतील.
(१३.२) एखाद्या संस्थेची माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक शाळा संलग्र नसेल तथापी शाळा त्याच परिसरात असतील तर अश्या शाळेतील इयत्ता १० वी च्या इच्छुक विद्यार्थ्यांना इन-हाऊस कोट्यांतर्गत १० टक्के च्या प्रमाणात त्याच संस्थेच्या उमाशा/कमवी इयत्ता ११ वी साठी गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात यावा. तद्नंतर एकाच संस्थेच्या उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालय असलेल्या संस्थेच्या त्या त्या जिल्ह्याच्या महसूल क्षेत्रातील माध्यमिक शाळा असल्यास त्या माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश देताना विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी १० टक्के कोट्याच्या प्रमाणात प्रवेश देण्यात यावेत व उर्वरित जागांसाठी ऑनलाईन पध्दतीने गुणवत्तेनुसार प्रवेश निश्चित करण्यात येतील.
(१३.३) मुंबई शहर, मुंबई उपनगर (एमएमआरडीए) व ठाणे येथे उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालय/वरिष्ठ महाविद्यालय संलग्नित संस्थांच्या शाळां करीता हे तीन महसुली जिल्हयाचे एक युनिट ग्राह्य धरण्यात येईल. या विभागात देखील एकाच संस्थेच्या उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालय असलेल्या संस्थेच्या क्षेत्रातील माध्यमिक शाळा असल्यास त्या माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश देताना विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी १० टक्के कोट्याच्या प्रमाणात प्रवेश देण्यात यावेत व उर्वरित जागांसाठी ऑनलाईन पध्दतीने गुणवत्तेनुसार प्रवेश निश्चित करण्यात येतील.
(१४) विद्यार्थ्यांनी द्यावयाचा पसंतीक्रम, प्रवेश रद्द करणे यासंदर्भातील कार्यपध्दती पुढीलप्रमाणे राहील.
(१४.१) विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेशाकरिता प्राधान्य क्रम भरताना किमान १ प्राधान्यक्रम भरणे अनिवार्य असेल. कमाल १० पसंतीक्रम भरता येतील. प्राधान्य क्रमांच्या उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश गुणवत्तेनुसार मिळाल्यास अशा विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करता येईल.
(१४.२) प्रवेशित विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर त्यांचा प्रवेश रद्द करता येईल. तथापि त्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये पुन्हा सहभागी व्हावयाचे असल्यास अशा विद्यार्थ्यांना प्रवेश रद्द केल्यानंतरच्या लगतच्या फेरीमध्ये सहभागी होता येईल.
(१४.३) विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश अर्जातील मजकूर व प्रत्यक्षात प्रवेशाच्या वेळी कागदपत्रे सादर केलेल्या माहितीमध्ये तफावत/भिन्नता आढळल्यास विशेष फेरीपर्यंत प्रवेश प्रक्रियेपासून वंचित ठेवण्यात येईल. परंतू ५ फेरीनंतरच्या प्रवेश फेरीमध्ये प्रवेश घेण्यास संबंधित विद्यार्थी पात्र असतील.
(१४.४) कनिष्ठ महाविद्यालयात/उच्च माध्यमिक शाळेत विद्याथ्यांची कागदपत्रे तपासून एकदा प्रवेश निश्चित केल्यास त्या प्रवर्गातील विद्यार्थी प्रवेश रद्द करून दुसऱ्या ठिकाणी गुणवत्तेनुसार प्रवेश मिळाल्यास पात्र असतील. नवीन प्रवेशित उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयात कागदपत्रे पडताळणीची आवश्यकता असणार नाही. तथापि मूळ कागदपत्रे नवीन प्रवेशित उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयात जमा करावी लागतील.
(१४.५) प्रत्यक्ष प्रवेशावेळी आरक्षित प्रवर्गातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडे स्वतःचा जातीचा दाखला असावा. विद्यार्थ्यांचा जातीचा दाखला नसल्यास वडिलांचा जातीचा दाखला आरक्षित प्रवर्गाकरीता ग्राह्य धरता येईल. आवश्यकता असणाऱ्या उमेदवाराकडे नॉन क्रिमिलेअरचे प्रमाणपत्र नसल्यास नॉन क्रिमिलेअर करीता सादर केलेला अर्जाची पोहेच ही पुरवा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. उमेदवारास प्रवेशाच्या दिनांकापासून पुढील सहा महिन्यात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल. अन्यथा प्रवेश रद्द करण्यात येईल.
(१४.६) विद्यार्थ्यांने प्रवेश निश्चित करताना शासन नियमाप्रमाणे खाजगी व्यवस्थापनाने निर्धारित केलेले शुल्क
भरणे बंधनकारक असेल.
(१४.७) विद्यार्थ्याने प्रवेशानंतर विषयामध्ये बदल केल्यास सदर विषयासाठी शासन नियमाप्रमाणे खाजगी व्यवस्थापनाने निर्धारित केलेले शुल्क भरणे बंधनकारक असेल.
(१४.८) विद्यार्थ्यांना इयत्ता ११ वी व इयत्ता १२ वी मध्ये ऑनलाईन प्रक्रियेद्वारे निश्चित केलेले उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्याल, शाखा, माध्यम यामध्ये बदल करता येईल.
(१५) प्रत्यक्ष प्रवेशित झालेली विद्यार्थी संख्या लक्षात घेता उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालय यांना प्रत्यक्ष अभ्यासक्रम सुरु करण्याचा निर्णय घेता येईल. त्या शैक्षणिक वर्षातील दिनांक १५ जूलै किंवा त्यापूर्वी उच्च माध्यमिकचे अध्यायन व अध्यपनाचे कार्य सुरु करणे उच्च माध्यमिकच्या सर्व शाखांना अनिवार्य असेल.
(१६) नियमित तीन फेऱ्या संपल्यानंतर “सर्वांसाठी खुली (OPEN TO ALL)” या फेरीमध्ये ऑनलाईन पध्दतीने रिक्त जागा असल्यास विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश घेण्याची मुभा असेल. यानंतर मुलींच्या प्रवेशाकरीता एका विशेष फेरीचे आयोजन करण्यात येईल. तसेच आवश्यकतेनुसार पुढील विशेष फेऱ्यांचे आयोजन करण्यात येईल. (१७) प्रती विद्यार्थी प्रवेश नोंदणी करताना रुपये १०० शुल्क आकरण्यात येईल. सदर शुल्क ऑनलाईन पध्दतीने स्वीकारण्यात येईल.
(१८) पालकांची बदली किंवा विद्यार्थ्यांना स्वेच्छेने कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश निश्चित केल्यानंतर बदल करावयाचा असल्याास (उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्याल/शाखा/माध्यम) संचालनालयाकडून त्या त्या वेळी याबाबत सूचना निर्गमित करण्यात येतील.
(१९) आरक्षणासंदर्भात सूचना :-
(१९.१) सामाजिक आरक्षण, समांतर आरक्षण, हे केवळ केद्रिय प्रवेश प्रक्रियेतील जागा करीता लागू असेल. अल्पसंख्यांक कोटा, व्यवस्थापन कोटा, इन-हाऊस कोटा इ. करीता लागू असणार नाही. आरक्षित जागांचे प्रमाण शासनाच्या प्रचलित धोरणानुसार राहील.
(१९.२) इन-हाऊस कोट्याकरीता राखीव ठेवण्यात आलेल्या जागा ज्या संस्थेतर्फे उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालय चालवले जात असेल, त्या संस्थेमार्फत त्याच महसुली जिल्ह्यात तसेच मुंबई शहर, मुंबई उपनगर (एमएमआरडीए), ठाणे, पालघर व रायगड या जिल्ह्याकरीता एक महसुली विभाग ग्राह्य धरण्यात येईल.
(१९.३) समांतर आरक्षण हे कप्पीकृत आरक्षण (Compartmentalized Reservation) आहे. त्यामुळे उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयनिहाय जागा निश्चित करताना केवळ सामाजिक आरक्षणाची संख्या नमूद
न करता समांतर आरक्षणाच्या जागांची निश्चिती करून त्याप्रमाणे ऑनलाईन प्रणालीमध्ये दाखविण्यात यावी. सदर प्रमाणे कार्यवाही करणे क्रमप्राप्त असल्याने प्रवेश प्रक्रियेच्या वर्षाच्या प्रक्रियेमध्ये शासनाच्या समांतर आरक्षण धोरणानुसार सद्यस्थितीत महिलांसाठी ३०%, दिव्यांगासाठी ४%, प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्तांसाठी २%, तसेच (अ) बदलीने आलेल्या राज्य/केंद्र शासन/खाजगी क्षेत्रातील कर्मचारी यांचे पाल्य (ब) आजी-माजी सैनिकांच्या पत्नी/पाल्य/स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य (क) आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये विजेते/सहभागी होणारे खेळाडू विद्यार्थी व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामधील पदक विजेते खेळाडू विद्यार्थी यांच्याकरिता ५% जागा राखीव ठेवण्यात येतील. महिला व बालविकास विभागाच्या दिनांक ०२ एप्रिल, २०१८ च्या शासन निर्णयानुसार अनाथ मुलांसाठी खुल्या प्रवर्गातून १ टक्के समांतर आरक्षण देण्यात यावे.
(१९.४) खेळाडू विद्यार्थ्यांना राखीव जागांवर प्रवेश देत असताना त्यांचा प्राधान्यक्रम आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमधील पदक विजेते खेळाडू, राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामधील पदक विजेते खेळाडू व त्यानंतर राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये सहभागी खेळाडू असा राहील.
(१९.५) सामाजिक आरक्षणाकरिता प्रवर्ग निहाय उपलब्ध जागांपैकी समांतर आरक्षणाकरीता वर नमूद
प्रमाणानुसार प्रवर्ग निहाय जागा आरक्षित ठेवाव्यात.
(१९.६) तीन फेरीपर्यंत समांतर आरक्षणाकरीता राखीव जागा त्या-त्या प्रवर्गाकरीता आरक्षित ठेवण्यात याव्यात. (१९.७) सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक १३.०८.२०१४ रोजीच्या परिपत्रकानुसार समांतर आरक्षणाच्या जागा संबंधित सामाजिक आरक्षणाच्या प्रवर्गातून भरणे आवश्यक आहे. सदर बाबीचे काटेकोरपणे पालन करावे.
(१९.८) सामाजिक व समांतर या दोन्ही आरक्षणानुसार विद्यार्थी उपलब्ध न झाल्यास सामान्य प्रशासन विभागाच्या
दिनांक ०५.१२.१९९४ रोजीच्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार उर्वरित रिक्त जागा परिवर्तित करण्यात येतील.
(१९.९) सामाजिक आरक्षणाबाबतच्या राज्य शासनाच्या सर्व तरतूदी संपूर्ण राज्यातील इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रियेसाठी लागू राहतील. (अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्था वगळता)
(१९,१०) प्रवेश प्रक्रियेसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कातून पुढील बाबींवर खर्च करता येईल. ऑनलाईन प्रणाली ऑपरेट करणारी संस्था/पुरवठादार, प्रवेश नियंत्रण कक्ष, आवश्यक सुविधा, विद्यार्थ्यांकरीता शाळांमध्ये मदत/मार्गदर्शक केंद्र तयार करणे इत्यादी.
(१९.११) इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेशित विद्यार्थ्यांची माहिती राज्य मंडळास उपलब्ध करून द्यावी. इयत्ता १२ वी परीक्षेकरीता संबंधित महाविद्यालयातून अर्ज भरण्यात आलेले विद्यार्थी केवळ ऑनलाईन व्यवस्थेतूनच आलेले आहेत याची खातरजमा राज्य मंडळाने करावी.
(१९.१२) प्रत्येक फेरीच्या वेळी प्रवेश इच्छुक उमेदवारांना येणाऱ्या फेरीमध्ये सहभागी होण्याची सहमती दर्शविणे अनिवार्य असेल. सहमती दर्शविली नसल्यास त्या फेरीमध्ये या उमेदवारांचा विचार प्रवेशांकरीता केला जाणार नाही.
(१९.१३) इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतून प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या ही उच्च माध्यमिक स्तरावरील संच मान्यता करताना विचारात घेण्यात येईल. शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), पुणे हे त्यानुसार आवश्यक सूचना संबंधित शिक्षण उपसंचालक/शिक्षणाधिकारी यांना वेळोवेळी देतील.
(१९.१४) आय.टी.आय. (I.T.I.) / पॉलीटेक्नीक (Polytechnic) मध्ये प्रवेशित होणारे बरेचसे विद्यार्थी इ. ११ वी प्रवेशाकरिता केंद्रीय प्रवेश प्रक्रियेअंतर्गत देखील अर्ज भरतात. आय.टी.आय. (I.T.I)/ पॉलीटेक्नीक (Polytechnic) मध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेमध्ये पुन्हा पुन्हा येत राहतात. अशा विद्यार्थ्यांकरीता अर्ज मागे घेण्याचा (Withdrawal of Application) पर्याय उपलब्ध करून देण्यात येईल.
(१९.१५) इयत्ता ११ वी मध्ये प्रवेशित होणाऱ्या शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने व गुणवत्तेनुसार होईल.
(१९.१६) संपूर्ण राज्याकरीता विद्यार्थ्यांना एकच प्रवेश अर्ज करावा लागेल. या प्रवेश अर्जानुसार त्याला संपूर्ण राज्यातील कोणतेही ठिकाणची उच्च माध्यमिकची शाखा निवडण्याचा पर्याय उपलब्ध असेल.
(१९.१७) ऑनलाईन प्रणालीवर सर्व उच्च माध्यमिकच्या शाळा/कनिष्ठ महाविद्यालय/वरिष्ठ महाविद्यालय संलग्नीत यांनी वार्षिक शुल्काचे विवरण प्रसिध्द करणे बंधनकारक असेल. खाजगी विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित तत्वावरील उच्च माध्यमिक शाळांच्या शैक्षणिक शुल्काबाबत महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियम २०११ च्या तरतूदी व तद्नंतर निर्गमित नियम व शासन निर्णयाच्या तरतूदी लागू राहतील. शुल्क जमा करण्याची व्यवस्था राज्यस्तरीय समितीने करावी.
(१९.१८) प्रवेश प्रक्रिया संपल्यानंतर प्रवेशित विद्यार्थ्यांच्या नावाची शाखा निहाय यादी, कट ऑफ इत्यादी माहिती राज्य स्तरावरुन प्रकाशित करण्यात येईल.
(१९.१९) व्दिलक्षी अभ्यासक्रमाचे प्रवेश उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर आरक्षण व गुणवत्तेनुसार प्रवेश करण्यात यावेत.
(१९.२०) इयत्ता ११ वीचे प्रवेश ज्या पध्दतीने गुणवत्तेनुसार होतात त्याच आधारे उच्च माध्यमिक स्तरावरील तांत्रिक विषयांचे प्रवेश गुणवत्तेच्या आधारे निश्चित करण्यात यावी. (गृहविज्ञान, संगणक शाख, माहिती तंत्रज्ञान, कृषी, फिशरी, इत्यादी.)
(१९.२१) राज्य मंडळाव्यतिरिक्त अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना इयत्ता ११ वी (राज्य मंडळ संलग्न उच्च माध्यमिक) प्रवेशाकरीता ऑनलाईन प्रक्रियेत नोंदणी करणे आवश्यक असेल.
(१९.२२) आदिवासी विकास विभाग यांचा शासन निर्णय दिनांक १८ मे २०१८ अन्वये अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळांमध्ये शिक्षण देणे या योजनेतंर्गत प्रवेशित विद्यार्थ्यांकरीता निश्चित केलेल्या जागा वगळून इतर जागा इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी नामांकित संस्थांनी नोंदवाव्यात.
(२०) प्रवेश प्रक्रियेचा जिल्हास्तर ते राज्यस्तर खर्च करण्याच्या तरतूदी :-
(२०.१) जिल्हा स्तरावर इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या कामी जिल्हास्तरावरील कंत्राटी कर्मचारी, प्रवेश कक्ष, उदबोधन व प्रशिक्षण खर्च, वाहन खर्च, प्रवास खर्च व प्रवास भत्ता, बैठक खर्च, जाहीरात इ. खर्च जिल्ह्यामधून प्राप्त होणाऱ्या एकूण जमा रक्कमेपैकी २५ टक्के मर्यादित खर्च करण्याची परवानगी संबंधित समितीस राहील.
(२०.२) विभाग स्तरावर इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या कामी विभागस्तरावरील कंत्राटी कर्मचारी, प्रवेश कक्ष, उद्बोधन व प्रशिक्षण खर्च, वाहन खर्च, प्रवास खर्च व प्रवास भत्ता, बैठक खर्च, जाहीरात, इ. खर्च विभागातून प्राप्त होणाऱ्या एकूण जमा रकमेपैकी १० टक्के मर्यादित खर्च करण्यास परवानगी संबंधित समितीस राहिल.
(२०.३) संचालनालय स्तरावर व अन्य निम्नस्तरावरील कंत्राटी कर्मचारी, प्रवेश कक्ष, उद्बोधन व प्रशिक्षण खर्च, प्रवास खर्च व प्रवास भत्ता, बैठक खर्च, जाहीरात व अन्य अनुषंगिक सुविधा करीता येणारा खर्च करण्याची परवानगी शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), पुणे यांना असेल.
(२०.४) प्रवेश प्रक्रियेचे संकेतस्थळ विकसन व संगणक कार्यक्रम विकसनाकरीता येणारा संपूर्ण खर्च प्रवेश प्रक्रियेतून जमा होणाऱ्या व सद्यस्थितीत जमा असलेल्या रकमेतून करण्याची परवानगी शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), पुणे यांना असेल..
(२०.५) त्रयस्थ संस्थेकडून संपूर्ण प्रवेश प्रक्रियेचे व सॉफ्टवेअरचे ऑडीट करण्यासाठी निविदा प्रक्रिया संचालनालय स्तरावरुन करण्यात यावी. त्रयस्थ संस्थेच्या निष्कर्षातील बाबी शासनास तात्काळ कळविण्यात याव्यात.
(२०.६) प्रवेश निश्चित केल्यानंतर प्रवेश रद्द करावयाचा असल्यास शाळेत जमा केलेल्या एकूण शुल्कापैकी
प्रवेशाच्या दिनांकापासून पहिल्या २० दिवसात प्रवेश रद्द केल्यास ५ टक्के कपात करण्यात येईल. त्यानंतरच्या
४० दिवसांत केल्यास १० टक्के कपात करण्यात येईल. त्यानंतर प्रवेश रद्द केल्यास कोणतेही शुल्क परत
मिळणार नाही. सदर परत करावयाचे शुल्क शाळांनी ऑनलाईन पध्दतीने संबंधितांच्या बैंक खाती जमा करणे बंधनकारक राहील. शाळेला अशा मुलांची कागदपत्रे अर्ज करण्याच्या दिवशी किंवा प्रत्यक्ष कागदपत्रे संकलित करण्याच्या दिवशी हस्तांतरीत करणे बंधनकारक राहील. यामध्ये खाजगी व्यवस्थापन जाणीवपूर्वक टाळाटाळ, विलंब करीत असल्यास पहिल्या प्रसंगाकरीता ५० हजार रुपये दंड व तद्नंतरच्या प्रत्येक प्रसंगास १ लाख रुपये प्रमाणे दंड आकारण्यात येईल. (वास्तविकता पडताळून व शहानिशा करुन)
(२०.७) संचालनालय स्तरावर विकसित करण्यात येणाऱ्या “ई-गव्हर्नन्स” अंतर्गत संकेत स्थळ विकसनाकरीता राज्य प्रवेश नियंत्रण समितीच्या अनुमतिने संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), पुणे यांना खर्च करता येईल.
(२१) राज्यमंडळ व विभागीय मंडळाची जबाबदारी:-
(२१.१) वार्षिक परीक्षेत प्रविष्ट झालेल्या इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांची निकालापूर्वी आणि निकालासह आवश्यक ती माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे हे शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), पुणे तसेच केंद्रिय प्रवेश समितीने निश्चित केलेल्या ऑनलाईन सेवा पुरवठादारास उपलब्ध करुन देईल.
(२१.२) ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे कामकाज विहित वेळेत, बिनचूक सुरळीतपणे पार पाडण्यासाठी तसेच सदर प्रक्रियेत कुठलीही अडचण येवू नये यासाठी माहितीची सुरक्षितता राहण्यासाठी शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), पुणे यांनी राज्य मंडळाकडून आवश्यक माहिती प्राप्त करुन त्यानुसार निश्चित केलेल्या ऑनलाईन सेवा पुरवठादार यांच्या समवेत करारनामा करावा.
(२२) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), पुणे यांची जबाबदारी :-
(२२.१) इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया संदर्भात सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने अंमलबजावणी रुपरेषा ठरविणे व या प्रक्रियेचा आढावा घेवून त्याअनुषंगाने कार्यवाही करणे.
(२२.२) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), पुणे यांनी याकरीता मुद्दा ३ प्रमाणे विहित प्रपत्र निश्चित करावेत.
(२२.३) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), पुणे यांनी सदर प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने करण्यासाठी सेवा पुरवठादार निविदा प्रक्रियेच्या अटी व शर्तीनुसार निश्चित करण्याची कार्यवाही करावी.
(२२.४) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), पुणे यांना प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळाचे त्रयस्थ संस्थाद्वारे परीक्षण करणे आवश्यक असेल.
(२२.५) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), पुणे/ केंद्रिय प्रवेश समिती ही शासन आदेशान्वये वेळोवेळी निर्गमित केलेले प्रवेशासंबंधीचे शासन आदेश/परिपत्रके, निश्चित केलेल्या ऑनलाईन सेवा पुरवठादारास तसेच विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), शिक्षणनिरीक्षक, मुंबई यांना वेळेत उपलब्ध करुन देईल.
(२३) विभागीय शिक्षण उपसंचालक यांची जबाबदारी :-
(२३.१) विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग यांना उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांकडून प्राप्त झालेली शाखानिहाय विहित प्रपत्रामधील माहिती उदा. शाखानिहाय तुकड्या, माध्यम, अनुदानित, अंशतः अनुदानित, विना अनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयं अर्थसहाय्यीत वर्गनिहाय व शाखानिहाय विद्यार्थी प्रवेश क्षमता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये उपलब्ध असलेले विषय, प्रवेश शुल्क इत्यादी कनिष्ठ महाविद्यालय नोंदणी प्रपत्रात नमूद केलेली माहिती तपासून शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), पुणे/केंद्रिय प्रवेश समितीने निश्चित केलेल्या ऑनलाईन संकेतस्थळावर अंतिम करणे बंधनकारक असेल.
(२३.२) विभागीय शिक्षण उपसंचालक त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांच्या ठिकाणाचा नकाशा हे शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), पुणे/केंद्रिय प्रवेश समितीस उपलब्ध करुन देतील.
(२३.३) विभागीय शिक्षण उपसंचालक हे इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिये बाबतीत त्यांच्या कार्यक्षेत्रातील मुख्याध्यापक/शिक्षकांच्या कार्यशाळा आयोजित करतील. माध्यमिक शाळांचे प्रशिक्षित मुख्याध्यापक/शिक्षक, विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करतील. विभागीय शिक्षण उपसंचालक याबाबतचे सनियंत्रण करतील.
(२३.४) प्रवेशासंदर्भात संपूर्ण व वस्तुनिष्ठ माहिती प्रसार माध्यमांमध्ये वेळोवेळी प्रकाशित करतील. तसेच विविध प्रसार माध्यमांतून ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस व्यापक प्रमाणात विभागीय शिक्षण उपसंचालक, यांच्याकडून प्रसिध्दी देण्यात येईल.
२३.५) विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई, पुणे, नागपुर, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर व कोल्हापूर यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांकडून प्राप्त झालेली माहिती उदा. शाखा निहाय तुकड्या, माध्यम, अनुदानित, अंशतः अनुदानित, विना अनुदानित, कायम विना-अनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित इत्यादी मान्यता विषयक बाबींची तपासणी करणे. संकेतस्थळावर अशा मान्यता प्राप्त उच्च माध्यमिक (कला, वाणिज्य व विज्ञान) सर्व शाखांची नोंदणी झाल्याची खातरजमा करणे, तसेच सदर माहिती अंतिम करण्याची जबाबदारी सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक यांची असेल. संकेतस्थळावर नमूद केलेली सर्व माहिती अचून असल्याची खातरजमा विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी करणे आवश्यक असेल.
(२३.६) सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक यांना त्यांच्या अधिनस्त क्षेत्रातील सर्व उच्च माध्यमिक प्रवेश क्षमता, माध्यम, तुकडी, शाखा मान्यता इ. ची खातरजमा करण्यास प्राधिकृत करण्यात येत आहे.
(२३.७) नवीन मान्यता प्राप्त उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना यू-डायस कोड मिळण्यास विलंब झाला तर अशा कनिष्ठ महाविद्यालयांना सुरूवातीला ११ हे दोन अंक देण्यात यावेत. उर्वरित ९ अंक नमूद करुन (आपल्या सोयीनुसार) तात्पुरता यू-डायस कोड देण्यात यावा. मागील वर्षी ज्या शाळांना तात्पूरते यू-डायस कोड दिले गेले अशा सर्व कनिष्ठ महाविद्यालयांनी यू-डायस प्रणालीवरील नियमित क्रमांक घेतला असल्याची खातरजमा केल्याशिवाय त्यांना प्रवेश प्रक्रियेत समाविष्ठ करण्यात येऊ नये.
(२३.८) मागील वर्षी नोंदविलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांच्या बाबत काही सुधारणा असल्यास सदर दुरूस्ती १५
एप्रिल पर्यंत पूर्ण करावी.
(२४) शिक्षणाधिकारी (माध्यमिक) व शिक्षण निरीक्षक, मुंबई यांची जबाबदारी –
(२४.१) शिक्षणाधिकारी (माध्यमिक) हे उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांकडून प्राप्त झालेली माहिती उदा. शाखा निहाय तुकड्या, माध्यम, अनुदानित, अंशतः अनुदानित, विना अनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित वर्गनिहाय व शाखानिहाय विद्यार्थी प्रवेश क्षमता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये उपलब्ध असलेले विषय इत्यादी उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालय रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये नमूद केलेली माहिती तपासून शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), पुणे/केंद्रिय प्रवेश समितीने निश्चित केलेल्या ऑनलाईन संकेतस्थळावर अद्ययावत करण्यासाठी विभागीय शिक्षण उपसंचालक यांना सहाय्य करतील.
(२४.२) आपल्या कार्यक्षेत्रातील उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या ठिकाणाचा नकाशा तयार करुन विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे सादर करतील.
(२४.३) शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद व शिक्षण निरिक्षक, मुंबई हे माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक /शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करतील. प्रवेशासंदर्भात संपूर्ण व वस्तूनिष्ठ माहिती शाळांपर्यंत पोहोच करतील. तसेच विविध प्रसार माध्यमांतून ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस व्यापक प्रमाणात प्रसिध्दी देण्याचे नियोजन करतील.







