राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या १००% शाळांमधील शिक्षकांची ऑनलाइन उपस्थिती नोंदविणेबाबत. online attendance paripatrak

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या १००% शाळांमधील शिक्षकांची ऑनलाइन उपस्थिती नोंदविणेबाबत. online attendance paripatrak

संदर्भ

: १) बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (RTE ACT) २००९, Section ८ & Section १२

२) स्कूल शिक्षा व साक्षरता विभाग, भारत सरकार यांचे पत्र D.O.No. 19-11/2022-IS-6, दि.२४ मे, २०२२

३) राष्ट्रीय कार्यक्षमता प्रतवारी निर्देशांक (PGI) अहवाल २०२२-२३ आणि २०२३-२४

४) मा. राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांचे पत्र जा.क्र. मप्राशिप/सशि / संगणक / VSK/२०२२-२३/२९८४, दि.०३ नोव्हेंबर २०२३

५) शासन निर्णय क्र. समग्र २०२४/प्र.क्र. ३३ / एसडी-१ मादाम कामा मार्ग, हुतात्मा चौक, मंत्रालय विस्तार,

मुंबई, ४०००३२. दिनांक: १२ मार्च, २०२४.

६) Joint Director, CIET, New Delhi यांचे पत्र F.NO.-RVSK/२०२६/०६/०५, Dated ०५/०७/२०२६

७) मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग यांच्या अध्यक्षतेखाली दि.२०/०८/२०२६ रोजी झालेल्या

स्मार्ट उपस्थिती (SMART Attendance) चॅटबॉट शिक्षक व विद्यार्थी उपस्थिती नोंदविण्यासाठी मार्गदर्शक (User Manual for HM’s & Teacher) 

राज्यस्तरीय आढावा बैठकीतील सूचना.

समग्र शिक्षा, PM पोषण, स्टार्स, पी. एम. श्री अंतर्गत उपक्रमांचे संनियंत्रण तसेच राष्ट्रीय विद्या समिक्षा केंद्राद्वारा तयार करण्यात आलेल्या ६A framework अंतर्गत Attendance, Assessment, Accreditation, Administration, Adaptive Learning व Artificial intelligence याचे ट्रॅकिंग करण्यासाठी राज्याचे विद्या समीक्षा केंद्र कार्यरत आहे.

संदर्भ क्र. ६ नुसार, भारत सरकारचे राष्ट्रीय विद्या समीक्षा केंद्र (RVSK) वरीलपैकी ६A framework अंतर्गत विद्यार्थी व शिक्षक उपस्थिती चालू शैक्षणिक वर्षापासून (२०२६-२७) Real-Time पद्धतीने Dashboard द्वारे संनियंत्रित करणार आहे. Swift Chat या Application मधील “स्मार्ट उपस्थिती” या Bot द्वारे सर्व विद्यार्थ्यांची ऑनलाईन उपस्थिती यापूर्वीच सुरू करण्यात आली आहे.

संदर्भ क्र. ५,६ व ७ अन्वये, सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या इ. १ ली ते इ.१२ वीच्या १००% शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षकांची ऑनलाइन उपस्थिती घेण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार दि. १५ ऑक्टोबर २०२६ पासून Swift Chat या Application मधील “स्मार्ट उपस्थिती” या Bot द्वारे आपल्या अधिनस्त सर्व शाळांना सर्व शिक्षकांची ऑनलाइन उपस्थिती नोंदविण्याबाबत त्वरित आदेशीत करावे. तसेच जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांनी VSK च्या जिल्हा लॉगिनद्वारे नियमित आढावा घ्यावा, क्षेत्रीय अधिकारी यांनी संबंधित सर्व मुख्याध्यापकांना याबाबत आवश्यक सूचना द्याव्यात.

शिक्षक ऑनलाइन उपस्थित्ती – मार्गदर्शक सूचना

१. SwiftChat या Application मधील स्मार्ट उपस्थिती या Bot द्वारे इयत्ता १ ली ते १२ वीच्या सर्व शिक्षकांची उपस्थिती मुख्याध्यापकांनी नोंदवावी व मुख्याध्यापकांच्या अनुपस्थितीत प्रभारी मुख्याध्यापकांनी सदर उपस्थिती नोंदविणे अनिवार्य असेल.

२. ज्या शाळा शालार्थ पोर्टलमध्ये आहेत, अशा सर्व शाळांमधील मुख्याध्यापकांनी Swift Chat या Application मध्ये उपस्थिती नोंदविताना मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेचा यु-डायस कोड व स्वतःच्या शालार्थ आय. डी. चा वापर करावा. तसेच शालार्थ पोर्टलवर नोंदविलेला मोबाईल क्रमांकच वापरावा. आपला मोबाईल क्रमांक बदलला असल्यास शालार्थ पोर्टलवर तो अपडेट करावा,

३. ज्या शाळा शालार्थ पोर्टलमध्ये नाहीत, अशा सर्व व्यवस्थापनाच्या व माध्यमांच्या शाळांमधील मुख्याध्यापकांनी यु-डायस पोर्टलमधील १० अंकी National Teacher Code व यु-डायस पोर्टलवर नोंदविलेल्या मोबाइल क्रमांकाचा वापर करावा. National Teacher Code टाकण्यापूर्वी NTC लिहून पुढे १० अंकी National Teacher Code टाकावा (उदा.यु-डायस पोर्टलवर एखाद्या मुख्याध्यापकांचा National Teacher Code TPXXXXX32 असा असेल तर त्या code पूर्वी NTC हा उपसर्ग (Prefix) लावल्यानंतर तो क्रमांक असा दिसायला पाहिजे. NTCTPXXXXX३२) उपस्थिती नोंदविताना तांत्रिक अडचणी येत असल्यास शालार्थ व यु-डायस पोर्टलमधील माहिती अपडेट करावी. सदर पोर्टलवरील माहिती अपडेट केल्यानंतर अशा अडचणी पुढील काही दिवसात आपोआप दूर होतील.

४. ज्या मुख्याध्यापक व प्रभारी मुख्याध्यापकांना उपस्थिती नोंदविण्यासाठी शिक्षकांची यादी दिसत नसेल तर त्यांनी शालार्थ पोर्टल व यु-डायस पोर्टलवर Acting Headmaster म्हणून नोंद अद्ययावत करावी. सदर पोर्टलवरील माहिती अपडेट केल्यानंतर शिक्षकांची यादी पुढील काही दिवसात दिसेल..

५. दोन सत्रात भरणाऱ्या शाळांसाठी सकाळी ७.०० ते दु. १२.०० तर अन्य शाळांसाठी सकाळी १०.०० ते सायं. ०५.०० या कालावधीत उपस्थितीची नोंद करावी. रात्रशाळांना आपली उपस्थिती रात्री ०९.०० पर्यंत नोंदविता येईल.

६. उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक), समग्र शिक्षा व मनपा स्तरावरील समकक्ष अधिकारी हे विद्या समीक्षा केंद्राचे जिल्हा नोडल अधिकारी म्हणून कामकाज पाहतील. समग्र शिक्षा अंतर्गत प्रोग्रॅमर याकामी त्यांना मदत करतील. शिक्षकांची दैनंदिन उपस्थिती नियमितपणे नोंदविली जात असल्याबाबत विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी (प्राथ. व माध्य.) व जिल्हा नोडल अधिकारी आपल्या स्तरावरून आढावा घेतील.

७. राज्यस्तरावरून याविषयीचा नियमित आढावा घेण्यात येईल,

८. ऑनलाईन उपस्थिती नोंदविताना येणाऱ्या अडचणी https://tinyurl.com/Attendance Borया लिंकवर सादर कराव्यात.

Related posts:

Leave a Comment