पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीसाठी बिंदूनामावलीच्या माहितीबाबत pavitra portal shikshak bharti
संदर्भ 1 या कार्यालयाचे पत्र जा.क्र. आस्था/प्राथ-106/पवित्र-पोर्टल/बिंदुनामावली/2013/7296 दि. 29.11.2023
२.या कार्यालयाचे पत्र जा.क्र. आस्था/प्राथ-106/पदभरती-दु.८/2025/242, दि. 16.01.2025
कार्यालयाचे पत्र जा.क्र.आस्था/प्राय-106/टेट-25/बिंदु-तपा/2025/1502448,दि. 3. या
17/10/2025
4 शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांचे पत्र क्रमांक शिसंमा/2025-
26/समायोजन/टि-84/1704088 दिनांक 4/02/2026.
5. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्रमांकः संकिर्ण-2025/प्र.क्र.953/टीएनटी-1
दिनांक । जानेवारी, 2026.
6.VC दि. 6 मार्च 2026 मधील सूचना
राज्यातील शिक्षक पदभरतीसाठी माहे में जून, 2025 मध्ये शिक्षक अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी -2025 चे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेचा निकाल दिनांक 18/08/2025 रोजी प्रसिध्द झाला आहे. या परीक्षेतील स्थानिक स्वराज्य संस्था तसेच मुलाखतीशिवाय या निवडाचा पर्याय निवडणाऱ्या शैक्षणिक संस्थांची मुलाखतीशिवाय या प्रकारात तर ज्या खाजगी शैक्षणिक संस्था मुलाखतीसह निवड प्रक्रिया असा पर्याय निवडतील त्या व्यवस्थापनांकरिता मुलाखतीसह निवड प्रक्रिया अशा पध्दतीने दोन निवड प्रकारात पदभरतीची गुणवत्तेनुसार कार्यवाही करण्यात येणार आहे.
शिक्षक अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी-2025 नुसार पदभरती सन 2025-26 च्या संचमान्यतेनुसार मंजूर, कार्यरत व रिक्त पदे विचारात घेऊन करावयाची आहे, त्यासाठी विषय व आरक्षणनिहाय रिक्त पदांची माहिती तयार असणे आवश्यक आहे. आज रोजी सन 2025-26 च्या संचमान्यतेची कार्यवाही 90 टक्क्याहून अधिक
झालेली आहे. उर्वरित संचमान्यता त्रुटी पूर्तता करून प्राप्त करून घेण्यात याव्यात.
यापूर्वी संदर्भाधीन 1 व 2 या पत्रांन्वये मागील पदभरतीच्या वेळी बिंदुनामावली तपासणी करण्याचाबत सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच मागील पदभरतीच्या टप्पा-2 मध्ये संदर्भाधीन पत्र क्रमांक 3 अन्वये सन 2024-25 च्या संचमान्यतेनुसार रिक्त पदे विचारात घेऊन कार्यवाही करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले होते. व्यवस्थापनांनी 2025-26 च्या संचमान्यतेतील मंजूर पदानुसार बिंदूनामावली तपासून शिक्षक पदभरतीसाठी तयार ठेवणे आवश्यक आहे.
आदिवासीबहुल संबंधित 8 जिल्ह्यातौल (नाशिक, धुळे, नंदुरबार, पालघर, यवतमाळ, रायगड, चंद्रपुर व गडचिरोली) सुधारित आरक्षण व बिंदुनामावली विहित करण्याबाबत शासन निर्णये दि. 29/07/2025 निर्गमित झाला आहे. तसेच मा. सर्वोच्च न्यायालयाने पेसा क्षेत्रातील संदर्भातील याचिकांवर दिनांक 6/10/2025 व दिनांक 17/11/2025 रोजी दिलेल्या निर्णयांच्या अनुषंगाने पेसा क्षेत्रातील 17 संवर्गातील पदभरतीबाबत शासन निर्णय दिनांक 11/02/2026 अन्वये मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत. या सर्व व प्रचलित तरतुदी विचारात घेऊन बिंदुनामावली तपासून घेण्यात यावी. या बाबत संदर्भाचौन (6) व्हीसी मध्ये सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहेत,
संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक 01 जानेवारी, 2026 नुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळांतील त्या शाळांच्या संचमान्यतेनुसार शैक्षणिक वर्ष 2025-26 अखेर म्हणजे में 2026 अखेर संभाव्य रिक्त होणारी पदे विचारात घेऊन शासन निर्णय दिनांक 21/06/2023 मध्ये नमूद मर्यादेत शिक्षक अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी 2025 मधील गुणांकनाच्या आधारे शिक्षक संवर्गातील पदभरतीकरिता शासनाने मान्यता प्रदान केली आहे.
बिंदुनामावलीबाबत तक्रारी प्राप्त असल्यास तक्रारींची शहानिशा करूनच पदभरतीसाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याची कार्यवाही करण्यात यावी. तत्पूर्वी संचमान्यतेसंबंधित कार्यवाही 100% पूर्ण करणे व विदुनामावली मागासवर्ग कक्षाकडुन तपासून घेणे याबाबत योग्य ती कार्यवाही तात्काळ करावी, तसेच संचमान्यतेची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर संदर्भाधीन पत्र क्रमांक 4 अन्वये कळवल्यानुसार सन 2025-26 च्या संचमान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षक समायोजनाची कार्यवाही करावी.
कोणत्याही प्रवर्गतील उमेदवारांवर अन्याय होऊ नये, यासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या बिदुनामावलीबाबत प्रचलित तरतुदी विचारात घेऊन बिदुनामावलीची कार्यवाही पूर्ण करण्यात यावी.
अशी कार्यवाही करत असताना कार्यरत कर्मचाऱ्यांचा नियुक्तीचा प्रवर्ग योग्य असल्याची खात्री जबाबदार अधिकाऱ्यांनी करावी, कामाचा अनुभव असलेले कर्मचारी अन्य विभागात कार्यरत असतील तर अशा कर्मचाऱ्यांच्या सेवा तात्पुरत्या कालावधीसाठी या कामी घेण्यात याव्यात. तसेच अनुभबो सेवानिवृत्त कर्मचारी यांची देखील आवश्यक तेथे मदत घ्यावी
शासन निर्णय दिनांक 05/11/2009 मधील तरतुदीनुसार खाजगी शाळांच्या बाबतीत शिक्षणाधिकारी (प्राथमिक) (माध्यमिक) यांची प्रथम तपासणी अधिकारी म्हणून वेळीच संस्थांच्या बिंदुनामावलीची तपासणी करून देण्यात यावी
विभागीय शिक्षण उपसंचालक / शिक्षणाधिकारी (प्राथमिक) (माध्यमिक) यांच्या कार्यालय स्तरावर बिंदुनामावली तपासणी व पवित्र पोर्टलवरील कार्यवाहीसाठी पापूर्वी दिलेल्या सूचनांनुसार स्थापन केलेल्या विशेष कक्षाकडून कार्यवाही करण्यात यावी. सदर कक्षामध्ये अनुभवी कर्मचारी, तसेच राजपत्रित अधिकारी यांचा समावेश करण्यात यावा.
पवित्र पोर्टलवर रिक्त पदांच्या जाहिराती देण्याची सुविधा दिल्यानंतर बिंदुनामावली न तपासण्याची कारणे नमूद करणे सयुंक्तीक होणार नाही. यासाठी पदे रिक्त असलेल्या सर्व व्यवस्थापनांनी गटनिहाय विषयनिहाय रिक्तपदांची माहिती तसेच बिंदूनामावली तपासल्यानंतर कोणत्या प्रवर्गाची किती रिक्त पदे आहेत इत्यादी बाबतच्या माहितीची पूर्वतयारी करून घ्यावी, यामुळे जाहिरातीसाठी जास्त कालावधी द्यावा लागणार नाही.
आपल्या अधिनस्त शाळांतील शिक्षकांच्या रिक्त पदांची पदभरती वेळेत पूर्ण होण्यासाठी वरील प्रमाणे
कार्यवाही पूर्ण करण्याची दक्षता घ्यावी.
शासन परिपत्रक येथे पहा pdf download








