समग्र शिक्षा अंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत सन २०२५ २६ करिता संकलित चाचणी – २ (PAT३) च्या शाळाभेट आयोजनाबाबत pat exam shalabhet paripatrak 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

समग्र शिक्षा अंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत सन २०२५ २६ करिता संकलित चाचणी – २ (PAT३) च्या शाळाभेट आयोजनाबाबत pat exam shalabhet paripatrak 

संदर्भ: १. प्रस्तुत कार्यालयाचे पत्र जा.क्र. SCERT-३८.०/१६/२०२६ EVALUATION/१७६८८५३/२०२६ दि.०९/०३/२०२६.

२. प्रस्तुत कार्यालयाचे पत्र जा.क्र.स.चा.२/२०२५-२६/१६७ दि.०९/०४/२०२६.

उपरोक्त संदर्भ क्र. २ अन्वये यापूर्वी देण्यात आलेले पत्र रद्द समजण्यात यावे.

उपरोक्त विषयान्वये या शैक्षणिक वर्षात इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी खालील तीन नियतकालिक मूल्यांकन चाचण्याचे (PAT) आयोजन करण्यात येत आहे. यास अनुसरून २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी १ व संकलित मूल्यमापन चाचणी-२ अशा तीन नियतकालिक चाचण्यांचे नियोजन करण्यात येते. नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत संकलित चाचणी – २ दि. ११,१५ व २२ एप्रिल २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे.

संकलित चाचणी २ चे वेळापत्रक (कालावधी दि. ११,१५ व २२ एप्रिल २०२६)

तरी सदर कालावधीत आपण व आपल्या अधिनस्थ असणाऱ्या अधिकाऱ्यानी दि. ११,१५ व २२ एप्रिल २०२६ या कालावधीत शाळाभेटी कराव्यात व सदर भेटी संदर्भातील माहिती सोबत दिलेल्या लिंकमध्ये त्याच दिवशी भरावी,

* संकलित चाचणी-२ च्या अंमलबजावणीबाबत सूचनाः

पर्यवेक्षीय यंत्रणा, मुख्याध्यापक व शिक्षक यांना संकलित चाचणी-२ च्या प्रभावी अंमलबजावणीबाबत

खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.

१. संकलित चाचणी-२ ही शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व शाळा तसेच खाजगी

अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यासाठी आयोजित करण्यात येणार आहे.

२. तसेच उपरोक्त तक्त्यात नमूद करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार सदरची संकलित चाचणी – २ सकाळ सत्रातील शाळांकरिता सकाळी ८.०० ते ११.०० या दरम्यान व दुपार सत्रातील शाळांकरिता दुपारी १२.०० ते ३.०० या दरम्यान घेण्यात यावी. तथापि, इयत्तानिहाय दिलेल्या वेळेनुसार व वेळापत्रकाप्रमाणेच चाचणी घेण्यात यावी, यात कोणताही बदल करण्यात येवू नये.

३. उपरोक्त नियोजनानुसार दिलेल्या वेळेत सर्व नमूद इयत्तांची चाचणी होईल याप्रमाणे नियोजन करण्याची जबाबदारी संबंधितांची व शाळेच्या मुख्याध्यापकांची असेल.

४. वरीलप्रमाणे आपल्या अधिनस्त शाळा मुख्याध्यापक, शिक्षक यांचेपर्यंत संकलित चाचणी-२ च्या

अनुषंगाने योग्य त्या कार्यवाहीसाठी सूचना द्याव्यात.

५. तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी यानी संकलित चाचणी- २ पूर्वी पर्यवेक्षीय यंत्रणेतील अधिकारी, मुख्याध्यापक तसेच शिक्षक यांची ONLINE बैठक (VC) घ्यावी.

६. संकलित चाचणी -२ घेताना वस्तुनिष्ठ, पारदर्शक पद्धतीने घेण्यात यावी जेणेकरून पुढील कृतिकार्यक्रम ठरवताना मदत होईल.

७. चाचणीपत्रिकांचा मोबाईल मधून फोटो काढणे, समाजमाध्यमाद्वारे इतरांना पाठविणे तसेच प्रसारित करणे असे गैरप्रकार होणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी. चाचणीपत्रिकांची गोपनियता काटेकोरपणे पाळण्यात यावी.

८. जिल्हास्तरावर प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक) जिल्हा परिषद (सर्व) यांची चाचणी आयोजनाबाबत सर्वस्वी जबाबदारी असेल.

चाचणी कालावधीत करावयाच्या शाळा भेटीबाबत-

१. जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्याच्या शाळानिहाय भेटीचे दिनांकासहित नियोजन प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, व शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक) यानी एकत्रितरित्या बैठक घेऊन करावे.

२. जिल्हास्तरावरून केलेले नियोजन संबधित तालुक्यांना कळवावे. प्रत्येक तालुक्यांनी जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना दिलेल्या भेटीच्या शाळा वगळून उर्वरित शाळांसाठी शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांच्या भेटीचे नियोजन करावे.

जास्त पटाच्या शाळांसाठी चाचणी वस्तुनिष्ठ व पारदर्शक पद्धतीने व्हावी याकरिता तालुका /

जिल्हास्तरावर खालील बाबींची दक्षता घेण्यात यावी.

१. पर्यवेक्षीय यंत्रणेतील अधिकाऱ्याऱ्यांनी शाळाभेटी करताना प्राधान्याने अधिक पटसंख्या असणाऱ्या जास्तीत जास्त शाळांना भेटी देण्याचे नियोजन करावे. तसेच ONLINE बैठकीत देण्यात आलेल्या सूचनाप्रमाणे चाचणी योग्य पद्धतीने सुरु असल्याची नोंद करावी.

२. चाचणी कालावधीत राज्यातील १०० टक्के शाळाभेटी होतील यासाठी संबंधित जिल्ह्यातील प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, व शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक) व पर्यवेक्षीय यंत्रणेतील सर्व अधिकारी/कर्मचारी यांनी दक्षता घ्यावी.

३. चाचणी नंतर तपासणी केलेल्या १०% उत्तरपत्रिकांची यादृच्छिक पद्धतीने तपासणी करण्याचे

नियोजन शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक व प्राचार्य जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था यांनी करावे.

शासन परिपत्रक pdf download 

सोबत – शाळाभेट लिंक- https://forms.gie/NabbLNSmZfMJYUVE8

(मा. संचालक यांच्या मान्यतेने)

Related posts:

Leave a Comment