राज्यातील इ.११वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन. २०२६-२७ ची कार्यवाही सुरु करणे व त्यासाठी करावयाच्या पूर्वतयारीबाबत eleventh online addmission process 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राज्यातील इ.११वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन. २०२६-२७ ची कार्यवाही सुरु करणे व त्यासाठी करावयाच्या पूर्वतयारीबाबत eleventh online addmission process 

संदर्भ शासन निर्णय क्र. प्रवेश-१२२५/प्र.क्र.१६/एसडी-२ दिनांक. २५/०२/२०२५

उपरोक्त विषयान्वये कळविण्यात येते की, मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या ‘इज ऑफ लिविंग” या कार्यक्रमांतर्गत इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संदर्भीय शासन निर्णयानुसार सन. २०२५-२६ पासून राज्यातील उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये इ.११वी चे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्यात येत आहेत.

सन. २०२६-२७ मधील इ.११वी प्रवेश प्रक्रिया कार्यवाही सुरु करण्यात येत असून त्यानुषंगाने आवश्यक मार्गदर्शन विद्याथ्यांना मिळावे व योग्य पूर्वतयारी करता यावी यासाठी पुढील बाबी संबंधितांच्या निदर्शनास आणून द्याव्यात.

सन. २०२६-२७ मध्ये महाराष्ट्र राज्यातील राज्यमंडळाशी संलग्न सर्व उच्च माध्यमिक विद्यालये। कनिष्ठ महाविद्यालयांतील इ.११वी चे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्यात येतील,

ज्या विद्याव्यर्थ्यांना राज्यातील राज्यमंडळ संलग्न इ. १श्वी मध्ये प्रवेश घ्यावयाचा असेल अशाच विद्याव्यांनी या प्रणालीच्या मध्यमातून अर्ज करावा, अन्य मंडळाशी संलग्न विद्यालयात प्रवेशासाठी संबंधित विद्यालयांशी संपर्क साधावा, तथापि, अन्य मंडळाच्या शाळांमधून इ.१०वी उत्तीर्ण झालेल्या विद्याथ्यांना राज्यमंडळ संलग्न इ.११वी मध्ये प्रवेश घ्यावयाचा असल्यास त्यांना या प्रणालीद्वारे अर्ज करता येईल.

शेवटचा विद्यार्थी प्रविष्ट होईपर्यंत प्रवेश प्रक्रिया ही गुणवत्तेनुसार व निकषांनुसार ऑनलाईन पध्दतीने करण्यात येईल. ऑनलाईन प्रणाली व्यतिरिक्त अन्य कोणत्याही मार्गाने शाळांना प्रवेश करता येणार नाही.

शासन परिपत्रक pdf download 

सदर प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यास दिलेल्या संकेतस्थळ / पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करुन प्रवेशाचावत पुढील कार्यवाही करावयाची आहे. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना राज्यातील इ.१श्वी वर्ग असलेली विद्यालये शोधणे, त्यांमध्ये उपलब्ध शाखा/ माध्यम, प्रवेश क्षमता / रिक्त जागा तपासणे त्याचप्रमाणे प्रवेशासाठी अर्ज करणे, इत्यादी सुविधा ऑनलाईन उपलब्ध होतील. इ.११वी प्रवेश प्रक्रियेमध्ये सुलभता येण्यासाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना पुढीलप्रमाणे देण्यात येत आहेत.

Related posts:

Leave a Comment