“देशभक्ती” मराठी बोधकथा marathi bodhkatha

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

“देशभक्ती” मराठी बोधकथा marathi bodhkatha

देशभक्ती

ही गोष्ट आहे स्वातंत्र्यपूर्व काळातील. देशाला लढा देऊन, प्रसंगी रक्त सांडून तसेच हक्कांसाठी लढा देऊन स्वातंत्र्य मिळवले. अशा विचारसरणीचे काही क्रांतिकारक होते. अहिंसेच्या मार्गाने देश स्वतंत्र करता येईल, असा काहीसा विश्वास असणारेही होते. एक लहान मुलगा हे सर्व पाहून देशभक्तीची प्रेरणा घेत होता.

आपल्या मुलांमध्ये देशभक्ती ठासून भरलेली असल्याचे त्याच्या आईला जाणवले. तेव्हा तिला खूप आनंद झाला. देश गुलामीच्या जोखडातून मुक्त झाला तर बरे होईल, अशी तिची भावना होती, पण मुलगा जर पोलिसांच्या तावडीत सापडला तर? जे देशासाठी भूमिगत राहून लढा देत आहेत, त्यांची नावे व ठिकाणे तो

उघड करेल, अशी भीती तिला सतत वाटत राहायची. यासाठी तिने आपल्या मुलाची परीक्षा घ्यायचे ठरवले. आईने मुलाला जवळ बोलावले व आपल्या मनातील ही भावना त्याला सांगितली. परीक्षा देण्याबद्दलही सुचवले.

मुलाने परीक्षेसाठी होकार दिला. आईने दिवा पेटवला व त्या ज्योतीवर त्या मुलाला बोट धरायला सांगितले. त्या मुलाने जराही न घाबरता त्या ज्योतीवर हात धरला. हाताला पोळत असतानाही आईने त्याला क्रांतिकारकांची नावे सांगायला सांगितले; पण मुलाने हूं की चूं सुद्धा केले नाही. मुलाचे हे धाडस पाहून आईने मुलाला कवटाळले. हाच मुलगा मोठेपणी एक महान क्रांतिकारक झाला. त्या मुलाचे नाव होते अशफाक खान !

 

Leave a Comment