महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा – 2026 प्रसिद्धी निवेदन teacher eligibility test
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे – 04
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा – 2026
प्रसिद्धी निवेदन
शासन निर्णय दिनांक २३ ऑगस्ट, २०१३ अन्वये शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता (MAHATET) – २०२६ परीक्षेचे रविवार दिनांक २१.०६.२०२६ रोजी आयोजन करण्यात आले होते. तथापि दिनांक २१.०६.२०२६ रोजी NEET या परीक्षेचे आयोजन National Testing Agency (NTA) मार्फत संपूर्ण देशभरात विविध केंद्रावर करण्यात आलेले असून दोन्ही परीक्षांची बहुतांशी केंद्र एकच येत असल्याने महाराष्ट्र शिक्षक पात्रता (MAHATET) २०२६ सुरळीतपणे पार पाडण्यासाठी व परीक्षार्थी हित लक्षात घेता महाराष्ट्र शिक्षक पात्रता (MAHATET) – २०२६ परीक्षेचे आयोजन दि. २१.०६.२०२६ ऐवजी रविवार दिनांक २८.०६.२०२६ रोजी करण्यात येत आहे.
काही प्रशासकीय अडचणीमुळे सदर वेळापत्रकामध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परीक्षार्थ्यांसाठी अद्यावत माहिती परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल याची परीक्षाथ्यर्थ्यांनी नोंद घ्यावी










