शालेय विद्यार्थ्यांसाठी ऊर्जा संवर्धनावर आधारित चित्रकला स्पर्धा आयोजित करणेबाबत National Painting Competition on Energy Conservation

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शालेय विद्यार्थ्यांसाठी ऊर्जा संवर्धनावर आधारित चित्रकला स्पर्धा आयोजित करणेबाबत National Painting Competition on Energy Conservation

संदर्भ :- मा. ओम प्रकाश बकोरिया, भा.प्र.से, महासंचालक, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) यांचे पत्र क्रमांक इसीएन/२०२५-२६/सीआर-३४/१९८ दिनांक ३०.०९.२०२५

उपरोक्त विषयास अनुसरुन आपणांस कळविण्यात येते की, संदर्भीय पत्रान्वये ऊर्जा दक्षता ब्युरो, विद्युत मंत्रालय, भारत सरकार यांचेमार्फत दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन शालेय विद्यार्थ्यांसाठी करण्यात येते. ऊर्जेचा अधिक कार्यक्षमतेने वापर, ऊर्जा बचत व अपारंपरिक ऊर्जेव्दारे वीज निर्मिती केल्यास कार्बन उत्संजनास प्रतिबंध होऊन जागतिक तापमान वाढ कमी करणे शक्य आहे. या अनुषंगाने शालेय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टीने ऊर्जा दक्षता ब्युरो, विद्युत मंत्रालय, भारत सरकार यांचेमार्फत इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी (गट-अ) व इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी (गट-ब) असे गट करुन चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे. असे संचालनालयास कळविण्यात आलेले आहे. (सोबत संदभर्भीय पत्रासोबत परिपत्रकाची प्रत जोडली आहे.)

त्याअनुषंगाने आपल्या विभागातील/जिल्हयातील सर्व शाळांमधील मुख्याध्यापक/प्राचार्य यांना संदर्भीय पत्रातील बाबी निदर्शनास आणून शालेय विद्याथ्यर्थ्यांसाठी ऊर्जा संवर्धनावर आधारित चित्रकला स्पर्धेमध्ये शाळेला सहभागी होणेसाठी आपल्या स्तरावरुन सर्व संबंधितांस सूचित करुन त्याचा अहवाल संचालनालयास सादर करावा.

शासन परिपत्रक pdf download

Related posts:

Leave a Comment